Google ने प्रसिद्ध क्रिकेटर सर डॉनल्ड जॉर्ज ब्रॅडमन यांना आज च्या Doodle ने सम्म्मानित केले

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 27 Aug 2018
HIGHLIGHTS
  • ब्रॅडमन यांचा जन्म 27 ऑगस्ट, 1908 ला ऑस्ट्रेलिया मध्ये झाला होता आणि त्यांचे नाव आता पर्यंतच्या महान फलंदाजाच्या यादीत सामील आहे.

Google ने प्रसिद्ध क्रिकेटर सर डॉनल्ड जॉर्ज ब्रॅडमन यांना आज च्या Doodle ने सम्म्मानित केले

Google ने आज प्रसिद्ध क्रिकेटर सर डॉनल्ड जॉर्ज ब्रॅडमन यांच्या 110व्या जन्मदिनी त्यांना Doodle द्वारा सम्मानित केले आहे. Doodle वर एनिमेटेड फोटो दिसत आहे, ज्यात ब्रॅडमन स्ट्रोक खेळत आहेत. ब्रॅडमन यांचा जन्म 27 ऑगस्ट, 1908 ला ऑस्ट्रेलिया मध्ये झाला होता आणि त्यांचे नाव आता पर्यंतच्या महान फलंदाजाच्या यादीत सामील आहे. त्यांनी आपल्या तिसऱ्याच पारीत अर्धशतक झळकावले होते. 

आज च्या Google Doodle मध्ये सर डॉनल्ड जॉर्ज ब्रॅडमन यांचा फोटो लावण्यात आला आहे आणि फोटो वर कर्सर घेऊन जाताच तिथे लिहून येते की आज सर डॉनल्ड जॉर्ज ब्रॅडमन यांचा 110वा जन्मदिवस आहे. 1908 मध्ये जन्मलेल्या या महान क्रिकेटरचा मृत्यु 25 फेब्रुवारी 2001 ला झाला होता. 

त्यांनी आपल्या कारकिर्दीत 12 कसोटी द्विशतक बनवले आणि त्यांचा सर्वाधिक स्कोर इंग्लंड च्या विरोधात 334 रन्स चा होता. डोमेस्टिक क्रिकेट बद्दल बोलायचे झाले तर ब्रॅडमन यांनी 95.14 च्या सरासरीने 28,067 रन बनवले. त्यांनी 452 (नॉट आउट) च्या हाईएस्ट स्कोर सोबत 117 शतकं केली आहेत. 
 

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Tags:
google doodle google doodle Sir Donald George Bradman
DMCA.com Protection Status