Install App Install App

Flipkart Freedom Sale: 10 ते 12 ऑगस्ट, जाणून घ्या खास डील्स आणि ऑफर्स बद्दल

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 07 Aug 2018
HIGHLIGHTS
  • Flipkart वर 10 ऑगस्ट पासून 12 ऑगस्ट दरम्यान होणार्‍या या सेल मध्ये तुम्हाला बरेचसे डिवाइस कमी किंमतीत मिळतील, त्याचबरोबर सेल मध्ये तुम्हाला अजून खुप काही मिळेल.

Flipkart Freedom Sale: 10 ते 12 ऑगस्ट, जाणून घ्या खास डील्स आणि ऑफर्स बद्दल

Flipkart आपल्या प्री-इंडिपेंडेंस डे सेल मधून अमेजॉन इंडिया ला टक्कर देऊ पाहत आहे, Flipkart चा हा सेल 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे हा सेल जवळपास 72 तास चालेल. या काळात तुम्हाला फ्लिपकार्ट वरच्या या सेल मध्ये भरपूर ऑफर्स आणि डिस्काउंट मिळेल. 

तुम्हाला या ऑफर्स जवळपास सर्वच कॅटेगरी मधील प्रोडक्ट्स वर मिळतील जसे की इलेक्ट्रॉनिक्स, गॅजेट, फॅशन आणि इतर. याचा अर्थ असा की तुम्हाला स्मार्टफोन्स, सोबत लॅपटॉप, कॅमेरा आणि ऑडियो प्रोडक्ट्स व्यतिरिक्त इतर अनेक प्रोडक्ट्स वर पण भरपूर ऑफर्स मिळणार आहेत, हे सर्व गॅजेट श्रेणी मध्ये येतात. 

सर्वच डील्स तुम्हाला जेव्हा हा सेल सुरू होईल तेव्हा दिसतील, पण या आधीच कंपनी म्हणजे फ्लिप्कार्ट ने काही डील्स टीज केल्या आहेत. फ्लिपकार्ट ने असे सांगितले आहे की सिटीबँक चे क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला जवळपास 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. पण तुम्हाला हा कॅशबॅक सेल मध्येच मिळेल. 

त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक आठ तासांनी एक ब्लॉकबस्टर डील्स मिळणार आहे, तसेच एक स्पेशल ऑवर प्रत्येक तासाला येणार आहे, ही ऑफर Rush Hour नावाने मिळेल. ही ऑफर 10 ऑगस्टला 2AM पासून सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर तुम्हाला रोज 31 मिनिटांसाठी मोठा प्राइस ड्राप मिळेल.
 

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Tags:
freedom day sale flipkart freedom day sale freedom day sale in india freedom day sale on flipkart
DMCA.com Protection Status