Install App Install App

Xiaomi Mi4You सेल च्या शेवटच्या दिवशी या खास प्रोडक्ट्स वर मिळत आहेत या डील्स

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 13 Jul 2018
HIGHLIGHTS
  • मी.कॉम सोबत Xiaomi Mi4You सेल अमेजॉन आणि फ्लिपकार्ट वर पण चालू आहे.

Xiaomi Mi4You सेल च्या शेवटच्या दिवशी या खास प्रोडक्ट्स वर मिळत आहेत या डील्स


Xiaomi Mi4You sale last day, discount on these products: Xiaomi ला भारतात येऊन चार वर्ष झाले आहेत आणि हे साजरे करण्यासाठी कंपनी ने एनिवर्सरी सेल आयोजित केला आहे. या सेल मध्ये अनेक प्रोडक्ट्स वर चांगला डिस्काउंट आणि डील्स मिळत आहेत आणि या सेल ला कंपनी ने Mi4You नाव दिले आहे. Mi4You सेल मध्ये फ्लिपकार्ट आणि अमेजॉन पण Xiaomi चे काही प्रोडक्ट्स वर डिस्काउंट देत आहे. मी.कॉम बद्दल बोलायचे तर इथे वेगवेगळ्या विभागांमध्ये डील्स विभागण्यात आल्या आहेत. हा सेल 10 जुलै ला सुरू झाला होता आणि आज या सेल चा शेवटचा दिवस आहे. 
Mi इंडिया वेबसाइट वर Mi4You वेबसाइट नुसार कंपनी “Rs 4 फ्लॅश सेल”, “ब्लिंक एंड मिस डील्स”, “12 PM ब्लॉकबस्टर्स”, “Mi एनिवर्सरी स्पेशल्स”, आणि “ग्रॅब कूपन्स” या डील्स घेऊन येत आहे. कंपनी ने यात एका गेमचा समावेश केला आहे ज्याचे नाव “फाइंड द हिडन 4’s” ठेवण्यात आले आहे जो मोबाइल गेम सोबत लिंक होतो आणि हा फक्त एंड्राइड व iOS वर Mi स्टोर द्वारा एक्सेस केला जाऊ शकतो. या गेम मध्ये यूजर्सना “4” अंक शोधावा लागेल. असे केल्यास यूजर्स Mi MIX 2, Redmi Y2 आणि इतर अनेक चांगले प्राइजेस जिंकू शकतात. 
Xiaomi Mi4You Rs 4 फ्लॅश सेल
Rs 4 फ्लॅश सेल या सेल मधील सर्वात शानदार सेल ठरू शकतो कारण हा सर्व Mi फॅन्स साठी असेल आणि हा खास असण्याचे कारण हे आहे की Xiaomi इंडिया Mi LED Smart TV 4 सारखे प्रोडक्ट फक्त 4 रुपयांमध्ये सादर करेल ज्याची खरी किंमत 44,999 रूपये आहे. 
तसेच Mi बॉडी कम्पोजीशन स्केल 1,999 रूपयांच्या ऐवजी फक्त 4 रुपयांमध्ये उपलब्ध होईल, Redmi Note 5 Pro स्मार्टफोन 14,999 रूपयांच्या ऐवजी 4 रूपये, Redmi Y1 स्मार्टफोन 8,999 रूपयांच्या ऐवजी 4 रूपये, Redmi Y2 स्मार्टफोन 8,999 रूपयांच्या ऐवजी 4 रूपये, Xiaomi Mi Band 2 1,799 रूपयांच्या ऐवजी 4 रुपयांमध्ये उपलब्ध होतील. हा फ्लॅश सेल 10,11 आणि 12 जुलै ला संध्याकाळी 4 वाजता सुरू होईल. आम्हाला माहीत नाही की कंपनी सेल मध्ये किती प्रोडक्ट्स चा समावेश करेल पण 4 रुपये ही किंमत अनेकांना आकर्षित करू शकते. 
Xiaomi ब्लिंक एंड मिस डील्स
कंपनी हे तिन दिवस संध्याकाळी 6 वाजता बंडल डील्स पण सादर करेल, ज्यात प्रोडक्ट्स वर डिस्काउंट पण मिळेल. वेबसाइट नुसार, यूजर्स 3,798 रूपयांच्या ऐवजी 1,999 रुपयांमध्ये Mi Body Composition Scale आणि Mi Band 2 विकत घेऊ शकतात. तसेच Redmi Note 5 आणि Mi VR Play 2 11,298 रूपयांच्या ऐवजी 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल आणि Redmi Y1 सोबत Mi ब्लूटूथ हेडसेट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. इतर डील्स मध्ये Mi Air Purifier 2 एका फिल्टर सह 8,999 रुपयांमध्ये मिळत आहे, तर Xiaomi पॉकेट स्पीकर आणि इयरफोन बेसिक 1,898 रूपयांच्या ऐवजी 1,499 रुपयांमध्ये मिळेल. या सेल मध्ये तुम्ही 10,000mAh Mi Power Bank 2i आणि Mi Rollerball Pen 1,078 रूपयांच्या ऐवजी 899 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. या सेल मध्ये प्रत्येक बंडल चे 200 यूनिट उपलब्ध होतील पण Mi Air Purifier 2 आणि याच्या फिल्टर चे फक्त 50 यूनिट सेल मध्ये उपलब्ध होतील. 
Xiaomi Mi एनिवर्सरी स्पेशल्स
कंपनी सेल मध्ये रोज दुपारी 12 वाजता Mi LED Smart TV 4, आणि Redmi Note 5 Pro पण सेल साठी सादर करेल. पण हे माहीत नाही की हे डिवाइसेज पण डिस्काउंट सह सादर केले जातील की नाही. कंपनी Xiaomi Mi MIX 2 ला 2,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 27,999 रुपयांमध्ये सादर करेल. त्याच बरोबर Xiaomi Mi Max 2, ट्रॅवल बॅग, Mi इयरफोंस आणि Mi बँड इत्यादी वर पण डिस्काउंट दिला जाईल. 
Mi4You ग्रॅब कूपन्स
Xiaomi रोज सकाळी 10 वाजता यूजर्सना कूपन्स मिळवण्याची संधी देईल ज्याचा वापर यूजर्स प्रोडक्ट विकत घेताना करू शकतात. 
इतर ऑफर्स
आजच्या सेल मध्ये SBI क्रेडिट कार्ड ने पेमेंट केल्यास 500 रुपयांचा फ्लॅट इंस्टेंट डिस्काउंट मिळत आहे, हा डिस्काउंट मिळवण्यासाठी ट्रांजेक्शन ची रक्कम कमीत कमी 7,500 असावी. जर यूजर्सनी Paytm वापरून 8,999 रुपयांचे ट्रांजेक्शन केल्यास त्यांना 500 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो, त्याचबरोबर फ्लाइट वर 1000 रूपये आणि मूवी बुकिंग वर 200 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकतात. तसेच मोबिक्विक वापरून पेमेंट केल्यास यूजर्सना फ्लॅट 25% सुपर कॅश मिळू शकते, अधिकतम सुपर कॅश ची मर्यादा 2,500 रूपये आहे. 
 

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Tags:
Xiaomi Mi4You sale amazon flipkart mi.com xiaomi xiaomi sale
DMCA.com Protection Status