७००० रुपयांच्या आत येणारा अल्काटेल पॉप स्टार स्मार्टफोन लाँच

HIGHLIGHTS

ह्या स्मार्टफोनमध्ये 1GB रॅम आणि 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे. ह्या स्टोरेजला 32GB च्या मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवूही शकतो.

७००० रुपयांच्या आत येणारा अल्काटेल पॉप स्टार स्मार्टफोन लाँच

अल्काटेलने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन पॉप स्टार लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ह्या फोनमध्ये 5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ही डिस्प्ले 16M रंगांना सपोर्ट करते. ह्या फोनमध्ये मिडियाटेक MT6580 चिपसेट दिला गेला आहे, जो क्वाड-कोर प्रोसेसर आहे. ज्याची क्लॉक स्पीड 1.3GHz आहे. ह्यात माली 400MP2 सुद्धा दिला गेला आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

ह्या स्मार्टफोनमध्ये 1GB रॅम आणि 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. ह्या स्टोरेजला 32GB च्या मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवूही शकतो. ह्या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हा कॅमेरा LED फ्लॅशने सुसज्ज आहे आणि ह्यात HD व्हिडियो रेकॉर्ड केली जाऊ शकते. फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे.
 

हेदेखील वाचा – हे आकर्षक स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच

हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. ह्या फोनमध्ये वायफाय, ब्लूटुथ 4.0, 2G/3G/4G साठी सपोर्ट करतो. ह्या स्मार्टफोनला मेटल सिल्वर आणि मेटल गोल्ड रंगांत उपलब्ध केला आहे.

हेदेखील वाचा – 6000mAH क्षमता असलेला हा आहे झोलोचा सुपर स्लिम X060 पॉवर बँक, किंमत ९९९ रुपये
हेदेखील वाचा – 
कूलपॅड मॅक्स भारतात झाला लाँच, किंमत २४,९९९ रुपये

Content Writer - Marathi View Full Profile