Install App Install App

Google Assistant आता हिंदीत झाला भाषा उपलब्ध..

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 16 Mar 2018
HIGHLIGHTS
  • गूगल असिस्टेंट आता हिंदीत पण उपलब्ध झाला आहे. हा अपडेट एंड्राइड 6.0 मार्शमेलो आणि त्या वरील एंड्राइड डिवाइस साठी उपलब्ध आहे आणि लवकरच हा एंड्राइड 5.0 लॉलीपॉप, आयफोन आणि एंड्राइड ओरियो (गो एडिशन) साठी जारी केला जाईल.

Google Assistant आता हिंदीत झाला भाषा उपलब्ध..


गूगल असिस्टेंट आता हिंदीत पण उपलब्ध झाला आहे. हा अपडेट एंड्राइड 6.0 मार्शमेलो आणि त्या वरील एंड्राइड डिवाइस साठी उपलब्ध आहे आणि लवकरच हा एंड्राइड 5.0 लॉलीपॉप, आयफोन आणि एंड्राइड ओरियो (गो एडिशन) साठी जारी केला जाईल. Google Assistant ला आधी पण हिंदीत वापरता येत होते पण आधी ही सुविधा फक्त कंपनी च्या मेसेजिंग अॅप Allo मध्ये उपलब्ध होती. आधी Google Assistant काही हिंदी शब्द समजू शकत होता पण रिप्लाई इंग्रजीतून येत असे.  

आता तुम्ही लेटेस्ट अपडेट मुळे हिंदी भाषेमध्ये वॉइस कमांड्स देऊ शकाल किंवा लिहून तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकाल. आता तुम्ही होम बटन ला टच करून किंवा फक्त ओके गूगल बोलून गूगल असिस्टेंट चा वापर करू शकता. गूगल असिस्टेंट वर इंग्रजी भाषा सेट असते त्यामुळे तुम्हाला याचा वापर करण्यासाठी याच्या सेटिंग्स मध्ये जाऊन याची भाषा हिंदी करावी लागेल. तुम्हाला तुमच्या गूगल सर्च अॅपला लेटेस्ट वर्जन वर अपडेट करावा लागेल. 
 
तुम्ही Google Assistant च्या माध्यमातून बेसिक माहिती मिळवू शकता जसे की बाहेरील वातावरण कसे आहे, किंवा कोणत्याही जागेचा रस्ता इत्यादी. गूगल च्या एका डेडिकेटेड वेबसाइट वर लिस्ट पण आहे ज्यात काही हिंदी कमांड्स ची लिस्ट देण्यात आली आहे जसे, “सबसे करीब पंजाबी रेस्टोरेंट कहाँ है, दादर तक पहुँचने में कितना समय लगेगा और क्रिकेट का स्कोर क्या है?”
याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या Google Assistant ला इंस्ट्रक्शंस पण देऊ शकता जसे, कल सुबह मुझे सात बजे उठाओ, सेल्फी खींचो, डैडी को मैसेज भेजो 5 मिनट में पहुंचेंगे. 
 

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Tags:
Google Assistant in hindi Google Assistant
DMCA.com Protection Status