लेनोवो ने CES 2019 मध्ये लॉन्च केले IdeaPad S940 आणि Yoga A940 ऑल-इन-वन

लेनोवो ने CES 2019 मध्ये लॉन्च केले IdeaPad S940 आणि Yoga A940 ऑल-इन-वन
HIGHLIGHTS

लेनोवो ने CES 2019 मध्ये आपले IdeaPad S940 आणि Yoga A940 ऑल-इन-वन प्रोडक्ट्स लॉन्च केले आहेत.

महत्वाचे मुद्दे

  • लेनोवो ने CES मध्ये सादर केले IdeaPad S940 आणि Yoga A940 ऑल-इन-वन
  • IdeaPad S940 मध्ये देण्यात आला आहे 13.9 इंचाचा 4K HDR डिस्प्ले
  • Yoga A940 मध्ये देण्यात आला आहे 27 इंचाचा टिल्टिंग 4K डिस्प्ले

लेनोवो ने CES मध्ये आपला नवीन फ्लॅगशिप-लेवल आईडियापॅड लॅपटॉप आणि एक योगा मॉडेल सादर केला आहे. चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ने IdeaPad S940 लॉन्च केला आहे जो एक बारीक आणि लाइट वेट लॅपटॉप आहे आणि यात 4K HDR डिस्प्ले, आई-ट्रॅकिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस चा आवेश करण्यात आला आहे. कंपनी ने आपला Yoga A940 ऑल-इन-वन डेस्कटॉप पण लॉन्च केला आहे ज्यात 27 इंचाचा 4K टिल्टिंग डिस्प्ले देण्यात आला आहे आणि हा पेन सपोर्ट सह येतो.

लेनोवोनुसार, Lenovo IdeaPad S940 ची जाडी 12.2 मिलीमीटर आहे आणि याचे वजन 1.2 किलोग्राम आहे. या लॅपटॉप मध्ये कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे जो स्मूद एजेज आणि बारीक बेजल्स ऑफर करण्यास उपयोगी पडतो. या लॅपटॉप मध्ये फेशियल रेकोग्निशन आणि आई-ट्रॅकिंग साठी IR कॅमेरा देण्यात आला आहे. याची डिस्प्ले साइज 13.9 इंच आहे आणि हा दोन रेजोल्यूशन ऑप्शन्स मध्ये येतो ज्यात एक फुल HD आणि दूसरा 4K HDR VESA400 आहे. IdeaPad S940 मध्ये डॉल्बी एटमोस चे स्पीकर्स देण्यात आले आहेत.

Lenovo IdeaPad S940 मध्ये इंटेलच्या 8th जनरेशन कोर सीरीजचा CPUs, अप टू 16GB रॅम आणि इंटेल इंटीग्रेटेड ग्राफिक्स आहेत. लॅपटॉप मध्ये PCIe वर आधारित सॉलिड-स्टेट स्टोरेज पण देण्यात आली आहे जिची क्षमता 512GB पर्यंत आहे. लॅपटॉप मध्ये तीन USB टाइप-C पोर्ट्स देण्यात आले आहेत ज्यात दोन थंडरबोल्ट 3 ला सपोर्ट करतात. Lenovo IdeaPad S940 यावर्षी मे मध्ये सेल साठी आणला जाईल आणि याची बेस किंमत $1,500 (Rs 1,05,683 जवळपास) असेल.

Lenovo Yoga A940 ऑल-इन-वन खासकरून क्रिएटर्स आणि आर्टिस्ट्स साठी आहे. या लॅपटॉप मध्ये 27 इंचाचा 4K डॉल्बी विजन इनेबल टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे जो 28 डिग्री पर्यंत टिल्ट केला जाऊ शकतो. IdeaPad S940 प्रमाणे Yoga A940 मध्ये पण फेशियल रेकोग्निशन आणि आई-ट्रॅकिंग साठी IR कॅमेरा देण्यात आला आहे. या डिवाइस मध्ये पण डॉल्बी एटमोसची स्पीकर सिस्टम आहे. Yoga A940 सह एक्टिव पेन स्टाइलस आणि कन्टेन्ट क्रिएशन डायल देण्यात आला आहे, जो एक कस्टमाइजेबल डायल आहे जो डिस्प्लेच्या उजवीकडे किंवा डावीकडे ठेवला जातो. याचा वापर सॉफ्टवेयर मध्ये एडोब इलस्ट्रेटर, फोटोशॉप, लाइटरूम इत्यादी मध्ये केला जाऊ शकतो.

Lenovo Yoga A940 मध्ये इंटेलचे 8th जनरेशन कोर सीरीज CPUs, 16GB DDR4 रॅम, AMD Radeon RX560 आणि डेडिकेटेड 4GB GDDR5 रॅम देण्यात आला आहे. या लॅपटॉप मध्ये 1TB ची हार्ड ड्राइव देण्यात आली आहे. या संपूर्ण डिवाइसचे वजन 14.6 किलोग्राम आहे. यात सहा USB-A पोर्ट्स, आणि एक USB-C पोर्ट देण्यात आला आहे जो थंडरबोल्ट 3 ला सपोर्ट करतो, तसेच HDMI आणि ईथरनेट पोर्ट्स पण यात आहेत. Lenovo Yoga A940 ऑल-इन-वन यावर्षी मार्च पासून सेल साठी येईल आणि याची बेस किंमत $2,350 (Rs 1,65,522 जवळपास) ठेवण्यात आली आहे.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo