Asus Zenfone Max Pro M1 साठी आला नवीन FOTA अपडेट

HIGHLIGHTS

ASUS चे म्हणेन आहे की FOTA अपडेट बॅच पद्धतीने देण्यात येईल.

Asus Zenfone Max Pro M1 साठी आला नवीन FOTA अपडेट

ASUS ने आपल्या Zenfone Max Pro M1 स्मार्टफोन साठी नवीन FOTA अपडेट आणला आहे जो डिवाइस ची परफॉरमेंस वाढवेल. हा नवीन अपडेट फ्रंट कॅमेरा च्या परफॉरमेंस मध्ये सुधार करेल आणि फिंगरप्रिंट परफॉरमेंस पण चांगली करेल. कंपनी म्हणेन आहे की नवीन FOTA अपडेट बॅच पद्धतीने देण्यात येईल. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Asus Zenfone Max Pro M1 बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये एक 5.99-इंचाचा FHD+ डिस्प्ले 2180×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह मिळत आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर सह लॉन्च केला गेला आहे. Redmi Note 5 Pro डिवाइस मध्ये पण तुम्हाला हा चिपसेट मिळत आहे. 

फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत आहे, यात तुम्हाला एक 13-मेगापिक्सल आणि एक 5-मेगापिक्सल चा ड्यूल सेंसर मिळत आहे. सोबतच फोन मध्ये एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. याव्यतिरिक्त फोन मध्ये तुम्हाला रियर कॅमेरा सह एक LED फ्लॅश मिळत आहे, तसेच तुम्हाला फ्रंट कॅमेरा सोबत एक सॉफ्ट फ्लॅश आहे. फोन मध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे. त्याचबरोबर यात एंड्राइड 8.1 Oreo सह 5,000mAh क्षमता असलेली बॅटरी आहे.

या स्मार्टफोन च्या किंमती बद्दल बोलायचे झाले तर याच्या 
3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत 10,999 रूपये आहे, तर डिवाइसच्या 4GB रॅम आणी 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रूपये आहे. डिवाइसचा एक प्रीमियम मॉडेल कंपनी ने 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट मध्ये आणला आहे. या मॉडेलची किंमत 14,999 रूपये आहे.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo