ऑडर साठी भारतात उपलब्ध झाला LG V40 ThinQ

ऑडर साठी भारतात उपलब्ध झाला LG V40 ThinQ
HIGHLIGHTS

LG चा लेटेस्ट फोन V40 ThinQ भारतात आता ऑर्डर्स साठी उपलब्ध व्हायला सुरु झाला आहे. Amazon.in ने या नवीन स्मार्टफोनच्या ऑर्डर्स स्वीकारण्यास सुरवात केली आहे आणि लवकरच यूजर्स हा विकत घेऊ शकतील.

महत्वाचे मुद्दे:

  • ड्यूल सेल्फी कॅमेरा आहे यात
  • ऑक्टोबर 2018 मध्ये स्मार्टफोनचा झाला होता खुलासा
  • ट्रिपल कॅमेरा आहे यात

साउथ कोरियन कंपनी LG ने आपला स्मार्टफोन V40 ThinQ भारतात ऑर्डर साठी उपलब्ध केला आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये या फोनचा खुलासा केला गेला होता. ई-कॉमर्स वेबसाइट Amazon.in ने नवीन एलजी फोन साठी ऑर्डर घेण्यास सुरवात केली आहे. तसेच फोनची शिपिंग 24 जानेवारी पासून सुरु होईल. जर भारतीय बाजारातील एलजी वी40 थिंक च्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर याची किंमत 60,000 रुपये आहे. तर Amazon.in ने डिवाइस 49,990 रुपयांमध्ये लिस्ट केला आहे. हा फोन ग्रे आणि ब्लू रंगांत विक्रीसाठी उपलब्ध होईल. सर्व खास डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि बजाज फिनसर्व कार्ड सह बिनव्याजी ईएमआई ची सुविधा पण ग्राहकांना दिली जाईल.

Amazon Prime मेम्बर्स साठी या आहेत ऑफर्स

विशेष म्हणजे LG V40 ThinQ Great Indian Sale मध्ये Amazon Prime यूजर्स ऑर्डर करू शकतात. या अंतर्गत फोन सोबत अनेक ऑफर्स यूजर्स साठी देण्यात आल्या आहेत. एचडीएफसी बॅंकेच्या कार्डचा वापर करून 10 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता. अमेझॉन प्राइम मेम्बर्सना अतिरिक्त 1,000 रुपयांचा कॅशबॅक Amazon Pay मध्ये मिळेल. सोबत वन-टाइम फ्री स्क्रीन रिप्लेस्मेंट ऑफर पण दिली जात आहे ज्याची किंमत 16,750 रुपये आहे पण हि फोन विकत घेतल्यांनंतर सहा महिने वैध असेल. तसेच जुना फोन एक्सचेंज केल्यास 5,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जाईल.

LG V40 ThinQ स्पेसिफिकेशन

फोनचे खास फीचर पाहता हा फोन पाच कॅमेरा सेंसर सह येतो ज्यात तीन रियर आणि दोन सेल्फी कॅमेरा देण्यात आले आहेत. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर, आईपी68 वाटर आणि डस्ट रेसिस्टेंस, मिलिट्री ग्रेड बिल्ड, बूमबॉक्स स्पीकर आणि 19.5:9 ओलेड डिस्प्ले आहे. LG V40 ThinQ हँडसेट आउट ऑफ बॉक्स एंड्रॉयड 8.1 ओरियो वर चालतो. यात 6.4 इंचाचा क्वाडएचडी+ (1440×3120 पिक्सल) ओलेडे फुलविजन पॅनल आहे. याचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 आहे. सोबतच हा कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या प्रोटेक्शन सह येतो.

फोन मध्ये फ्लॅगशिप ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर सह 6 जीबी अराम देण्यात आला आहे. इनबिल्ट स्टोरेज 128 जीबी आहे आणि तुम्ही 2 टीबी पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्डचा वापर करू शकता. LG V40 ThinQ सह ट्रिपल प्रिव्यू फीचर पण देण्यात आला आहे. याच्या मदतीने युजर आपल्या तीन रियर कॅमेऱ्याने तीन वेगवेगळे शॉट घेऊ शकतील. त्यानंतर त्यांच्याकडे बेस्ट फोटो सीलेक्ट करण्याचा ऑप्शन येतो.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo