Asus ZenFone Max Pro M2 टाइटेनियम एडिशन लॉन्च, फ्लिपकार्ट वर उपलब्ध

Asus ZenFone Max Pro M2 टाइटेनियम एडिशन लॉन्च, फ्लिपकार्ट वर उपलब्ध
HIGHLIGHTS

आसुसच्या ZenFone Max Pro M2 स्मार्टफोनचा टाइटेनियम एडिशन अलीकडेच भारतात लाँन्च करण्यात आला आहे. हा डिवाइस तीन हार्डवेयर कॉन्फिगरेशन सह उपलब्ध होईल सोबतच फोन मध्ये तुम्हाला नवीन कलर ऑप्शन पण देण्यात आला आहे.

महत्वाचे मुद्दे:

  • फ्लिपकार्ट वर उपलब्ध टाइटेनियम एडिशन
  • ZenFone Max Pro M2 मध्ये नवीन कलर वेरिएंट
  • 6GB+64GB वेरिएंट सेल साठी होऊ शकतो उपलब्ध

Asus यूजर्स साठी कंपनी ने ZenFone Max Pro M2 चा ‘टाइटेनियम एडिशन' भारतीय मार्किट मध्ये आणला आहे. त्याचबरोबर हा डिवाइस तीन हार्डवेयर कॉन्फिगरेशन सह उपलब्ध आहे. सोबतच Asus ZenFone Max Pro M2 आतापर्यंत ब्लू कलर मध्ये उपलब्ध केला गेला होता तर आता पोर्टफोलियो मध्ये टाइटेनियम वेरिएंट सादर केला गेला आहे. तसेच फोन लॉन्च होताच Flipkart वर सेल साठी आणण्यात आला आहे.

भारतात Asus ZenFone Max Pro टाइटेनियम एडिशनची किंमत

Asus ZenFone Max Pro टाइटेनियम एडिशनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या फोनची किंमत 12,999 रुपयांपासून सुरु होत आहे ज्यात तुम्हाला 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरिएंट मिळतो. फोनचा सर्वात महागडा वेरिएंट 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वाला आहे ज्याची किंमत 16,999 रुपये आहे. तसेच फोनचा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेल 14,999 रुपयांमध्ये मिळत आहे. 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्यतिरिक्त इतर दोन्ही वेरिएंट Flipkart वर उपलब्ध आहेत. तसेच टाइटेनियम एडिशनचा सर्वात महागड्या वेरिएंट ‘coming soon' च्या लिस्टिंग सह उपलब्ध करण्यात आला आहे.

Asus ZenFone Max Pro M2 टाइटेनियम एडिशनचे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

या टाइटेनियम एडिशन मध्ये तुम्हाला ड्यूल सिम मिळत आहे. यात 6.26 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2280 पिक्सल) डिस्प्ले आहे. हा 19:9 आस्पेक्ट रेशियो आणि 2.5डी कर्व्ड कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ने सुसज्ज आहे.

प्रोसेसर

आसुस झेनफोन मॅक्स प्रो एम2 (झेडबी630केएल) स्टॉक एंड्रॉयड 8.1 ओरियो वर चालतो. स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर आहे. सोबत यूजर्स साठी रॅमचे तीन पर्याय आहेत- 3 जीबी, 4 जीबी आणि 6 जीबी रॅम.

कॅमेरा

Asus ZenFone Max Pro M2 मध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आहे. प्राइमरी सेंसर 12 मेगापिक्सलचा आहे. सोबत 5 मेगापिक्सलचा सेंसर पण देण्यात आला आहे. रियर कॅमेरा सेटअप ईआईएस, 4K वीडियो रिकॉर्डिंग सपोर्ट आणि एलईडी फ्लॅश मॉड्यूल ने सुसज्ज आहे. ZenFone Max Pro M2 मध्ये फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर, 1.12 माइक्रॉन पिक्सल्स आणि एलईडी फ्लॅश असलेला 13 मेगापिक्सलचा सेंसर आहे.

स्टोरेज

Asus ZenFone Max Pro M2 च्या स्टोरेज बद्दल बोलायचे तर फोन मध्ये इनबिल्ट स्टोरेज मध्ये 32 जीबी किंवा 64 जीबी देण्यात आली आहे. स्मार्टफोनचे तिन्ही वेरिएंट 2 टीबी पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतील.

कनेक्टिविटी

स्मार्टफोनच्या कनेक्टिविटी फीचर मध्ये ड्यूल 4जी वीओएलटीई, वाई-फाई 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, एफएम रेडियो, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि माइक्रो-यूएसबी पोर्टचा समावेश आहे. एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, डिजिटल कंपास, जायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेंसर या फोन मध्ये आहेत. फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर मागील बाजूस देण्यात आला आहे.

बॅटरी

Asus ZenFone Max Pro M2 ची बॅटरी 5,000 एमएएच ची आहे जी यूजर्सना खूप चांगला एक्सपीरियंस देऊ शकते.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo