BSNL ने अमेजॉन प्राइम च्या फ्री सब्सक्रिप्शन सह लॉन्च केला आपला नवीन प्लान

HIGHLIGHTS

BSNL ने आपल्या Rs 700 च्या किंमतीत येणारा ब्रॉडबँड प्लान लॉन्च केला आहे, या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड फ्री कॉल्स आणि अमेजॉन प्राइम चे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे.

BSNL ने अमेजॉन प्राइम च्या फ्री सब्सक्रिप्शन सह लॉन्च केला आपला नवीन प्लान

BSNL ने आपला नवीन प्लान BSNL BBG Combo ULD 700 Amaze नावाने सादर केला आहे, कंपनी ने हा ब्रॉडबँड प्लान Rs 700 च्या किंमतीत सादर केला आहे, या प्लान मध्ये तुम्हाला 10Mbps चे कनेक्शन मिळत आहे, तसेच या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग व्यतिरिक्त अमेजॉन प्राइम सब्सक्रिप्शन मिळत आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे पाऊल उचलण्या मागे एक मोठे कारण हे असू शकते की जियो कडून जियोफाइबर पण येत आहे. त्याआधीच BSNL आपला दबदबा बनवू इच्छित आहे. हा नवीन BSNL प्लान पॅन इंडिया आधारावर 1 मे पासून लागू होईल. या प्लान बद्दल कंपनी ने पूर्ण माहिती पण दिली आहे. 
या प्लान बद्दल बोलायचे झाले तर या प्लान मध्ये तुम्हाला 10Mbps चा डाउनलोड स्पीड 15GB ची FUP लिमिट पर्यंत मिळत आहे. त्यानंतर तुमचा स्पीड 2Mbps होईल. त्याचबरोबर या डाटा लाभ सह यात तुम्हाला 500 मिनिटांचे BSNL टू BSNL वॉयस कॉल मिळत आहेत, विशेष म्हणजे या फ्री अनलिमिटेड कॉलिंग चा लाभ तुम्हाला 10:30 PM पासून 6:00 AM पर्यंत भारतातील कोणत्याही नेटवर्क वर घेऊ शकता. 
या प्लान चे अन्य बेनिफिट पाहता या प्लान मध्ये तुम्हाला अमेजॉन प्राइम चे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे. ही सेवा सर्व यूजर्स साठी असेल. पण या बद्दल जास्त डिटेल्स अजूनही उपलब्ध झाले नाहीत. पण जर या प्लान मध्ये ही सेवा मिळाली तर आपण असे बोलू शकतो की ही एक वर्षासाठी असेल. कारण अमेजॉन पण ही सेवा एक वर्षासाठी देतो. 

त्याचबरोबर या प्लान मध्ये तुम्हाला एक फ्री- इ-मेल आईडी आणि 1GB फ्री स्पेस मिळत आहे. यूजर्सना या प्लान साठी Rs 700 चे डिपाजिट एक महिन्यासाठी द्यावे लागेल आणि BSNL तुम्हाला ही सेवा एक वर्षासाठी देणार आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला एकदाच या सेवेसाठी पैसे द्यावे लागतील.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo