Asus Zenfone Max Pro M1 साठी मे सिक्योरिटी पॅच सह जाहीर झाला VoLTE सपोर्ट

Asus Zenfone Max Pro M1 साठी मे सिक्योरिटी पॅच सह जाहीर झाला VoLTE सपोर्ट
HIGHLIGHTS

या अपडेट मध्ये मे 2018 साठी सिक्योरिटी पॅच पण आहे जी एक चांगली बाब आहे.

Asus Zenfone Max Pro M1 स्मार्टफोन Asus ने Redmi Note 5 Pro ला टक्कर देण्यासाठी लॉन्च केले होते आणि आता या डिवाइस साठी कंपनी ने नवीन सॉफ्टवेर अपडेट आणला आहे. कंपनी चे म्हणेन आहे की या अपडेट मुळे Zenfone Max Pro M1 चा यूजर एक्सपीरियंस सुधारेल. 

या अपडेट मध्ये नवीन फीचर्स सादर करण्यात आले आहेत ज्यात सपोर्टेड सर्कल्स मध्ये वोडाफोन, भारती एयरटेल आणि आयडिया सेलुलर साठी VoLTE सपोर्ट चा समावेश आहे. या अपडेट मध्ये मे 2018 साठी सिक्योरिटी पॅच पण आहे जी एक चांगली बाब आहे. पण Asus जून महिन्याच्या सिक्योरिटी पॅच सह अजून चांगला एक्सपीरियंस देऊ शकली असती. गूगल पिक्सल डिवाइस फक्त असे डिवाइस आहेत ज्यांना सध्या लेटेस्ट सिक्योरिटी पॅच मिळाला आहे. 

इतर बदलांमध्ये फिंगरप्रिंट सेंसर च्या रिसपोंस टाइम मधील सुधाराचा समावेश आहे. यामुळे फ्रंट कॅमेरा मध्ये पण सुधार आला आहे पण याची माहिती मिळाली नाही की या अपडेट मध्ये कोणत्या विशेष फीचर मध्ये सुधार करण्यात आला आहे याची. 

या डिवाइस मध्ये एक 5.99-इंचाचा FHD+ डिस्प्ले 2180×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह मिळत आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर सह लॉन्च करण्यात आला आहे. Redmi Note 5 Pro डिवाइस मध्ये तुम्हाला हाच चिपसेट मिळत आहे. फोन 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्यतिरिक्त 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट मध्ये पण लॉन्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याचा एक 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वर्जन लवकरच Rs 14,999 च्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. 

फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत आहे, यात तुम्हाला एक 13-मेगापिक्सल आणि एक 5-मेगापिक्सल चा ड्यूल सेंसर मिळत आहे. सोबतच फोन मध्ये एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. याव्यतिरिक्त फोन मध्ये तुम्हाला रियर कॅमेरा सह एक LED फ्लॅश मिळत आहे, तसेच तुम्हाला फ्रंट कॅमेरा सोबत एक सॉफ्ट फ्लॅश आहे. फोन मध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे. त्याचबरोबर यात एंड्राइड 8.1 Oreo सह 5,000mAh क्षमता असलेली बॅटरी आहे.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo