Google ने भारतात लॉन्च केला प्लस कोड, वॉईस नेविगेशन साठी जोडण्यात आल्या 6 भारतीय भाषा

Google ने भारतात लॉन्च केला प्लस कोड, वॉईस नेविगेशन साठी जोडण्यात आल्या 6 भारतीय भाषा
HIGHLIGHTS

प्लस कोड चा वापर करून कोणीही सहज अॅड्रेस सर्च आणि शेयर करू शकतो. यूजर्स प्लस कोड चा वापर करून मोबाईल किंवा डेस्कटॉप वरून मॅप मध्ये सर्च करू शकतो किंवा Google सर्च मध्ये पण डायरेक्ट सर्च करू शकतो.

Google ने वॉईस नेविगेशन साठी 6 अजून भारतीय भाषा जोडण्या सह आपल्या मॅप (नकाशा) सर्विस साठी एका नव्या प्लस कोड फीचर ची घोषणा केली आहे. कंपनी ने या अॅप मध्ये 'स्मार्ट अॅड्रेस सर्च', 'अॅड एन अॅड्रेस' सारखे दुसरे अॅप फीचर पण आणले आहेत. 
Google चे म्हणने आहे की प्लस कोड एक ओपन सोर्स सेवा आहे, जी '6-कॅरेक्टर+सिटी' रुपात स्थानीय कोड आणि क्षेत्राला जोडून काम करतो. हा एक स्मार्टफोन किंवा पीसी वर गूगल मॅप्स सह कोणत्याही व्यक्ति बनवू आणि वापरु शकतो, आणि याला Google सर्च मध्ये लोकेशन टाकून डायरेक्ट सर्च पण केला जाऊ शकतो. 
कंपनी चे म्हणेन आहे की याला अनेक कारणांसाठी वापरले जाऊ शकते, जसे आपातकालीन सेवा देने, आणि जटिल अॅड्रेस साठी एक ओळख (लँडमार्क) देने.
 
याव्यतिरिक्त, Google मॅप्स आता एका जटिल अॅड्रेस चा शोध लावण्याचा सोप्पा उपाय आहे. Google ने स्मार्ट अॅड्रेस सर्च ची सुरवात केली आहे, ज्यांतर्गत जर यूजर्सना कोणत्याही ठिकाणाचा सटीक अॅड्रेस माहीत नसेल तर त्या ठिकाणच्या बाजूचा पत्ता देऊ शकतात. 
याव्यतिरिक्त, Google ने वॉईस नेविगेशन साठी 6 नवीन भारतीय भाषांची घोषणा केली आहे ज्यात बंगाली, गुजराती, कन्नड, तेलगु, तमिल आणि मलयालम यांचा समावेश आहे. सेटिंग्स मेन्यू अंतर्गत मॅप्स 'नेविगेशन सेटिंग्स मध्ये वॉईस चयन ऑप्शन वर जाऊन आपल्या आवडीच्या भाषेची निवड करा. मॅप्स ने तीन वर्षांपूर्वी हिंदी मध्ये वॉईस नेविगेशन साठी सपोर्ट देण्यास सुरवात केली होती. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo