BlackBerry Key2 कमी किंमतीत आणि कमी स्पेक्स सह लवकरच होऊ शकतो लॉन्च

BlackBerry Key2 कमी किंमतीत आणि कमी स्पेक्स सह लवकरच होऊ शकतो लॉन्च
HIGHLIGHTS

रिपोर्ट नुसार Key2 LE काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या Key2 चा कमी पॉवरफुल वेरिएंट असेल जो कमी किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.

BlackBerry KEY2 चा एक हलका वेरिएंट लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. Android Police च्या रिपोर्ट नुसार BlackBerry Key2 LE हलका पॉवरफुल वेरिएंट असेल जो Key 2 च्या तुलनेत कमी स्पेक्स सह येईल. हा डिवाइस यावर्षी IFA मध्ये सादर केला जाऊ शकतो आणि रिपोर्ट नुसार या डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर असेल. अजूनतरी या डिवाइस च्या किंमतीची कोणतीही माहिती मिळाली नाही. 

आगामी BlackBerry Key2 LE मध्ये 4.5 इंचाचा 1080 x 1620 LCD डिस्प्ले असेल. डिवाइस मध्ये 4GB रॅम आणि 3500mAh ची बॅटरी देण्यात येईल आणि हा 32GB स्टोरेज सह सादर करण्यात येईल. ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर डिवाइस मध्ये 13MP + 5MP चा डुअल रियर कॅमेरा देण्यात येईल. बोलले जात आहे की Key2 LE मध्ये फुल BlackBerry कीबोर्ड असेल ज्यात स्पेसबार फिंगरप्रिंट चे काम करेल आणि Key2 प्रमाणे शॉर्टकट की सोबत येईल. असे होऊ शकते की Key2 LE मध्ये KeyOne आणि Key2 प्रमाणे ट्रॅकपॅड फंक्शनालिटी नसेल. 

BlackBerry KEY2 मध्ये 4.5 इंचाचा टच डिस्प्ले देण्यात आला आहे आणि सोबत QWERTY कीबोर्ड पण आहे. कंपनी ने फिंगरप्रिंट स्कॅनर स्पेस बार मध्ये एम्बेड केला आहे. यात एक FHD IPS LCD डिस्प्ले आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो (433 PPI ) 3:2 आहे. डिवाइस मध्ये 3500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलजी सोबत येते आणि डिवाइस ला 40 मिनिटांमध्ये 50% चार्ज करू शकते. 

स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 Kryo 260 ओक्टा कोर प्रोसेसर सह लॉन्च करण्यात आला आहे आणि यात 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे. त्याचबरोबर डिवाइस ची स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येते. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo