Flipkart Festive Dhamaka days Sale: 24 ऑक्टोबर पासून होईल सुरु, इथे वाचा सेल संबंधित सर्व माहिती

Flipkart Festive Dhamaka days Sale: 24 ऑक्टोबर पासून होईल सुरु, इथे वाचा सेल संबंधित सर्व माहिती
HIGHLIGHTS

Flipkart वर Flipkart Festive Dhamaka Sale चे आयोजन 24 ऑक्टोबर पासून 27 ऑक्टोबर पर्यंत केले जाणार आहे. या सेल मध्ये एक्सिस बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड यूजर्सना अतिरिक्त ऑफर्स मिळणार आहेत.

काही दिवसांपूर्वी सणासुदीचा सीजन सुरु होताच फ्लिप्कार्ट सोबतच इतर अनेक ई-कॉमर्स जायंट ने आपापल्या सेलच्या आयोजनाची सुरवात केली होती. आता फ्लिप्कार्ट वर त्यांच्या दुसऱ्या फेस्टिव सेलचे आयोजन 24 ऑक्टोबर पासून करण्यात येणार आहे. या सेलला Flipkart Festive Dhamaka Days Sale चे नाव देण्यात आले आहे. तसेच हा सेल 27 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. याचा अर्थ असा कि तुम्हाला चार दिवस बेस्ट ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहेत.

असे म्हणू शकतो कि तुम्हाला शेकडो प्रोडक्ट्स वर बेस्ट ऑफर्स आणि डील्स मिळणार आहेत. यावेळी पण जे Big Billion Days Sale मध्ये झाले होते तेच आणि तसेच काहीसे होणार आहे. याचा अर्थ असा कि दिवाळीच्या आधी तुमच्याकडे अजून एक संधी आहे, जिचा फायदा घेऊन तुम्ही काही बेस्ट आणि सर्वात खास प्रोडक्ट्स वरील बेस्ट ऑफर्सचा लाभ घेऊ शकाल. तसेच फ्लिप्कार्ट ने मास्टरकार्ड सोबत भागेदारी केली आहे. विशेष म्हणजे ऍमेझॉन इंडिया वर पण त्यांच्या दुसऱ्या सेलचे आयोजन फ्लिप्कार्ट सोबतच केले जाणार आहे.

जरी या सेलची सुरवात 24 ऑक्टोबर पासून होणार असली तरी फ्लिप्कार्ट प्लस च्या सदस्यांसाठी या सेलची सुरवात 9PM 23 ऑक्टोबर पासून होईल. यासाठी फ्लिप्कार्ट ने एक्सिस बँक सोबत भागेदारी केली आहे. याचा अर्थ असा कि या बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला बेस्ट ऑफर्स आणि डील्स मिळतील. काही दिवसांपूर्वी जे Flipkart च्या Big Billion Days Sale मध्ये झाले होते. या सेल मध्ये पण तुम्हाला फ्लॅश सेल मध्ये मोबाईल फोन्स, LED TV, laptops आणि इतर श्रेणी मध्ये डिस्काउंट मिळणार आहे. तसेच डील्स दार 8 तासांनी बदलणार आहेत, याचा अर्थ असा कि तुम्हाला अनेक प्रोडक्ट्स वर बेस्ट डील्स मिळतील.

Flipkart Festive Dhamaka Days Sale: या प्रोडक्ट्स वर बेस्ट डील्स मिळू शकतात (Preview)

स्मार्टफोन्स बद्दल बोलायचे झाले ता या सेल मध्ये म्हणजे Flipkart Festive Dhamaka Days Sale मध्ये तुम्हाला अनेक स्मार्टफोन्स वर बेस्ट डील्स आणि ऑफर्स मिळणार आहेत. पण अजूनतरी हा सेल फक्त प्रिव्हियू आहे. तुम्हाला सेल सुरु झाल्यांनतर समजेल कि तुम्हाला कोणत्या प्रोडक्ट वर कोणती डील मिळणारी आहे ते. या फोन्स मध्ये Oppo F9 चा समावेश आहे, तसेच यात तुम्हाला Vivo V9 आणि Lenovo K8 Plus मोबाईल फोन पण मिळणार आहेत. तुम्हाला या फोन्स वर बेस्ट डील्स मिळण्याची शक्यता आहे. सोबतच हे डिवाइस तुम्हाला कम्पलीट प्रोटेक्शन सह मिळणार आहेत, तसेच तुम्हाला एक्सचेंज प्लान पण मिळेल, बायबॅक ग्यारंटी पण तुम्हाला यात मिळेल.

Flipkart Festive Dhamaka Days Sale: बेस्ट डील्सचा फायदा कसा घ्यावा

इथे आम्ही तुम्हाला काही सोप्प्या टिप्स देत आहोत, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही या सेल मध्ये मिळणाऱ्या बेस्ट ऑफर्स आणि डील्सचा लाभ घेऊ शकता. कदाचित तुम्हाला यातील काही टिप्समाहित पण असतील कारण आधीच्या सेल्स मध्ये पण अशाच टिप्स वापरून तुम्ही डील्स मिळवल्या असतील. पण ज्या लोकांना याची माहित नसेल त्यांच्यासाठी आज आम्ही पुन्हा एकदा या टिप्स तुम्हाला देत आहोत.

1. जर तुम्ही फ्लिप्कार्ट प्लस चे सदस्य असला तर तुम्हाला 3 तास आधीच अर्ली सेलचा एक्सेस मिळेल. याचा अर्थ असा कि तुम्ही बेस्ट ऑफर्सचा लाभ लवकर घेऊ शकाल. तुम्ही अगदी सहज फ्लिप्कार्ट प्लस वर साइन करून बेस्ट डील्स मिळवू शकता.

2. तुम्ही त्या प्रोडक्ट्सची एक विशलिस्ट पण बनवू शकता, जे तुम्हाला विकत घ्यायचे आहेत. अशाप्रकारे तुम्हाला ते प्रोडक्ट्स विकत घेणे सोप्पे होतील ज्यांची तुम्हला खरंच गरज आहे आणि तुमचा गोंधळ होणार नाही.

3. तुम्ही योग्य त्या पेमेंट ऑप्शननेच विकत घेतलेल्या प्रोडक्ट साठी पैसे दिले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला योग्य आणि आवश्यक ऑफर्स आणि डील्स मिळतील. जर असे झाले नाही कदाचित तुम्हाला योग्य डील मिळणार नाहीत.

4. योग्य त्या ऑफर्स एकदा अप्लाई करून बघा, यात एक्सचेंज पासून इतर अनेक ऑफर्स असतात.

5. तसेच जर तुम्ही तुमच्या डेस्कटॉप पासून लांब असला आणि त्याचा वापर करायला जमणार नसेल तर फ्लिप्कार्ट मोबाईल ऍप डाउनलोड करून घ्या.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo