MWC 2018: हुवावे ने MateBook X Pro हा 13.9-इंचाचा लॅपटॉप केला सादर

MWC 2018: हुवावे ने MateBook X Pro हा 13.9-इंचाचा लॅपटॉप केला सादर
HIGHLIGHTS

कनेक्टिविटी साठी यात USB टाइप-A पोर आणि हुवावे शेयर पण देण्यात आला आहे.

MWC 2018 मध्ये आज हुवावे ने आपला MateBook X Pro लॅपटॉप सादर केला. या लॅपटॉप मध्ये मेटल बॉडी डिजाइन सँडब्लास्ट फिनिश सह देण्यात आली आहे. हा 13-इंचाच्या MacBook Pro पेक्षा बारीक आहे. यात एक ‘इंटेलीजेंट कूलिंग सिस्टम’ पण आहे. ज्यात एक "शार्क फिन" डिजाइन देण्यात आली आहे. यात एक फुल-साइज बॅकलिट स्पील प्रूफ कीबोर्ड पण आहे. 

याची किंमत पाहता याच्या i5/8GB RAM/256GB वेरियंट ची किंमत EUR1499 (जवळपास Rs 1,19,257), i7/8GB RAM/512GB च्या वेरियंट ची किंमत EUR1699 (जवळपास Rs 1,35,169) आणि i7/16GB RAM/512GB वेरियंट ची किंमत EUR1899 (जवळपास Rs 1,50,000) आहे. हा लॅपटॉप काही नेमक्या मार्केट मध्ये 2018 च्या दुसर्‍या तिमाहीत उपलब्ध होईल.
MateBook X Pro मध्ये 8th जनरेशन चा इंटेल प्रोसेसर आहे जो GeForce MX150 GUP सह देण्यात आला आहे. यात 14-इंचाचा एक 91% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो असलेला डिस्प्ले आहे, ज्याचा रेजोल्यूशन 3000 x 2000 पिक्सल आहे. या लॅपटॉप मध्ये थंडरबोल्ट 3 साठी सपोर्ट देण्यात आला आहे ज्याचा अर्थ असा की हा Nvidia GeForce GTX 1080 पर्यंतच्या एक्सटर्नल ग्राफिक्स कार्ड ला सपोर्ट करू शकतो आणि 4K डिस्प्ले चा सपोर्ट पण यात आहे. 
 
हा डिवाइस डॉल्बी साउंड सपोर्ट सह येतो. कंपनी ने सांगितले की हा एका मोठ्या ट्रॅकपॅड सह येईल. कनेक्टिविटी साठी यात USB टाइप-A पोर आणि हुवावे शेयर पण देण्यात आला आहे. 
या सोबत यात एक फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो पॉवर बटन मध्ये एम्बेडेड आहे. हा एका पॉकेट चार्जर सह येतो, जो फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करतो. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo