रोटेटिंग कॅमेरा आणि फ्लॅगशिप चिपसेट SD 855 सह ASUS ZENFONE 6 झाला लॉन्च

रोटेटिंग कॅमेरा आणि फ्लॅगशिप चिपसेट SD 855 सह ASUS ZENFONE 6 झाला लॉन्च
HIGHLIGHTS

यात आहे रोटेटिंग कॅमेरा

चालतो स्नॅपड्रॅगॉन 855 वर

Asus ZenFone 6 लॉन्च झाला आहे. तैवानी कंपनी असुस ने स्पेन मध्ये आयोजित एका इवेंट मध्ये आपला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा मोबाईल फोन गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या ZenFone 5Z स्मार्टफोनची जागा घेण्यासाठी सादर केला गेला आहे. Asus ZenFone 6 कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे जो रोटेटिंग कॅमेरा सह आला आहे. बेजल्स कमी करण्यासाठी आणि मोठा डिस्प्ले देण्यासाठी कंपनीने स्मार्टफोन मध्ये रोटेटिंग कॅमेरा दिला आहे.

ASUS ZENFONE 6 ची किंमत

Asus ZenFone 6 च्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरीएंटची किंमत EUR 499 (जवळपास Rs 39,100) पासून सुरु होत आहे, तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरीएंट EUR 559 (जवळपास Rs 43,800) मध्ये लॉन्च केला गेला आहे आणि तसेच हाई-एंड वेरीएंट जो 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह येतो त्याची किंमत EUR 599 (जवळपास Rs 47,000) ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोन असुस ई-शॉप वर उपलब्ध करवण्यात आला आहे आणि 25 मे पासून स्मार्टफोनची शिपिंग सुरु होईल. अजूनतरी भारतीय लॉन्चचा खुलासा झालेला नाही.

ASUS ZENFONE 6 चे स्पेसिफिकेशंस

Asus ZenFone 6 मध्ये तुम्हाला 6.4 इंचाचा फुल HD+ IPS डिस्प्ले मिळत आहे ज्याचे रेजोल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे आणि हा 19.5:9 एस्पेक्ट रेश्यो तसेच 92 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो ऑफर करतो. हा स्मार्टफोन ओक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 SoC द्वारा संचालित आहे जो 8GB रॅम आणि एड्रेनो 640 GPU सह पेयर केला गेला आहे.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे तर फोनच्या मागे डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एक 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे ज्याचे अपर्चर f/1.79 आहे आणि हा डुअल LED फ्लॅश सह पेयर्ड आहे तसेच सेकेंडरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड एंगल सेंसर आहे.

असुसच्या या फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळत आहे जी क्विक चार्ज 4.0 ला सपोर्ट करते. डिवाइस मध्ये डुअल स्पीकर, डुअल स्मार्ट एम्पलीफायर आणि 3.5mm ऑडियो जॅक पण मिळत आहे. फोन मध्ये 256GB ची UFS 2.1 इनबिल्ट स्टोरेज मिळत आहे जी माइक्रो SD कार्डने 2TB पर्यंत वाढवता येते.

कनेक्टिविटी बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस USB टाइप-C, NFC, Wi-Fi 802.11ac (Wi-Fi 5), ब्लूटूथ 5.0 आणि GPS कनेक्टिविटी पर्यायांसह येतो. फोनचे डायमेंशन 159.1×75.11×8.1-9.1mm आणि वजन 190 ग्राम आहे.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo