ऍप्पल ने रेटिना डिस्प्ले सह नवीन मॅकबुक एयर नोटबुक केला लॉन्च, किंमत $1,199

ऍप्पल ने रेटिना डिस्प्ले सह नवीन मॅकबुक एयर नोटबुक केला लॉन्च, किंमत $1,199
HIGHLIGHTS

नवीन मॅकबुक एयर आकाराने छोटा आणि वजनाने हलका आहे आणि इंटेलच्या लेटेस्ट जनरेशनच्या CPU सह येतो.

ऍप्पल ने आपला पोर्टेबल नोटबुक मॅकबुक एयर लॉन्च केला आहे. या नोटबुकचा फॉर्म फॅक्टर पण मागच्या जनरेशनच्या मॅकबुक एयर सारखा आहे. ऍप्पल चे म्हणणे असे आहे कि कंपनी ने नोटबुकचे सर्व पैलू सुधारले आहेत. डिवाइसची किंमत पाहता MacBook Air $1,199 मध्ये लॉन्च केला गेला आहे आणि इंटरेस्टेड युजर्स साठी डिवाइस प्री-ऑर्डर साठी पण उपलब्ध आहे. या नोटबुकचा सेल 7 नोव्हेंबर पासून सुरु होईल. 
 
मॅकबुक एयर स्पेसिफिकेशंस
नवीन मॅकबुक एयर ची खासियत म्हणजे यातील 8व्या जेनेरेशनचा डुअल कोर इंटेल i5 प्रोसेसर आहे जो 1.6GHz वर क्लोक्ड आहे. यात 16GB पर्यंतची फास्टर मेमोरी आणि फास्टर सॉलिड-स्टेट ड्राइव (अप टू 1.5TB) आहे. याच्या बेस मॉडेल मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळत आहे. कंपनी ने नवीन मॅकबुक एयर अजूनच पोर्टेबल बनवण्यासाठी याचा आकार मागील मॉडेल्सच्या तुलनेत 17 टक्के कमी करण्यात आला आहे. याची जाडी 15.6mm आणि वजन 2.75 पाउंड आहे. 

हा नोटबुक 13.3 इंचाच्या रेटिना डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे आणि मागील वर्जनच्या तुलनेत 4 पट जास्त पिक्सल्स सह येतो. डिवाइस मध्ये कीबोर्ड मधेच टच आईडी एम्बेडेड आहे. डिवाइसची सुरक्षा चांगली करण्यासाठी डिवाइस T2 सिक्योरिटी चिप सह सादर करण्यात आला आहे जी डिवाइसची SSD कण्ट्रोल करते. 
 
Apple ने नवीन MacBook Air मध्ये आपला लेटेस्ट जनरेशन चा बटरफ्लाई कीबोर्ड पण सामील केला आहे जो बॅकलिट कीज, मोठे टचपॅड आणि फोर्स टच फीचर सह चालेले. कंपनी ने ‘हे सिरी’ सपोर्ट सह डिवाइस मधील ऑडियो परफॉरमेंस मध्ये पण सुधार केले आहेत. बॅटरी बद्दल बोलायचे तर ऍप्पलचा दावा आहे कि डिवाइस 12 तास बॅटरी लाइफ देईल. 
 
नवीन मॅकबुक दोन थंडरबोल्ट 3 पोर्ट्स सह येतो ज्याने युजर्स eGPUs कनेक्ट करू शकतात, स्टोरेज मध्ये एक्सटर्नल डिस्प्ले आणि अन्य एक्सटर्नल डिवाइसेज पण सामील करण्यात आले आहेत. सर्व मॅकबुक एयर नोटबुक्स 100 टक्के रीसायकल केलेल्या एल्युमीनियम ने बनवण्यात आले आहेत ज्यामुळे डिवाइसचे कार्बन फुटप्रिंट्स 50 टक्क्यांनी कमी होतील. 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo