Smartron tBook टॅबलेट आता अॅमेझॉनवर झाला विक्रीसाठी उपलब्ध

HIGHLIGHTS

लवकरच हा टॅबलेट ऑफलाइनसुद्धा मिळेल. ह्याची किंमत ४२,९९९ रुपये आहे.

Smartron tBook टॅबलेट आता अॅमेझॉनवर झाला विक्रीसाठी उपलब्ध

भारतीय कंपनी Smartron vs एप्रिलमध्ये आपला नवीन टॅबलेट tBook लाँच केला होता. हा टॅबलेट आतापर्यंत केवळ गॅजेट्स 360 वर विक्रीसाठी उपलब्ध होता. मात्र आता हा ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच हा ऑनलाइनसुद्धा मिळेल. ह्याची किंमत आहे ४२,९९९ रुपये.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

ह्यात 5.5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. tBook च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 12.2 इंचाची IPS डिस्प्ले 2560×1600 पिक्सेलसह मिळते. ह्यात आपल्याला 64-बिटचे इंटेल कोर M प्रोसेसर मिळत आहे, जो 2Ghz ची गती देतो.

ह्यात आपल्याला 4GB रॅमसुद्धा मिळत आहे. ह्यात 128GB ची SSD स्टोरेज मिळत आहे, जे आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.

हेदेखील वाचा – भारतीय बाजारात सर्वाधिक विकले गेलेले हे नोकियाचे जबरदस्त फोन्स…

ह्यात 5 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. त्याशिवाय ह्या टॅबमध्ये आपल्याला 37W.hr ची आकर्षक बॅटरीसुद्धा मिळत आहे, जो कंपनीनुसार १० तासांचा बॅटरी बॅकअप देते.

 

हेदेखील वाचा – तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड माहित करुन घेण्यासाठी वापरा हा MySpeed App
हेदेखील वाचा – एसर ट्रॅवलमेट X349 लॅपटॉप लाँच, 8GB रॅमने सुसज्ज

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo