OnePlus 6T, Honor Play, Honor 8X आणि इतर मोबाईल फोन्स वर मिळेल बेस्ट डिस्काउंट, बघा डिटेल्स

OnePlus 6T, Honor Play, Honor 8X आणि इतर मोबाईल फोन्स वर मिळेल बेस्ट डिस्काउंट, बघा डिटेल्स

Amazon India वर Amazon Fab Phones Fest Sale चे आयोजन 11 एप्रिल पासून होणार आहे, विशेष म्हणजे या सेल मध्ये तुम्हाला OnePlus 6T, Honor Play, Honor 8X व्यतिरिक्त Honor 8C सह Honor 7C मोबाईल फोन वर पण बेस्ट ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहे. हा सेल पूर्णपणे मोबाईल फोन वर आधारित आहे, आणि 11 एप्रिल पासून सुरु होऊन 13 एप्रिल पर्यंत चालणार आहे, असे पण समोर येत आहे कि या सेल मध्ये तुम्हाला Realme U1, Oppo F9 Pro, Vivo V15 Pro आणि Oppo F11 Pro मोबाईल फोन्स वर बेस्ट ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहे.

तसेच तुम्हाला iPhone XR पण या सेल मध्ये सर्वात कमी किंमतीत विकत घेता येईल. त्याचबरोबर या सेल मध्ये तुम्ही Huawei Mate 20 Pro मोबाईल फोन पण या तीन दिवसांच्या सेल मध्ये विकत घेऊ शकता. या मोबाईल फोन वर तुम्हाला बेस्ट ऑफर्स मिळणार आहेत.

जर Microsite बद्दल बोलायचे झाले तर Fab Phones Fest Sale जो अमेझॉन इंडिया वर होणार आहे, या सेल मध्ये तुम्हाला OnePlus 6T मोबाईल फोन फक्त 34,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल, याची मूळ किंमत पाहता हा तुम्हाला Rs 37,999 मध्ये मिळतो. त्याचबरोबर यात तुम्हाला HDFC बँकेच्या कार्ड्स वर Rs 1,500 चा डिस्काउंट पण मिळत आहे.

अमेझॉन ने अशी पण घोषणा केली आहे कि या सेल मध्ये OnePlus 6T मोबाईल फोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट तुम्ही 3,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट सह विकत घेऊ शकता, तसेच जर तुम्ही याचा 8GB आणि 128GB वेरिएंट किंवा 8GB आणि 256GB मॉडेल घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो कि तुम्हाला या दोन्ही मॉडेल्स वर Rs 4000 चा डिस्काउंट मिळत आहे.

तसेच जर तुम्ही Honor Play मोबाईल फोन विकत घेऊ इच्छित असाल तर या सेल मध्ये हा मोबाईल फोन Rs 13,999 मध्ये घेता येईल, याची खरी किंमत Rs 19,999 आहे. त्याचबरोबर Honor 8X मोबाईल फोन तुम्ही फक्त Rs 12,999 मध्ये घेऊ शकता, Honor 8X मोबाईल फोन तुम्ही Rs 2000 च्या डिस्काउंट सह विकत घेऊ शकता.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo