Install App Install App

रिलायंस जियो ने Rs 999 किंमत असलेला नवीन JioFi 4G LTE हॉटस्पॉट केला लॉन्च, फ्लिपकार्ट वर आहे उपलब्ध

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 21 Mar 2018
HIGHLIGHTS
  • या JioFi मॉडेल ला भारतात डिजाइन करण्यात आले आहे.

रिलायंस जियो ने Rs 999 किंमत असलेला नवीन JioFi 4G LTE हॉटस्पॉट केला लॉन्च, फ्लिपकार्ट वर आहे उपलब्ध


रिलायंस जियो चे सर्व नवीन JioFi 4G हॉटस्पॉट डिवाइस फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहेत. हे डिवाइस Rs 999 पासून Rs 2,499 पर्यंतच्या किंमतीमध्ये उपलब्ध आहेत. JioFi चा हा नवीन मॉडेल JMR815 फ्लिपकार्ट वर HDFC बँक च्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ने नो कॉस्ट EMI स्कीम अन्तर्गत विकत घेता येऊ शकतो आणि अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड वर 5 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. 
JioFi JMR815 हॉटस्पॉट डिवाइस वर 1 वर्षाची वारंटी आणि एक्सेसरीज वर 6 महिन्यांची वारंटी मिळत आहे. कंपनी नुसार हा डिवाइस 150 Mbps चा डाउनलोड स्पीड आणि 150 Mbps पर्यंतचा अपलोड स्पीड देतो. या JioFi मॉडेल ला भारतात डिजाइन करण्यात आले आहे. हा 4G कॉल सपोर्ट येतो आणि या डिवाइस ची मेमोरी कॅपेसिटी 64GB पर्यंत एक्सपांड केले जाऊ शकते. 

हा नवीन मॉडल गोल आकाराचा आहे आणि डिवाइस मध्ये पॉवर ऑन/ऑफ आणि WPS साठी फिजिकल बटन्स आहेत. हा डिवाइस बॅटरी, 4G आणि Wi-Fi सिग्नल स्ट्रेंथ साठी नोटिफिकेशन लाइट्स सह येतो. 
नवीन JioFi मॉडल च्या माध्यमातून तुम्ही 2G किंवा 3G स्मार्टफोंस मधून पण HD वॉईस आणि वीडियो कॉल्स करू शकता. पण आशा प्रकारच्या कॉल्स साठी Jio 4G वॉईस अॅप डाउनलोड करावा लागेल. नवीन JioFi हॉटस्पॉट 3,000mAh ची रिचार्जेबल बॅटरी ऑफर करतो जी 8 तासांची कनेक्टिविटी देण्याचा वादा करते. 
याव्यतिरिक्त नवीन JioFi मॉडेल मल्टी डिवाइस कनेक्शन सपोर्ट करतो आणि 32 यूजर्स ला कनेक्ट करण्याची परवानगी देतो ज्यात 31 यूजर्स Wi-Fi आणि 1 यूजर USB च्या माध्यमातून कनेक्ट होईल. ALT3800 प्रोसेसर सह नवीन JioFi FDD-Band 3, Band 5 आणि TDD-Band 40 ला सपोर्ट करतो. 
 

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Tags:
reliance jio JioFi hotspot
DMCA.com Protection Status