Asus Zenfone Max Pro M1 मोबाइल फोन ने लॉन्च नंतर बनवला हा मोठा रेकॉर्ड

Asus Zenfone Max Pro M1 मोबाइल फोन ने लॉन्च नंतर बनवला हा मोठा रेकॉर्ड
HIGHLIGHTS

Asus Zenfone Max Pro M1 मोबाइल फोन Xiaomi Redmi Note 5 Pro ला भारतीय बाजारात टक्कर देण्यासाठी जवळपास सारख्याच स्पेसिफिकेशन आणि फीचर्स सह तेवढ्याच किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. आता या स्मार्टफोन ने आपल्या लॉन्च नंतर एक मोठा रेकॉर्ड केला आहे. आता पर्यंत या डिवाइस चे जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त यूनिट्स सेल करण्यात आले आहेत.

Asus Zenfone Max Pro M1 मोबाइल ने फ्लिपकार्ट वर एक मोठा रेकॉर्ड बनावला आहे. समोर आलेले आकडे सांगत आहेत की या मोबाइल फोनच्या लॉन्च नंतर आता पर्यंत याचे जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त यूनिट्स विकण्यात आले आहेत. हा डिवाइस दोन वेगवेगळ्या रंगात म्हणजे ब्लॅक आणि ग्रे रंगांत लॉन्च करण्यात आला आहे, याव्यतिरिक्त दुसरा कलर वेरिएंट म्हणजे Blue कलर पण फ्लिप्कार्ट वरून विकत घेता येईल. 

तुम्हाला तर माहितीच आहे की Asus Zenfone Max Pro M1 मोबाइल फोन Xiaomi Redmi Note 5 Pro ला भारतीय बाजारात टक्कर देण्यासाठी जवळपास सारख्याच स्पेसिफिकेशन आणि फीचर्स सह तेवढ्याच किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. हा मोबाइल फोन कंपनी ने सब-Rs 15,000 च्या श्रेणी मध्ये लॉन्च केला होता. हा एक चांगला स्मार्टफोन आहे आणि आपल्या लॉन्च च्या जवळपास 6 महिन्यात याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. या स्मार्टफोन च्या कोणता वेरिएंट सर्वात जास्त विकला गेला याची माहिती मात्र अजूनही कंपनी कडून देण्यात आली नाही.

Asus Zenfone max Pro M1 स्पेसिफिकेशन्स आणि फीचर 
या स्मार्टफोन च्या किंमती बद्दल बोलायचे झाले तर याच्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत 10,999 रूपये आहे, तर डिवाइसच्या 4GB रॅम आणी 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रूपये आहे. यात एक 5.99-इंचाचा FHD+ डिस्प्ले 2180×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह मिळत आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर सह लॉन्च केला गेला आहे.
फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत आहे, यात तुम्हाला एक 13-मेगापिक्सल आणि एक 5-मेगापिक्सल चा ड्यूल सेंसर मिळत आहे. सोबतच फोन मध्ये एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. याव्यतिरिक्त फोन मध्ये तुम्हाला रियर कॅमेरा सह एक LED फ्लॅश मिळत आहे, तसेच तुम्हाला फ्रंट कॅमेरा सोबत एक सॉफ्ट फ्लॅश आहे. फोन मध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे. त्याचबरोबर यात एंड्राइड 8.1 Oreo सह 5,000mAh क्षमता असलेली बॅटरी आहे.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo