अॅमेझॉन, फ्लिपकार्ट ह्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सशी फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक

अॅमेझॉन, फ्लिपकार्ट ह्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सशी फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक
HIGHLIGHTS

ह्या ई-कॉमर्स रिटेलर्सकडून इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मागवून ते परत देण्याच्या बहाण्याने त्या गॅजेट्सच्या बॉक्समध्ये वाळू टाकून देत असल्याचे पोलिसांनी सांगितलय.

सध्या तेजीत असलेल्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट ह्या दोन ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर ऑर्डर परत देण्याच्या बहाण्याने त्या ठराविक बॉक्समध्ये वाळू भरुन परत देण्याच्या आरोपाखाली बुधवारी हैदराबाद येथून दोघांना अटक करण्यात आली.  याहिया इशाक आणि मोहम्मद अन्सारी अशी ह्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ महागडे मोबाल्स, १ लॅपटॉप, १ डिजिटल कॅमेरा आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स हस्तगत करण्यात आल्या आहेत.

त्यातील इशाक हा एक वर्षापासून गोलकोंडा येथे राहत आहे. त्याने अॅमेझॉनवर पुस्तक विक्रेता म्हणून नोंदणी केली होती आणि तो ऑनलाइन पुस्तकेही विकत होता, असेही पोलिसांनी सांगितले. हे आरोपी मागील ४ महिन्यापासून मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स, कॅमेरा, DVD’s इत्यादी गोष्टी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरुन ऑर्डर करत होते.

जेव्हा डिलिव्हरी देणारा त्यांच्या घरी येत असे, तेव्हा इशाक ती वस्तू कलेक्ट करायचा आणि त्याचा मेहुणा अन्सारी, त्या डिलिवरी मुलासोबत घराबाहेर थांबायचा. त्यानंतर इशाक आपले डेबिट कार्ड आत असल्याचे भासवून ती ऑर्डर घरात घेऊन जायचा, आणि अतिशय हुशारीने त्या पार्सलचे सील काढून त्यातील वस्तू काढून घ्यायचा आणि मग त्या बॉक्समध्ये त्या पार्सल इतक्याच वजनाची वाळू भरुन परत ते पार्सल सील करुन त्यांना परत द्यायचा.  आणि जेव्हा डिलिवरी मुलगा त्याचे डेबिट कार्ड स्वाइप करायचा तेव्हा डेबिट कार्ड कमी बॅलेंस असल्याचे दाखवायचे. मग इशाक आणि त्याचा मेहुणा ते पार्सल त्यांना परत देऊन आपले डेबिट कार्ड परत घ्यायचा. अशा प्रकारे अतिशय हुशारीने अनेकदा ते आलेल्या डिलिवरी बॉयच्या डोळ्यात धूळ फेकून गॅजेट्स चोरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ह्या गुन्ह्याविषयी अधिक तपास करत असताना पोलीसांनी त्यांच्याकडून ३ महागडे मोबाल्स, १ लॅपटॉप, १ डिजिटल कॅमेरा आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स हस्तगत केले आहेत.

हेदेखील वाचा – गुगलवर लवकरच पाहायला मिळणार ‘लाइव कॉमेंट्री’ फीचर

हेदेखील वाचा – संग्रहित केलेले हे टॉप ५ अॅप्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये असणे आहे गरजेचे

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo