Apple एका छोट्या iPhone XE वर काम करू शकते सुरु: रिपोर्ट

Apple एका छोट्या iPhone XE वर काम करू शकते सुरु: रिपोर्ट
HIGHLIGHTS

एका रिपोर्ट मध्ये असे समोर येत आहे कि ऍप्पल आपल्या एका स्मॉलर iPhone XE वर काम सुरु करू शकते, या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 4.8-इंचाची OLED स्क्रीन मिळू शकते.

आता काही दिवसांपूर्वी बातम्या येत होत्या पण त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते. पण आता समोर येत आहे कि iPhone SE ला रिप्लेस करण्याच्या विचाराने ऍप्पल एका छोट्या iPhone वर काम सुरु करू शकते. PC Tablet चा एक रिपोर्ट पाहता त्यातुन असेच काहीसे समोर येत आहे.

या रिपोर्ट मध्ये असे समोर येत आहे कि Apple एक नवीन छोटा iPhone लवकरच आणू शकते, असे पण म्हणता येईल कि यावर कंपनीने काम सुरु केले असे समोर येत आहे. जरी या मोबाईल फोन बद्दल या रिपोर्ट मध्ये अजून जास्त काही समोर आले नाही तरी इतके निश्चित आहे कि या मोबाईल फोनचे नाव iPhone XE असणार आहे.

या रिपोर्ट मधून समोर आलेल्या सूत्रांनुसार iPhone XE मध्ये तुम्हाला iPhone X किंवा XS सारखीच एज-टू-एज 4.8-इंचाची AMOLED स्क्रीन मिळणार आहे, तसेच यात तुम्हाला एक नॉच पण दिसणार आहे.

तसेच iPhone XE मध्ये तुम्हाला फेस ID पण मिळेल, यात तुम्हाला टच ID मिळणार नाही, त्याचबरोबर यात तुम्हाला होम बटण पण मिळणार नाही. असे पण समोर येत आहे कि या आगामी मोबाईल फोनची किंमत 600 डॉलर ब्रॅकेट मध्ये असेल.

नोट: फीचर्ड इमेज काल्पनिक आहे!

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo