फक्त एक SMS पाठवून जाणून घ्या Voter list मध्ये तुमचा नाव आहे कि नाही

फक्त एक SMS पाठवून जाणून घ्या Voter list मध्ये तुमचा नाव आहे कि नाही
HIGHLIGHTS

तुम्हाला तर माहित आहेच कि जवळपास एका महिन्यांनी आपल्या देशात लोकसभेच्या निवडणूक होणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग पण सर्व मतदारांना आपला अधिकार वापरता यावा यासाठी प्रयत्न करत आहे.

तुम्हाला तर माहित आहेच कि जवळपास एका महिन्यांनी आपल्या देशात लोकसभेच्या निवडणूक होणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग पण सर्व मतदारांना आपला अधिकार वापरता यावा यासाठी प्रयत्न करत आहे. जर उत्त्तर प्रदेश सरकार बद्दल बोलायचे झाले तर सरकारने निवडणुकीत मतदारांना योग्यरीत्या सहभाग घेता यावा म्हणून एक टोल फ्री नंबर जाहीर केला आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे नाव वोटर लिस्ट मध्ये आहे कि नाही याची माहिती मिळेल. हि माहिती तुम्हाला एका SMS च्या माध्यमातून मिळणार आहे. यामुळे मतदारांची खूप मदत होणार आहे. 
 
तुम्हाला तर माहितीच आहे बऱ्याचदा निवडणुकीच्या वेळी तुमचे नाव मतदार यादीत आहे कि नाही याची माहिती आपल्याला नसते. पण या धोरणामुळे हि अडचण दूर होईल. याचा अर्थ असा कि तुम्हाला फक्त एका SMS च्या माध्यमातून माहिती मिळणार आहे कि तुमचे नाव वोटर लिस्ट मध्ये आहे कि नाही. 
 
विशेष म्हणजे आज म्हणजे 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदाता दिनाच्या निमित्ताने हा टोल फ्री नंबर 1950 लॉन्च केला गेला आहे. या टोल फ्री नंबर वर तुम्ही तुमचा एपिक नंबर टाकल्यावर तुमचे नाव, पत्ता आणि सोबत बूथची माहिती मिळणार आहे. 
 

वोटर ID कार्ड वरील आपले नाव आणि पत्ता कसा बदलावा  

Voter ID Card मध्ये ऑनलाइन पत्ता बदलण्यासाठी सर्वात आधी तुम्ही http://www.nvsp.in 
वर क्लिक करून मतदात्त्यांसाठी उपलब्ध अधिकृत वेबसाइट वर लॉग इन करा. त्यांनतर "Apply online for registration of new voter/due to shifting from AC" ऑप्शन सेलेक्ट करा.
 
मग उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी फॉर्म 8A निवडा, त्यानंतर नवीन टॅब मध्ये एक ऑनलाइन फॉर्म दिसेल. फॉर्म मध्ये तुमचे नाव, पत्ता, राज्य, निवडणुकीचे क्षेत्र आणि नवीन पत्त्या सोबत आवश्यक ती माहिती भरा. त्यानंतर असा एक डॉक्यूमेंट अपलोड करा ज्यावर तुमच्या सध्याच्या पत्त्याचा उल्लेख असेल (जसे कि आधार कार्ड, बँकेचे पासबुक किंवा मग अधिकृत कागदपत्र).
 
फॉर्म भरून आणि डॉक्यूमेंट अपलोड केल्यानंतर फॉर्म ऑनलाइन सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला एक रेफरेंस नंबर मिळेल, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे एप्लिकेशन ट्रॅक करू शकता.
 
एप्लिकेशन सबमिट केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्याचे वेरिफिकेशन केले जाईल. वेरिफिकेशन यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या नवीन पत्त्यासह वोटर आईडी कार्ड मिळेल.
 
ऑनलाइन व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या वोटर आईडी कार्डचा पत्ता सहज बदलू शकता. यासाठी तुम्हाला निवडणूक क्षेत्रातील निवडणूक अधिकाऱ्याला आपल्या सध्याच्या पत्त्याच्या पूर्वीसह एप्लिकेशन फॉर्म सबमिट(जमा) करावा लागेल. त्यानंतर वेरिफिकेशन नंतर तुमच्या सर्व डिटेल सह तुमचे नाव जुन्या निवडणूक क्षेत्रातून नवीन यादीत स्थानांतरित (ट्रांसफर) केले जाईल.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo