लॅपटॉप बाइंग गाईड 2018

लॅपटॉप बाइंग गाईड 2018
HIGHLIGHTS

तुम्हाला तुमच्यासाठी एक योग्य लॅपटॉप निवडण्यास अडचण येत आहे का? इथे आम्ही तुम्हाला एक लॅपटॉप बाइंग गाईड देत आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यासाठी एक योग्य लॅपटॉप निवडू शकाल, तुमची मदत व्हावी म्हणून आम्ही इथे काही महत्वपूर्ण गोष्टींची माहिती दिली आहे.

आजकाल अनेक पर्याय उपलब्द झाल्यामुळे लॅपटॉप विकत घेणे एक कठीण काम झाले आहे. प्रत्येक संभावित घटकांसाठी अनेक पर्याय आहेत, पण तुम्ही त्याचा वापर कशासाठी करणार आहात याआधारे लॅपटॉप चे पर्याय बघणे सर्वात चांगले. तुम्ही तुमचा लॅपटॉप भरपूर गेमिंग करण्यासाठी वापरणार आहात कि फक्त चित्रपट बघण्यासाठी याचा वापर करणार आहात? कि तुम्ही हा तुमची सर्व कामे करण्यासाठी वापरणार आहात? कि तुम्ही कॉलेज इत्यादी साठी वापरणार आहात? तांत्रिक शब्द, आकडे थोडे कठीण वाटू शकतात पण काळजी नसावी आम्ही प्रत्येक तांत्रिक बाब, प्रत्येक शब्द, प्रत्येक स्पेसिफिकेशन तुम्हाला सहज समझावी म्हणून हि मार्गदर्शिका तुमच्यासाठी बनवली आहे. जी तुम्हाला तुमचा निर्णय घेण्यास मदत करेल.

एकदा का तुम्ही तुम्हाला आवश्यक स्पेसिफिकेशन आणि फीचर्सची यादी बनवली कि मग तुम्ही आम्ही दिलेली माहिती वाचून एक तुमच्या योग्य लॅपटॉप निवडू शकाल, व्हा पुढे आणि त्या प्रमुख विशेषता बघून तुमचा प्रवास सुरु करा. ठरवा तुम्हाला काय हवं आहे आणि काय नको.

लॅपटॉप कोणत्या कामासाठी वापरणार आहेत

सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुमच्या लॅपटॉपचा होणारा वापर. तुम्ही तुमचा लॅपटॉप कोणत्या कामासाठीही वापरणार आहात हे लॅपटॉप विकत घेण्यासाठी महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या लॅपटॉप वर केली जाणारी कामे किंवा त्याचा वापर चार भागात विभाजित करू शकता, ज्यांच्याबंद्दल आपण पुढे बोलणार आहोत. तुमच्या वापरा नुसार तुमच्या लॅपटॉप मध्ये काय काय असले पाहिजे हे ठरवणे सोप्पे होईल.

 

लाइट यूज

म्हणजे जेव्हा तुम्ही दिलेले काम करण्यासाठी कम्प्युटरला जास्त त्रास घ्यावा लागत नाही. यात वेब सर्फिंग, ऑनलाइन बिल भरणे, ईमेल आणि सोशल मीडियाचा वापर अशा कामांचा समावेश आहे. यात चित्रपट स्ट्रीम करणे आणि ऑनलाईन कन्टेन्ट बघणे याचा देखील समावेश होतो. थोडक्यात तुम्ही लॅपटॉपचा वापर सोप्पी सोप्पी कामे करण्यासाठी करणार आहात.

मीडियम यूज

जे लोक काम करताना खूप जास्त टाइपिंग करतात, ज्यांना फोटो ब्राउज आणि एडिट करण्याची गरज पडते. किंवा मग तुम्ही विद्यार्थी असाल जो एखाद्या रिसर्च वर काम करत आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीच्या वेब ब्राउजर च्या असंख्य टॅब उघडाव्या लागणार असतील. किंवा तुमच्याकडे फुल्ल एचडी मूवीज ची लाइब्रेरी असल्यास तुमच्या मीडिया प्लेयर ला थोड्या जास्त शक्तिशाली लॅपटॉपची गरज पडेल जेणेकरून तुम्ही चित्रपट किणत्याही लॅग विना सहज बघू शकाल.

 

हेवी आणि डिमांडिंग यूज

जर तुम्ही एक कॉन्टेंट निर्माता किंवा एक मोठे हेवी गेमरअसाल तर तुमचा लॅपटॉप सर्वात जास्त हाई-एंड कंपोनंट्सनी बनलेला असणे आवश्यक आहे. जेणेकरून जरी तुम्ही यावर फोटोशॉप किंवा वीडियो एडिटिंग टूल किंवा जरी PUBG खेळलात तरी हा कोणत्याही अडचणी विना सहज चालेल. तुमच्या गरज पूर्ण करण्यासाठी तुमच्या लॅपटॉप मध्ये एका खूप विशिष्ट सेट ची आवश्यकता असते ज्यामुळे तुम्हाला त्याचा पुरेपूर वापर करता येतो.

एकदा का तुम्ही तुमचा वापर ठरवला कि मग तुम्ही मुख्य 6 स्पेसिफिकेशन आहेत त्यांचा विचार करू शकता. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या योग्य लॅपटॉप निवडू शकतो जो पुढे जाऊन तुमच्या कामी येईल.

प्रोसेसर

फायदा: प्रोसेसर जितका जास्त सक्षम असेल, तुम्ही तुमच्या लॅपटॉप काढून तेवढेच जास्त काम करवून घेऊ शकता.

याचा अर्थ काय: प्रोसेसर म्हणजे तुमच्या कम्प्यूटर चा मेंदू. म्हणून जर तुमचा मेंदू वेगवान असेल तर तुम्ही वेगाने आणि अचूकपणे काम करू शकाल.

प्रोसेसर टाइप

प्रोसेसर दोन कंपन्या बनवतात; इंटेल आणि एएमडी. साधारणतः तुम्हाला लॅपटॉप मध्ये इंटेल किंवा एएमडी प्रोसेसर मिळतील. प्रत्येक कंपनी प्रोसेसर सीरिजच्या वेगवेगळ्या श्रेण्या बनवते. इंटेल कडे पेंटियम, सेलेरॉन आणि कोर आई सिरीज आहे तर एएमडी मध्ये ए, एफएक्स आणि रेजेन प्रोसेसर सिरीज आहेत. हा एक ब्रेकडाउन आहे जो प्रत्येक प्रोसेसर सिरीज कशा प्रकारे युजर्सना उपयोगी पडते ते ठरवतो. प्रत्येक प्रोसेसर सिरीज ची माहिती आम्ही खाली दिली आहे ती नक्की वाचा.

इंटेल पेंटियम

इंटेल पेंटियम प्रोसेसर सोन्याच्या आणि चांदीच्या स्वरूपात लेबल केले जातात. हे सर्वात बेसिक लॅपटॉप मध्ये असतात आणि त्यांनीच वापरावे ज्यांचा वापर "लाईट युज" श्रेणी मध्ये येतो. हे फक्त लॅपटॉप च्या लाइट ब्राउजिंग साठी वापरले जाऊ शकतात आणि कदाचित एक किंवा दोन यूट्यूब वीडियो तुम्ही यावर सहज बघू शकाल.

इंटेल सेलेरॉन

इंटेल सेलेरॉन सिरीज पेंटियम च्या तुलनेत थोडी जास्त शक्तिशाली आहे, जी काही मोठ्या एक्सेल फाईल्स चालवण्यासाठी किंवा काही गुंतागुंतीचे पावरपॉइंट प्रेझेन्टेशन चालवण्यासाठी पुरेपूर ताकद देते.

 

इंटेल कोर आई7

लॅपटॉप साठी इंटेल च्या प्रोसेसर मधील सर्वात शक्तिशाली. कोर i7 प्रोसेसर सह येणाऱ्या मशिन्स एविड गेमर्स, व्यावसायिक फोटो एडिटर्स तसेच वीडियो एडिटिंग साठी उपयुक्त आहेत. याचा वापर त्यांनीच करावा ज्यांचे काम खूप जास्त आहे.

एएमडी ए सीरीज

एएमडी च्या ए सिरीज मध्ये ए4, ए6, ए9, ए10 आणि ए12 प्रोसेसर येतात, यात जेवढा अंक मोठा तेवढा तो प्रोसेसर ताकदवान आहे. यातील ए4, ए6 लाईट युज साठी असलेल्या तसेच हेवी युज साठीच्या लॅपटॉप मध्ये ए10 आणि ए12 प्रोसेसर असतात.

एएमडी एफएक्स सीरीज

डेस्कटॉप सीपीयू चा फ्लॅगशिप असणाऱ्या या एफएक्स सिरीज मध्ये लॅपटॉप साठी फक्त दोन प्रोसेसर आहेत आणि त्यानं एक्सेलेरेटेड प्रोसेसिंग युनिट्स किंवा एपीयू असे म्हणतात कारण ते एएमडी चे रेडॉन ग्राफिक्स चिप प्रोसेसर मध्ये सामावून घेतात.

एएमडी रेजेन

रेजेन प्रोसेसर एएमडी च्या प्रोसेसर लाइनअप चे टॉप प्रोसेसर आहेत. रेजन 3 सिरीज इंटेल कोर i5 सारखी आणि रेजेन 7 सिरीज इंटेल कोर i7 सारखी परफॉर्मन्स देते.

सर्व प्रोसेसर मध्ये कोर आणि क्लॉक स्पीड असतो, ज्यांच्या जोरावर एखादा प्रोसेसर किती शक्तिशाली आहे हे ठरते. पण याच अर्थ असा नाही कि प्रोसेसर मध्ये अगणित कोर आणि क्लॉक स्पीड देता येईल. खाली तुम्ही कोर आणि क्लॉक स्पीड बद्दल सविस्तर वाचू शकता.

कोर्स

फायदा: जास्त कोर्स = हेवी ड्यूटी मल्टीटास्किंग

याचा अर्थ काय: कोर एका कारखान्यातील कामगाराप्रमाणे आहेत. जेवढे जास्त कामगार असतील कारखान्यात काम पण तेवढेच होईल. पण फक्त कोर वर प्रोसेसर ची परफॉर्मन्स अवलंबून नसते, त्यासाठी क्लॉक स्पीडचा पण विचार करावा लागतो.

प्रो टिप: ज्या प्रोसेसर मध्ये चार कोर किंवा क्वाड कोर आहेत तो तुमची दैनंदिन कामे सहज करू शकतो.

क्लॉक स्पीड

फायदा: जास्त क्लॉक स्पीड म्हणजे तुमचे काम लवकर होईल.

याचा अर्थ काय: याचे मापन गिगाहर्ट्ज (GHz) मध्ये केले जाते. क्लॉक स्पीड वर तुमच्या लॅपटॉप मधील कोर चा वेग अवलंबून असतो जेवढा जास्त क्लॉक स्पीड तेवढा जास्त वेग. जर कारखाण्यातील कामगार कोर असतील तर त्यांचा काम करण्याचा वेग म्हणजे क्लॉक स्पीड.

प्रो टिप: लक्षात असू दे, प्रोसेसर जितका जास्त शक्तिशाली (जास्त कोर + वेगवान क्लॉक स्पीड) असेल, तेवढ्याच वेगाने तो तुमच्या लॅपटॉप ची बॅटरी संपवेल. इथे सीपीयू म्हणजे एखादी स्पोर्ट्स कार आणि तुमची बॅटरी म्हणजे तिचे इंधन. जेवढ्या वेगाने तुम्ही कार चालवता तेवढ्या वेगाने टॅंक रिकामा होईल.

मेमरी किंवा रॅम

फायदा: जास्त रॅम = शानदार मल्टीटास्किंग

जास्त रॅमचा अर्थ असा कि तुम्ही कोणत्याही अडचणी विना एकाच वेळी जास्त एप्लिकेशन वापरू शकता.

याचा अर्थ काय: रॅम इंटर्नल मेमरी आहे, जी तुम्ही वापरत असलेले आणि ओपन असलेले सर्व ऍप्प्स, फाईल्स आणि गेम स्टोर करते. जास्त रॅम असल्यास यातील जास्त फाइल्स ओपन करता येतात आणि असे करूनही तुम्हाला एक सहज, हँग न झालेला लॅपटॉप वापरता येतो. साधारणपणे लॅपटॉप 4, 8 किंवा 16 जीबी रॅम सह येतात, पण 8 जीबी हा एक योग्य रॅम आहे. रॅम बद्दल अजूनही काही माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे जी आम्ही खाली दिली आहे ती नक्की वाचा.

रॅम प्रकार

लेटेस्ट रॅम प्रकार डीडीआर 4 आहे, जो जुन्या डीडीआर 3 पिकधा वेगवान आहे, जास्त अचूक आहे आणि आजकाल स्टॅंडर्ड होत चालला आहे. जुना डीडीआर 3 कमी वेगवान आहे आणि जास्त शक्तिचा वापर करतो.

प्रो टिप: डीडीआर 4 रॅम असलेलाच लॅपटॉप विकत घ्या कारण हा वीज वाचवतो, बॅटरी लाईफ मध्ये सुधार आणतो आणि तुमचा लॅपटॉप फ्युचर प्रूफ करतो. डीडीआर 3 रॅम स्वस्त आहे आणि कदाचित लवकरच डीडीआर 3 रॅम विलुप्त पण होऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला अपग्रेड किंवा रिप्लेसमेंट मिळणे कठीण जाईल.

अपग्रेडेबिलिटी

वेळेबरोबर तुमच्याकंदील एप्लिकेशन, तुम्ही वापरात असलेली ऑपरेटिंग सिस्टम नवीन वर्जन वर अपग्रेड केली जाईल आणि त्यामुळे तुम्हाला जास्त रॅम ची आवश्यकता पडू शकते. तसे न केल्यास परफॉर्मंस मंदावू शकते किंवा सिस्टम हँग होऊ शकते. जर तुम्ही रॅम अपग्रेड केलात तर तुम्ही लॅपटॉप च अवतार खूप जास्त काळासाठी करू शकता, आणि जर तुम्ही फक्त 4 जीबी रॅम वाला लॅपटॉप विकत घेतला असेल तर तुम्ही करणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रो टिप: आजकाल चे ऍप्लिकेशन, प्रोग्रॅम्स त्यांचा वापर पाहता आम्ही निदान 8 जीबी रॅम असलेला लॅपटॉप विकत घेण्याचा सल्ला देतो. पण जर तुम्ही गेमिंग करण्याचा विचार करत असाल किंवा हेवी सॉफ्टवेयर जसे कि फोटोशॉप, ऑटोकॅड इत्यादी वापरात असाल तर, तुम्ही कमीत कमी 16 जीबी रॅम वापरला पाहिजे.

 

स्क्रीन

फायदा: योग्य स्क्रीन वरच तुमचा लॅपटॉप वापरण्याचा अनुभव अवलंबून असतो कारण मागे काहीही चालू असले तरी तुम्हाला समोर काय दिसतंय यावर सर्व अवलंबून असते.

याचा अर्थ काय: डिस्प्ले तुम्हाला लॅपटॉपशी जोडता आणि तुम्हाला खिळवून ठेवतो. यावर तुम्ही चित्रपट बघता, गेम खेळता तसेच सर्व टाइपिंग पण करता. प्रत्येकाच्या गरज वेगवेगळ्या असतात पण त्या शोधणे पण तेवढे सोप्पे पण असते. डिस्प्ले वेगवेगळ्या आकारात आणि त्यात वेगवेगळी टेक्नॉलॉजी आणि रेजोल्यूशन असते. काही डिस्प्ले ठराविक कामांसाठी बनलेले असतात. साधारणतः तुम्ही 1080P किंवा फुल एचडी रेजोल्यूशन सह येणार डिस्प्ले वापरला पाहिजे, पण जर तुमचं अवतार हेवी असेल तर मात्र तुम्ही इतर घटकांचा विचार केला पाहिजे. त्याची सविस्तर माहिती आम्ही खाली दिली आहे.

स्क्रीन साइ

फायदा: मोठा डिस्प्ले असल्यामुळे तुम्ही वस्तू सहज बघू शकता. पण स्क्रीन वेगवेगळ्या साईझ मध्ये येतात आणि त्यांचे मापन कर्णापासून केले जाते.

याचा अर्थ काय: सर्वात सामान्य स्क्रीन आकार 15 इंच आहे, पण 11, 13 इंचाचे लॅपटॉप पण मिळतात तसेच लॅपटॉप स्क्रीनचा आकार 17 इंचावर पण जाऊ शकतो. हे पण लक्षात घ्या स्क्रीनचा आकार जेवढा जास्त असेल तेवढाच लॅपटॉप वजनदार होईल. याचे कारण डिस्प्ले बनवण्यासाठी लागणारी काच आहे ती टिकावू बनवली जाते आणि त्यामुळे लॅपटॉपचे वजन वाढते.

प्रो टिप: जर तुम्ही तुमचा लॅपटॉप घेऊन जास्त प्रवास करणार असाल तर तुम्ही तुमचा लॅपटॉप 11-इंच ते 14-इंचाच्या दरम्यानच्या स्क्रीन साईझ चा घ्यावा.

स्क्रीन प्रकार IPS विरुद्ध नॉन-IPS

फायदा: आईपीएस डिस्प्ले जसे रंग असतात तसे दाखवतो म्हणजेच खरे रंग दाखवतो. तसेच 2-3 लोक जरी तुमच्या स्क्रीनच्या आजूबाजूला बसले तरी ब्रायटनेस न गमावता सर्व जण चांगली चित्र बघू शकतात.

याचा अर्थ काय: ज्या लोकांना सर्वोत्तम पिक्चर क्वालिटी हवी आहे आणि खरे वाटणारे रंग हवे आहेत त्यांनी एका आईपीएस डिस्प्ले असेलला लॅपटॉप निवडावा. जर तुमचे बजेट कमी असेल तर मात्र तुम्ही असा डिस्प्ले घेऊ शकता जो आईपीएस नाही. त्यामुळे तुमचे लॅपटॉप ची किंमत पण कमी होते.

प्रो टिप: जास्तीत जास्त कामे नॉन-आईपीएस डिस्प्ले वर सहज होतात. पण जर तुम्ही कलात्मक काम करणारे असाल किंवा जर तुम्हाला मित्रांसोबत चित्रपट बघण्याची सवय असेल तर मात्र तुम्ही आईपीएस डिस्प्ले असलेला लॅपटॉप घेतला पाहिजे.

रेजोल्यूशन

फायदा: हायर रेजोल्यूशन = शार्पेर इमेज, हायर रेजोल्यूशन = जास्त क्लॅरिटी

याचा अर्थ काय: रेजोल्यूशन च्या सांख्यवरून आपल्याला डिस्प्ले वरील पिक्सेलची माहिती मिळते. याचे मापन रुंदी x उंची असे केले जाते. जेवढे पिक्सल जास्त तेवढे स्पहस्त आणि शार्प चित्र दिसते. कधी कधी तुम्ही हे एचडी-रेडी (720P), फुलएचडी (1080P) किंवा 4K (2160P) या स्वरूपात बघू शकता. जेवढे जास्त रेजोल्यूशन तेवढी जास्त बॅटरी वापरली जाते आणि तुमच्या लॅपटॉपची किंमत पण वाढते. त्यामुळे तुम्ही तुमची गरज काय ते पण बघितली पाहिजे.

प्रो टिप: फुल एचडी सध्या एक उत्तम डिस्प्लेचा पर्याय जो चांगली पिक्चर क्वालिटी आणि बॅटरी लाईफ यात समतोल राखतो.

बेजल्स

बेजल म्हणजे काळ्या प्लास्टिकची बॉर्डर जी तुमच्या लॅपटॉप वरील स्क्रीनला घेरून असते. जे दिसायला चांगले दिसत नाहीत पण तुमच्या स्क्रीनला अपघाती डॅमेज पासून वाचवतात. बेजल लेस हा एक नवीन ट्रेंड आहे ज्यामुळे लॅपटॉप निर्माता कमी बॉडी मध्ये जास्त मोठा डिस्प्ले देऊ शकतात. पण अगदीच नसलेल्या बेजल मुळे तुमच्या स्क्रीनला अपघाती डॅमेज होऊ शकतो.

मॅट विरुद्ध ग्लॉसी डिस्प्ले

ग्लॉसी डिस्प्ले खूप प्रसिद्ध आहेत लॅपटॉप मध्ये आणि त्यामागील कारण पण चांगले आहे. ग्लॉसी डिस्प्ले मॉनिटरवर  पॉप रंग चांगले दाखवतो, पण ग्लॉसी डिस्प्ले मध्ये रिफ्लेक्शन जास्त असतात. मॅट डिस्प्ले आता जास्त दिसू लागला आहे आणि हा त्या लोकांसाठी सर्वात जास्त उपयुक्त आहे जे खूप जास्त कन्टेन्ट निर्मिती करतात आणि ज्यांच्या कामात क्लॅरिटीची गरज असते कारण या डिस्प्ले ची किंमत पण प्रीमियम असते.

ग्राफिक्स कार्ड

फायदा: तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या दृश्यांची जबाबदारी यावर असते.

याचा अर्थ काय: ग्राफिक्स कार्ड हि तुमच्या लॅपटॉप मधील एक समर्पित चिप आहे जिची क्षमता गीगाबाइट मध्ये दर्शवली जाते. रॅम प्रमाणे, तुमच्या ग्राफिक्स कार्ड वर जेवढे जास्त जीबी असतील तेवढ्या सहज तुम्ही गेम खेळू शकाल आणि तेही 4K मध्ये पण. फोटो आणि विडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर फोटोशॉप किंवा प्रीमियर असो व मग ऑटोकॅड सारखे डिझाईन सॉफ्टवेअर असो हे चांगले चालण्यासाठी निदान एक एक ग्राफिक्स कार्ड असणे आवश्यकत आहे. जर तुम्ही गेमिंग किंवा खूप कन्टेन्ट निर्मिती करत असाल तर तुम्हाला एका ग्राफिक्स कार्ड सोबत एक मशीन निवडावी लाभेल. सर्व ग्राफिक्स कार्ड एकसारखे नसतात, याची अधिक माहिती आम्ही खाली दिली आहे.

इंटीग्रेटेड विरुद्ध डेडिकेटेड

फायदा: इंटीग्रेटेड ग्राफिक्स प्रोसेसरचा भाग असतो आणि हा बेसिक कामे सहज करू शकतो. पण एक डेडिकेटेड  ग्राफिक्स कार्ड तुम्हाला तुमच्या लॅपटॉप वर गेम खेळण्यास किंवा फोटोशॉप, ऑटोकॅड एवढेच काय तर वीडियो एडिटिंग तसेच कलात्मक कामे करण्यास मदत करू शकतो.

याचा अर्थ काय: सर्व लॅपटॉप मध्ये इंटीग्रेटेड ग्राफिक्स कार्ड असतेच आणि त्यावर तुम्ही चित्रपट बघू शकता आणि थोडीफार फोटो-एडिटिंग अगदी सहज करू शकता. पण जर तुम्ही लॅपटॉप वर गेम खेळणार असाल तर तुम्हाला एका डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड ची गरज पडेलच ज्याची ताकद जास्त असते.

प्रो टिप: जर तुम्ही गेम खेळणार नसाल किंवा तुमच्या लॅपटॉप वर कन्टेन्ट निर्मिती करणार नसाल तर तुम्हाला ग्राफिक्स कार्डची काहीच गरज नाही.

Nvidia विरुद्ध AMD विरुद्ध इंटेल HD

याचा अर्थ काय: इंटेल प्रोसेसर मध्ये एक बेसिक ग्राफिक्स चिप असते जी तुमची हलकी आणि रोजची कामे करू शकते. पण जर तुम्हाला गेम खेळाचे असतील किंवा फोटो किंवा व्हिडीओ एडिटिंग करणार असाल तर तुम्हाला एक एनवीडिया किंवा एएमडी ग्राफिक्स चिप असलेला लॅपटॉप निवडावा लागेल.

प्रो टिप: साधारणतः प्रत्येक ब्रँड मध्ये जेवढा हायर मॉडेल नंबर असेल तेवढी चांगली परफॉरमेंस ग्राफिक्स कार्ड कडून मिळते.

इंटरनल स्टोरेज

याचा अर्थ काय: लॅपटॉप मधील स्टोरेज ती जागा असते ज्यावर तुम्ही विंडोज किंवा मॅक ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करता, त्यांनतर तुम्ही सर्व गेम, चित्रपट, दस्तावेज आणि फोटो पण इथेच सेव करता. स्टोरेज शिवाय तुम्ही लॅपटॉप वर काहीच करू शकत नाही. लॅपटॉप मधील स्टोरेज दोन प्रकारची असते, हार्ड डिस्क ड्राइव (एचडीडी) किंवा सॉलिड-स्टेट ड्राइव (एसएसडी) असे असतात. हार्ड डिस्क ड्राइव कमी पैशात भरपूर जागा देते, पण एसएसडी च वेग खूप जास्त असतो.

हार्ड डिस्क ड्राइव (HDD)

फायदा: कमी पैशात जास्त स्टोरेज

याचा अर्थ काय: हार्ड डिस्क ड्राइव एक प्रकारची अशी स्टोरेज आहे जी कमी पैशात जास्त क्षमता देते. एचडीडी तसे पाहता खूप स्लो असते असे बोलले जाते कारण त्यात एक फिरणारा पार्ट असतो 5400 आरपीएम वर फिरतो ज्यामुळे डिस्कचा रिडींग स्पीड मर्यादित राहतो.

सॉलिड स्टेट ड्राइव (SSD)

फायदा: यामुळे तुमच्या विंडोजचा वेग वाढतो आणि यामुळे प्रोग्राम्स पण लवकर उघडले जातात.

याचा अर्थ काय: एसएसडी म्हणजे सॉलिड-स्टेट ड्राइव. यात कोणताही हलता पार्ट नसतो आणि त्यामुळे हि एचडीडी च्या तुलनेत 4 पट वेगवान असू शकते. एसएसडी 5 सेकंदा पेक्षा कमी वेळेत विंडोज सुरु करू शकते. जर तुम्ही एसएसडी वापरत असाल तर तुमचे प्रोग्राम वेगाने चालतील. ह्या परफॉर्मंसची पण एक किंमत आहे आणि ती खूप जास्त आहे. तसेच यातील स्टोरेज पण कमी असते.

सॉलिड स्टेट हाइब्रिड ड्राइव

फायदा: स्पीड, कपॅसिटी आणि किंमत पाहता सर्वोत्तम.

याचा अर्थ काय: एसएसएचडी म्हणजेच सॉलिड-स्टेट हाइब्रिड ड्राइव. हे एचडीडी आणि एसएसडी चे एक कॉम्बिनेशन आहे, ज्याचा अर्थ असा कि तुम्हाला फक्त जास्त स्टोरेज मिळत नाही तर सर्वकाही लवकर लोड होते. एक एसएसएचडी मध्ये 500 जीबी किंवा 1 टीबी एचडीडी सोबत 128 जीबी एसएसडी जोडलेली असते. ओएस आणि इतर प्रोग्रॅम्स एसएसडी वर इन्स्टॉल केले जातील तर एचडीडी चा भाग स्टोरेज साठी वापरला जाईल. जेणेकरून तुमची ऑपरेटिंग सिस्टम आणि प्रोग्राम सुपर-फास्ट सुरु होतात.

ऑपरेटिंग सिस्टम

फायदा: ऑपरेटिंग सिस्टम मुळे तुम्ही तुमचे आवडीचे प्रोग्रॅम्स आणि गेम खेळू  शकता. याच्याविना तुमचा लॅपटॉप म्हणजे नुसता आयताकृती डब्बा आहे.

याचा अर्थ काय: ऑपरेटिंग सिस्टम लॅपटॉप वरील सॉफ्टवेयरचा पाया आहे. जो फाइल्स, मेमरी आणि जोडलेल्या डिव्हाईस सह सर्व सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर चे व्यवस्थापन करतो. सर्वात महत्वाचे म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम मुळे तुम्ही तुमच्या लपटोप आणि प्रोग्रॅम्स अशी व्हिज्युअली इंटरॅक्ट करू शकता. (नाहीतरी तुम्हाला काही करण्यासाठी ढीगभर कंप्युटर कोड्स लक्षात ठेवावे लागतील) सर्वात प्रसिद्ध ऑपरेटिंग सिस्टम विंडोज आहे आणि जर ती तुम्हाला आवडत असेल तर ती तुमच्या लॅपटॉप सोबत प्रीइन्स्टॉलेड येत आहे कि नाही हे तपासा. कमी किंमतीत लॅपटॉप देता यावा म्हणून काही निर्माता लॅपटॉपच्या काही मॉडेल्स सोबत विंडोज देत नाहीत. ऍप्पल चे सर्व लॅपटॉप MacOS सह येतात त्याचे फायदे वेगळे आहेत. खाली आम्ही तुमच्यासाठी उपलब्द असेलेल्या सर्व ऑपरेटिंग सिस्टम्सची माहिती दिली आहे.

माइक्रोसॉफ्ट विंडोज

जगात सर्रास वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टमआहे हि. माइक्रोसॉफ्ट विंडोज चे लेटेस्ट वर्जन विंडोज 10 आहे. याचे दोन वेरिएन्टस आहेत एक विंडोज 10 होम वर्जन आणि विंडोज 10 प्रो वर्जन. प्रो व्हर्जन मध्ये व्यावसायिक फीचर्स आहेत त्यामुळे जर तुमच्याकडे होम वर्जन असल्यास त्याने तुमचे काही नुकसान होणार नाही. विंडोज नसलेल्या लॅपटॉप पेक्षा विंडोज असलेले लॅपटॉप महाग असतात त्याचे कारण ऑपरेटिंग सिस्टम साठी लागणारी किंमत आहे.

MacOS

MacOS मॅकबुक, मॅकबुक एयर आणि मॅकबुक प्रो सारख्या ऍप्पल ने बनवलेल्या लॅपटॉप वर चालणारी ऑपरेटिंग सिस्टम आहे. हा ओएस स्मूदली चालतो आणि काही सॉफ्टवेयर यावर विंडोज पेक्षा जास्त चांगले चालतात. MacOS मुळे ऍप्पल लॅपटॉपला बऱ्याच विंडोज मशिन्सच्या तुलनेत चांगली बॅटरी लाईफ मिळते.

लिनक्स

हि कंप्यूटर गीक्सना आवडणारी ऑपरेटिंग सिस्टम आहे. तुमचा लॅपटॉप या ऑपरेटिंग सिस्टम सह येऊ आगर न येवो तुम्ही कधीही अनेक प्रकारच्या लिनक्स मधील एखादा प्रकार सहज कधीही डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नव्या लॅपटॉप वर इंस्टॉल करू शकता.

DOS

DOS किंवा FreeDOS एक मोफत, कमांड लाइन ऑपरेटिंग सिस्टम आहे जी काही बेसिक गोष्टी करू शकते फाइल्स इकडून तिकडे हलवणे किंवा त्या काढून टाकणे. तुम्हाला प्रोग्रॅम्स किंवा ब्राऊजर FreeDOS वर वापरता येणार नाही. जर तुम्ही एखादा असा लॅपटॉप विकत घेत असाल ज्यात FreeDOS किंवा DOS प्री-लोड आहे, तर तुम्हाला त्या लॅपटॉप वर एखादी ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करणे गरजेचे असते जेणेकरून तो तुम्हाला वापरता येईल. एक तर तुम्हाला विंडोज ची प्रत विकत घ्यावी लागेल किंवा जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर मग तुम्हाला तुमच्या लॅपटॉप वर लिनक्स इंस्टॉल करावे लागेल.

क्रोम OS

ChromeOS त्या लॅपटॉप वरील ऑपरेटिंग सिस्टम आहे ज्यांना Chromebooks म्हटले जाते. ChromeOS Chromebooks साठी Google ची समर्पित ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि लॅपटॉपच्या यादीत यांचा वेगळा उल्लेख केलेला असतो.

प्रो टिप: जर तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वापरणार असाल तर वेगळी विंडोज ची प्रत विकत घेण्यापेक्षा विंडोज सह येणार एखादा लॅपटॉप विकत घ्यावा. कारण विंडोज स्टॅन्डअलोन लाइसेंस ची किंमत विंडोज सह आणि विंडोज विना येणाऱ्या लॅपटॉप मधील किंमतीच्या फरकापेक्षा जास्त असते.

बोनस टिप: जर तुम्ही लिनक्स / DOS आधारित मशीन वर विंडोज इंस्टाल करत असाल तर लॅपटॉप निर्मात्याच्या वेबसाइट वरून आधीच योग्य ते ड्राइवर डाउनलोड करायला विसरू नका. खस्करून वायरलेस आणि लॅन कार्ड्स म्हणजे टीमचा लॅपटॉप इंटरनेट शी कनेक्ट होईल . आणि एकदा का कनेक्ट झालं कि विंडोज 10 स्वतःहून सर्व हवे असलेले ड्राइवर डाउनलोड करेल.

पोर्ट्स आणि कनेक्टिविटी

याचा अर्थ काय: याची गरज तुम्हाला तुमचा पेन ड्राइव, तुमची हार्ड डिस्क किंवा तुमचा फोन चार्ज कारण्यासाठी  असते. पोर्ट मुळे तुम्ही तुमचा लॅपटॉप कोणत्याही टीवी किंवा इतर डिस्प्लेशी कनेक्ट करू शकता. वेगवेगळे पोर्ट्स वेगवेगळी सेवा देतात पण त्यात हि काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात ज्याची माहिती आम्ही खाली दिली आहे.

USB A

फायदा: हा तो पोर्ट आहे जो सर्वांना आवडतो आणि हा सर्व जण मोठ्या प्रमाणात वापरतात. आपण यात सर्व काही प्लग करतो, आपली एक्सटर्नल हार्ड डिस्क, एखादा एक्सटर्नल माउस इतकेच नव्हे तर फोटो ट्रान्स्फर करण्यासाठी आपण आपला कॅमेरा पण कंप्युटर शी याच पोर्ट ने तर जोडतो.

याचा अर्थ काय: यूएसबी-ए पोर्ट एक आयताकृती पोर्ट आहे ज्याच्या द्वारे आपण डिवाइस चार्ज करू शकतो तसेच त्यातील डेटा  ट्रान्स्फर करू शकतो आणि या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येतात. हा पोर्ट यूएसबी 3.0 स्पीड सह येतो किंवा मग यूएसबी 2.0 स्पीड सह. यूएसबी 3.0 पोर्ट चा रंग निळा असतो पण एकदा मॅनुफॅक्चररच्या स्पेक्स शीट मधून कानफार्म केलेले बरे असते.

USB C

फायदा: यात कोणत्याही टोकाने केबल प्लग करता येते आणि डिव्हाईस चार्ज करता येतो तसेच डेटा  पण ट्रान्स्फर करता येतो आणि हि दोन्ही कामे एकाच वेळी करता येतात.

याचा अर्थ काय: यूएसबी-सी पोर्ट यूएसबी पोर्ट चे नवीन वर्जन  आहे आणि नावावरून फक्त पोर्ट च्या आकाराचे वर्णन करण्यात आले आहे. हा आकाराने छोटा आहे, याचा अर्थ असा कि हॅखूप कमी जागा घेतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे केबल कशी प्लग करावी यासाठी तुम्हाला विचार करावा लागणार नाही. अशा प्रकारचे पोर्ट आता जवळपास सर्वच प्राईस ब्रॅकेट मधील लॅपटॉप मध्ये दिसत आहे.

थंडरबॉल्ट

फायदा: हा एक असा पोर्ट आहे ज्यात तुम्ही अगदी काहीही प्लग करू शकता, एक चार्जर, हार्ड डिस्क किंवा मग एखादा एक मॉनिटर पण.

याचा अर्थ काय: थंडरबॉल्ट एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी कोणत्याही प्रकारच्या एक्सेसरीला तुमच्या लॅपटॉप शी एका यूएसबी-सी पोर्ट च्या माध्यमातून कनेक्ट करू शकते. एकाच केबलचा वापर 4K मॉनीटर जोडण्यासाठी केला जातो किंवा त्याच केबल ने साधी हार्ड ड्राइव पण जोडली जाऊ शकते. तुमच्या लॅपटॉपशी काहीपण जोडण्यासाठी फक्त एकाच केबल वापरता येणे हि एक चांगली सुविधा आहे.

प्रो टिप: यूएसबी-सी पोर्ट थंडरबॉल्ट सक्षम आहे कि नाही हे तुम्ही त्या बाजूला असलेल्या विजेच्या चिन्ह वरून सहज सांगू शकता.

HDMI

फायदा: याची गरज तुम्हाला तुमचा लॅपटॉप टीवी, प्रोजेक्टर किंवा दुसऱ्या स्क्रीनशी कनेक्ट करण्यासाठी आहे.

याचा अर्थ काय: एचडीएमआई पोर्ट एक कनेक्टर आहे ज्याने तुम्ही एक्सटर्नल डिस्प्ले फुल एचडी रिज्युलोशन किंवा मग 4K रिज्युलोशन वर तुमच्या लॅपटॉप सोबत कनेक्ट करू शकता. हे तेव्हा कमी येईल जर तुमच्याकडे स्मार्ट टीवी नसेल आणि तुम्हाला मोठ्या स्क्रीन वर चित्रपट बघायचे असतील तर.

VGA

फायदा: यामुळे तुम्ही तुमच्या लॅपटॉप शी प्रोजेक्टर आणि जुन्या स्क्रीन कनेक्ट करू शकाल.

याचा अर्थ काय: एचडीएमआई येण्याआधी प्रत्येक स्क्रीन आणि प्रोजेक्टर कडे वीजीए पोर्ट होता. वीजीए फुल एचडी सारख्या मोठ्या रिज्युलोशनला सपोर्ट करत नाही पण प्रोजेक्टर जोडण्यासाठी पुरेसा हे आणि आवश्यक पण.

SD/माइक्रोSD कार्ड स्लॉट

फायदा: केबल्स किंवा कार्ड रीडर्स विना सहज आपल्या कॅमेरा किंवा स्मार्टफोन च्या मेमरी कार्ड वरून फाइल्स ट्रांसफर करण्यासाठी.

कीबोर्ड

फायदा: योग्य प्रकारचा कीबोर्ड तुम्हाला वेगाने टाईप करायला, गेम खेळायला मदत करू शकतो आणि तेही जास्त वापर केल्यामुळे तुमच्या बोटाना कोणत्याही प्रकारचा त्रास दिल्या विना.

याचा अर्थ काय: लॅपटॉप कीबोर्ड वरील कीज वेगवेगळ्या आकारात, प्रकारात आणि त्यांच्यातील नंतरच्या फरकासह येतात. पण त्यांची निर्मिती टायपिंग साठीच केलेली असते. पण काही प्रकारचे कीबोर्डस काही विशिष्ट प्रकारच्या युजर्ससाठी टायर केलेले असतात. चला जाणून घेऊया त्याचाबद्दल सविस्तर.

चिकलेट स्टाइल

फायदा: एलिगेंट, शांत आणि वेगवान.

याचा अर्थ काय: चिकलेट स्टाइल कीबोर्ड मध्ये साधारणतः फ्लॅट आणि उथळ कीज असतात आणि त्यावर टाईप करण्यासाठी तुम्हाला बोटं सरकवावी लागतात. हा त्यांच्यासाठी उपयुक्त आहे जे लॅपटॉपचा वापर टायपिंग साठी करतात आणि लॅपटॉप्स मध्ये अगदी सहज सापडणार कीबोर्ड प्रकार आहे. जर तुम्ही काही टाईप करण्यासाठी लपटोप शोधात असाल तर अशा प्रकारचा कीबोर्ड असलेला लॅपटॉप घ्यावा.

नम-पॅड

फायदा: त्या लोकांसाठी आहे जे अकाऊंटन्ट किंवा गणितज्ञअसतात, त्यांना हा कीबोर्ड जास्त आवडतो.

याचा अर्थ काय: आपल्यापैकी अनेकांना नम पॅड असलेला कीबोर्ड हवा असतो आणि हि सुविधा अनेक लॅपटॉप वर उपलब्ध आहे.

मिथ: एका नमपॅड ऍड केल्यामुळे संपूर्ण कीबोर्ड क्रॅम्प होतो.

सत्य: लॅपटॉप निर्माता नमपॅड करून देखील तुम्हाला टायपिंग साठी कशाप्रकारे जागा मिळेल याची काळजी घेतात.

बॅटरी

फायदा:  जास्त मोठी बॅटरी = जास्त तास वापर.

याचा अर्थ काय: जेव्हा बॅटरी पावर आउटलेट मध्ये प्लग नसते तेव्हा बॅटरी तुमच्या लॅपटॉपला चालवते. तिचे मापन वाट-आवर (डब्ल्यूएचआर) मध्ये केले जाते. जास्त WHR = अजास्त बॅटरी लाईफ. तसेच जेवढी मोठी बॅटरी तेवढा जड लॅपटॉप असा अर्थ होतो. निर्मात्याने सांगितलेली बॅटरी लाईफ सामान्य स्तिथीत केलेल्या परिक्षणांतून सांगितलेली बॅटरी लाईफ असते त्याच वास्तविक जगातील वापराशी फारसा संबंध नसतो. स्क्रीन ब्रायटनेस, वाई-फाई आणि ब्लूटूथ कनेक्टिविटी सारख्या घटकांचा त्याचबरोबर प्रोसेसर चा प्रकार तसेच तुमच्या सीपीयू वरील लोड यांचा प्रभाव बॅटरी लाईफ वर पडतो.

प्रो टिप: स्क्रीन ब्रायटनेस 50% (किंवा त्यापेक्षा कमी) केल्यास आणि ब्लूटूथ बंद केल्यास तुमची बॅटरी क्षमता काही तासांनी वाढू शकते.

सुरक्षा

फायदा: पासवर्ड किंवा पिन विसरू शकतो अशावेळी फिंगरप्रिंट स्कॅनर तुम्हाला वाचवू शकतो.

याचा अर्थ काय: लॅपटॉप वरील सुरक्षा आजकल अनेक स्वरूपात येते. लॉगिन पासवर्ड सर्वात जुनी आणि सर्वात लोकप्रिय पद्धत आहेर. पण काही निर्माते लॅपटॉप मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर पण देत आहेत. जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरत असाल तर तुम्ही लॉगिन करण्यासाठी तुमच्या बोटांच्या ठश्यांचा वापर करू शकता.

मिथ: पासवर्ड हॅक करणे सोप्पे आहे त्यामुळे हि पद्धत सुरक्षित नाही.

सत्य: जोपर्यंत तुम्ही तुमची जन्मतारीख किंवा तुमचे नाव पासवर्ड म्हणून ठेवत नाही तोपर्यंत तो क्रॅक करणे कठीण आहे. सर्वात जास्त सुक्षेसाठी तुम्ही अंक आणि अक्षरे तसेच काही चिन्ह वापरून एक चांगला भरभक्कम पासवर्ड बनवू शकता.

 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo