Apple iPhone XR भारतात प्री-ऑर्डर साठी झाला उपलब्ध

Apple iPhone XR भारतात प्री-ऑर्डर साठी झाला उपलब्ध
HIGHLIGHTS

Apple iPhone XR मोबाईल फोनचा 64GB वेरीएंट Rs 76,900, 128GB मॉडेल Rs 81,900 आणि 256GB मॉडेल Rs 91,900 मध्ये विकत घेता येईल.

Apple iPhone च्या नवीन लाइनअप मध्ये iPhone XS Max, iPhone XS आणि iPhone XR आले आहेत. आता भारतात iPhone XR मोबाईल फोन प्री-ऑर्डर केला जाऊ शकतो. iPhone XR मोबाईल फोन बद्दल बोलायचे झाले तर असे म्हणता येईल कि नवीन जेनरेशांच्या म्हणजेच तिन्ही iPhone मध्ये iPhone XR हा एकमात्र असा फोन आहे , जो अफोर्डेबल किंमतीत येतो. पण या फोन मध्ये तुम्हला काही साधारण फीचर मिळत आहेत. या डिवाइस मध्ये तुम्हाला एक LCD पॅनल मिळत आहे, तसेच यात तुम्हाला सिंगल रियर कॅमेरा सेटअप पण मिळत आहे. विशेष म्हणजे यात iPhone X प्रमाणे एक Face ID मिळणार आहे. नवीन प्रोसेसर मुले याच वेग खूप वाढला आहे. हा डिवाइस अनेक रंगांत विकत घेता येईल.

iPhone XR ची किंमत आणि प्री-बुकिंग ऑफर्स

Apple iPhone XR मोबाईल फोनचा 64GB वेरीएंट Rs 76,900, 128GB मॉडेल Rs 81,900 आणि 256GB मॉडेल Rs 91,900 मध्ये विकत घेता येईल. हा डिवाइस तुम्ही एयरटेल, जियो, Paytm Mall आणि अमेझॉन इंडिया व्यतिरिक्त ऑफलाइन बाजारात जाऊन पण प्री-बुक करू शकता, यासाठी तुम्हाला iWorld, Iamgine, आणि इतर स्टोर्स मध्ये जावे लागेल. हा डिवाइस भारतात 26 ऑक्टोबर पासून सेल साठी येणार आहे.हा अतुम्ही ब्लॅक, रेड, कोरल, व्हाईट,आणि येल्लो रंगांत घेऊ शकता.

विशेष म्हणजे जर तुम्ही एयरटेलच्या ऑनलाइन स्टोर वर जाऊन या डिवाइस साठी प्री-बुकिंग केली तर तुम्हाला काह्ही चांगल्या चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. जसे कि तुम्ही हा डिवाइस  तिथे फक्त Rs 14,999 चे डाउन पेमेंट करून बुक कर शकता. सोबतच या डिवाइस वर तुम्हाला EMI म्हणून 24 महिने Rs 3,499 द्यावे लागतील. तसेच तुम्हाला 100GB डेटा प्रति महिना ऑफर करण्यात येत आहे, सोबतच तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, 3 महिने फ्री नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइमचे सब्सक्रिप्शन एका वर्षासाठी मिळत आहे. तसेच रिलायंस जियो कडून तुम्हाला या डिवाइस वर 5 टक्क्यांचा कॅशबॅक EMI वर देण्यात येत तेच. याचबरोबर इतर काही ऑफर्स तुम्हाला तिथे मिळतील. तसेच Paytm Mall वर तुम्हाला या डिवाइस सोबत अतिरिक्त Rs 7,000 ची रेगुलर एक्सचेंज ऑफर मिळत आहे.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo