ऑफलाइन पण बघता येईल 10वी, 12वी चा निकाल, या सोप्या स्टेप्स करा फॉलो

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 25 May 2018
HIGHLIGHTS
  • जर तुम्ही एंड्रॉएड स्मार्टफोन वापरत असाल तर इंटरनेट कनेक्शन विना पण तुम्ही 10वी आणि 12वी च्या परीक्षेचे निकाल बघू शकता. टेक कंपनी गूगल ने गुरुवारी याची घोषणा केली.

ऑफलाइन पण बघता येईल 10वी, 12वी चा निकाल, या सोप्या स्टेप्स करा फॉलो


जर तुम्ही एंड्रॉएड स्मार्टफोन वापरत असाल तर इंटरनेट कनेक्शन विना पण तुम्ही 10वी आणि 12वी च्या परीक्षेचे निकाल बघू शकता. टेक कंपनी गूगल ने गुरुवारी याची घोषणा केली. माइक्रोसॉफ्ट ने बोर्ड परीक्षेचे निकाल 'डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट बिंग डॉट कॉम' वर दाखवण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) सोबत करार केला आहे. 
कंपनी ने एका ब्लॉग मध्ये लिहले आहे की या वर्षी यूजर्स याचा लाभ 'एसएमएस ऑर्गेनाइजर' वरून घेऊ शकतात. 'एसएमएस ऑर्गेनाइजर' वर 10वी आणि 12वी च्या परीक्षेचे निकाल बघण्यासाठी यूजर्सना हा अॅप डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर सीबीएसई परीक्षा निकाला साथी नोंदणी करावी लागेल. 
परीक्षेच्या निकालाच्या दिवशी, आधीपासून नोंदणी केलेल्या यूजर्सना निकाला साठ एक नोटीफिकेशन मिळेल ज्यावर क्लिक करताच गुणपत्रिका दिसेल. ब्लॉग मध्ये सांगण्यात आले आहे की गुणपत्रिका एसएमएस द्वारा मिळणार असल्यामुळे इंटरनेट कनेक्शन नसतानाही तुम्ही तुमचा निकाल बघू शकता. 
परीक्षेचा निकाल 'बिंग डॉट कॉम' वर पण लोकांसाठी शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल. ब्लॉग वर लिहले आहे, "आंध्र प्रदेश 10वी एसएससी बोर्ड, तेलंगाना 10वी एसएससी बोर्ड आणि उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षा परिषद 10वी आणि 12वी बोर्ड यांचे निकाल पण बिंग वर उपलब्ध आहेत." 
 

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Tags:
google google india cbse result cbse result 10th and 12th result offline
DMCA.com Protection Status