श्याओमीने ट्विट करुन असे संकेत दिले आहेत की, ती नोव्हेंबरमध्ये आपल्या ग्राहकांसाठी काही खास भेटवस्तू आणणार आहे. ही भेटवस्तू मिळवण्यासाठी आपल्याला नोव्हेंबरची वाट पाहावी लागेल.
आपल्या सर्वांना माहितच असेल की, फेस्टिव सीझन सुरु झाला आहे. आणि सर्व ई-कॉमर्स साइट्सवर मोठे मोठे डिस्काउंट सेल आता सामान्य झाले आहे. मात्र आता या ऑफर्सच्या दुनियेत श्याओमीनेसुद्धा पाऊल टाकले आहे. आपण असे समजू शकता की, श्याओमी ह्या दिवाळीत काही आकर्षक ऑफर्स आणण्याच्या तयारीत आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
श्याओमीने ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करुन ह्यावेळी ग्राहकांसाठी काही आकर्षक ऑफर्स आणणार असल्याचे संकेत दिले आहे. श्याओमीने ट्विटमध्ये असेसुद्धा म्हटलय की, ‘दिवाली विथ मी’ सोबत ३,४ फटाकेसुद्धा दाखवले आहेत. जे दिवाळी आणि चांगल्या डिस्काउंटकडे इशारा करतायत. हा सेल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात असू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येतोय. ह्यात खूप चांगले आणि आकर्षक डिस्काउंट मिळतील.
जर श्याओमीने अशा प्रकारच्या सेलचे आयोजन केले, ज्यात आपल्याला मोठे डिस्काउंट मिळतील तर हा सेल mi.com च्या माध्यमातून केला जाईल. जेथे तुम्ही सर्व ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.
आपण फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलच्या माध्यमातून श्याओमीचे अनेक प्रोडक्ट्स चांगल्या डिस्काउंटसह आधीच घेऊ शकतात. जेथे लाँचवेळी श्याओमी Mi4i ची किंमत १२,९९९ रुपये होती, तोच आज ९,९९९ रुपयांत सहजरित्या उपलब्ध होईल.
नाहीतर असेही होऊ शकते की, श्याओमी आपला कोणतातरी नवीन प्रोडक्ट बाजारात उतरवेल. श्याओमीबद्दल जशी जशी आम्हाला माहिती मिळत जाईल, तशीतशी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. टेक जगतातील अशा सर्व बातम्यांशी जोडलेले राहण्यासाठी आपण आमच्या फेसबुक पेजवर लाईक किंवा फॉलो करु शकता.