अधिकृत लॉन्च च्या आधीच Asus Zenfone 5 स्मार्टफोन ची किंमत झाली लीक, जाणून घ्या कोणत्या किंमतीत केला जाऊ शकतो लॉन्च

अधिकृत लॉन्च च्या आधीच Asus Zenfone 5 स्मार्टफोन ची किंमत झाली लीक, जाणून घ्या कोणत्या किंमतीत केला जाऊ शकतो लॉन्च
HIGHLIGHTS

Asus Zenfone 5 स्मार्टफोन MWC 2018 मध्ये दिसला आहे, हा उद्या चीन आणि तैवान च्या बाजारात सादर केला जाऊ शकतो.

असे समोर येत आहे की Asus आपला Asus Zenfone 5 स्मार्टफोन लवकरच लॉन्च करू शकते. तसेच यात एक नॉच असण्याची शक्यता आहे. कंपनी हा स्मार्टफोन MWC 2018 मध्ये सादर केला होता आणि असा अंदाज व्यक्त केला जात आहे की कंपनी हा डिवाइस भारत, चीन आणि तैवान इत्यादी बाजारांत सादर करू शकते. हा स्मार्टफोन उद्या चीन आणि तैवान मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. 
पण जरी हा अजून लॉन्च झाला नसला तरी याची किंमत याच्या अधिकृत लॉन्च च्या आधी समोर आली आहे. MyDrivers च्या एका रिपोर्ट नुसार या डिवाइस ची किंमत NT 11,900 डॉलर असू शकते, जी जवळपास 2600 युआन किंवा Rs 26,000 एवढी आहे. 
जर Asus Zenfone 5 स्मार्टफोन च्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर हा एका 6.2-इंचाच्या IPS LCD डिस्प्ले सोबत नॉच डिजाईन सह लॉन्च केला जाईल. याव्यतिरिक्त हा एका 
19:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले 2246×1080 पिक्सल सह येऊ शकतो.  
इतर काही स्पेक्स पाहता हा डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट सह लॉन्च केला जाऊ शकतो, त्याचबरोबर स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 6GB ची रॅम सह 64GB ची इंटरनल स्टोरेज पण मिळू शकते. असे पण बोलले जात आहे की हा डिवाइस तैवान मध्ये 4GB आणि 6GB च्या रॅम सह सादर केला जाऊ शकतो. पण अजून याबद्दल काही अधिकृतपणे समोर आले नाही. 
फोन मधील कॅमेरा पाहता यात तुम्हाला एक सोनी IMX363 चा 12-मेगापिक्सल चा ड्यूल कॅमेरा मिळू शकतो. तसेच स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण मिळण्याची शक्यता आहे. फोन मध्ये तुम्हाला एक 3,000mAh क्षमता असलेली बॅटरी फास्ट चार्जिंग सह मिळणार आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन एंड्राइड 8.0 Oreo वर सादर केला जाईल.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo