ह्या कंपनीने 11.6 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1366x768 पिक्सेल आहे. हा डिवाइस क्वाड-कोर इंटेल अॅटम Z3735F (1.33GHz) प्रोसेसर दिला आहे. त्याचबरोबर हा लॅपटॉप 32GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.
मायक्रोमॅक्सने भारतात विंडोज 10 ने सुसज्ज असलेला एक नवीन लॅपटॉप कॅनवास लॅपबुक L1160 लाँच केला आहे. ह्या लॅपटॉपची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्या लॅपटॉपची किंमत केवळ १०,४९९ रुपये ठेवली आहे. हा लॅपटॉप ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
ह्या लॅपटॉपच्या अन्य स्पेक्सवर नजर टाकली तर , ह्यात कंपनीने 11.6 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1366×768 पिक्सेल आहे. ह्या डिवाइसमध्ये क्वाड-कोर इंटेल अॅटम Z3735F (1.33GHz) प्रोसेसर दिला आहे. त्याचबरोबर हा लॅपटॉप 32GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्ड किंवा एक्सटर्नल HDD च्या साहाय्याने वाढवू शकतो. ह्या लॅपटॉपमध्ये कंपनीने 2GB चे DDR3 रॅम दिली आहे. हा इंटेल HD ग्राफिक्ससह येतो. ह्या डिवाइसमध्ये 4100mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या डिवाइसमध्ये वायफाय 802.11 b/g/n, ब्लूटुथ v4.1, दोन USB 2.0 पोर्ट, एक HDMI पोर्ट आणि एक इथरनेट पोर्ट दिले आहे. लॅपटॉपचे परिमाण 295.5×199.5x18mm आहे. ह्याचे वजन 1.13 किलोग्रॅम आहे.