ऍप्पल फोल्डेबल फोन 2021 पर्यंत येऊ शकतो

ऍप्पल फोल्डेबल फोन 2021 पर्यंत येऊ शकतो

रिपोर्ट्स असे येत आहेत कि Apple आगामी दोन वर्षांत म्हणजे 2021 पर्यंत आपला फोल्डेबल डिवाइस लॉन्च कर करू शकते. सोबतच बोलले जात आहे कि हा अपकमिंग फोल्डेबल डिवाइस iPhone नसून एक iPad असेल. तसेच रिपोर्ट्स मध्ये असे पण सांगण्यात आले आहे कि स्वित्झर्लंड इन्व्हेस्टमेंट बँक UBS च्या विश्लेषकांनी एक सर्वे केला आहे. त्याच्या आधारावरच डिवाइस बद्दल हि माहिती मिळाली आहे. 

तसेच CNET च्या एका रिपोर्टनुसार पण ग्राहक सर्वेक्षणात असे समोर आले आहे कि ऍप्पलच्या एक त्रितीयांश युजर्सनी फोल्डेबल iPhone साठी 600 डॉलर जास्त खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या फोल्डेबल फोन साठी ऍप्पलने अनेक पेटेंट पण फाइल केले आहेत. तसेच गेल्यावर्षी फोल्डेबल फोनच्या फ्लेक्सिबल हिन्ज साठी कंपनीला पेटेंट मिळाले होते. 

बातम्यांनुसार ऍप्पल लवकरच पुढल्या महिन्यात आपले 3 नवीन iPhone लॉन्च करू शकते. याचा अर्थ असा कि सप्टेंबर 2019 पर्यंत कंपनी आईफोन्स सादर करू शकते. या आईफोन मॉडेल्स मध्ये तिसरा फोन iPhone 11 असू शकतो. याआधीच्या सूत्रांनुसार बातमी येत होती कि भारतात बनलेल्या iPhone XR आणि XS पुढल्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट पर्यंत उपलब्ध केला जाऊ शकतो. 

पण याची माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली नव्हती. बोलले जात होते कि या उपलब्धतेनंतर Apple, भारतातील इम्पोर्ट केल्या जाणाऱ्या fully-built devices वरील लोकल टॅक्स वर खूप बचत करू शकते. 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo