HP ने लाँच केला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त लॅपटॉप क्रोमबुक 11G5

HIGHLIGHTS

हा 16GB आणि 32GB च्या स्टोरेज पर्यायासह येतो.

HP ने लाँच केला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त लॅपटॉप क्रोमबुक 11G5

HP ने बाजारात आपला नवीन लॅपटॉप लाँच केला. ह्या लॅपटॉपचे नाव आहे क्रोमबुक 11G5 आणि ह्याची किंमत आहे $189 (जवळपास १२,८०० रुपये). हा जुलै महिन्यापासून ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि ऑक्टोबरपासून रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

ह्या लॅपटॉपमध्ये क्रोम ऑपरेटिंग सिस्टम इंटरफेस आहे. हा अॅनड्रॉईड अॅप्सला सपोर्ट करेल. ह्या डिवाइसमध्ये 11.6 इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1366×768 पिक्सेल आहे. हा गोरिला ग्लासने सुसज्ज आहे. हा लॅपटॉप 11.6 इंचाची 1366×768 पिक्सेलची anti-glare स्टँडर्ड डिस्प्लेसह येतो. हा डिवाइस इंटेल सेलरॉन N3060 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 2GB रॅम आणि 4GB रॅम चा पर्याय मिळत आहे. ह्यात HP ट्रूव्हिजन HD वेबकॅमसुद्धा मिळतो. ह्याचे रिझोल्युशन 720 पिक्सेल आहे. ह्यात 16GB आणि 32GB स्टोरेज पर्यायासह येतो.

हेदेखील वाचा – उत्कृष्ट मेटल बॉडीसह येणारे हे आकर्षक स्मार्टफोन्स आता भारतातही झाले उपलब्ध…

ह्याचे टचस्क्रीन मॉडलचे वजन १.१४ किलो आहे तर स्टँडर्ड मॉडलचे वजन १.१८ किलो आहे. ह्या लॅपटॉपचे टचस्क्रीन व्हर्जन ११ तासांची बॅटरी बॅकअप देतो, तर स्टँडर्ड व्हर्जन १२ तासांची बॅटरी बॅकअप देतो.
 

हेदेखील वाचा – LYF अर्थ 2 स्मार्टफोन लाँच, किंमत २०,९९९ रुपये

हेदेखील वाचा – मोटो Z, मोटो Z फोर्स स्मार्टफोन्स सप्टेंबरमध्ये होणार भारतात लाँच?

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo