उद्यापासून सुरु होणार अॅमेझॉन इंडियाचा ‘ग्रेट इंडियन सेल’

HIGHLIGHTS

ह्या सेलच्या अंतर्गत आपण सिटी बँकच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या द्वारे खरेदी केल्यावर आपल्याला अॅमेझॉन अॅपवर 15% आणि अॅमेझॉन वेबसाइटवर 10% चा अतिरिक्त कॅश बॅक मिळेल.

उद्यापासून सुरु होणार अॅमेझॉन इंडियाचा ‘ग्रेट इंडियन सेल’

ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडिया भारतीय ग्राहकांसाठी पु्न्हा एकदा एक आकर्षक सेल घेऊन आला आहे. अॅमेझॉन ह्यावेळी गणतंत्र दिवसाआधी ‘ग्रेट इंडियन सेल’ घेऊन आला आहे. हा सेल सलग तीन दिवस चालेल. ह्याची सुरुवात २१ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून होईल आणि हा सेल २३ जानेवारीपर्यंत चालेल.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

मिळालेल्या माहितीनुसार, ह्या सेलच्या अंतर्गत ग्राहक अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या प्रोडक्ट्सची खरेदी करु शकतील. त्याचबरोबर ह्या प्रोडक्ट्सवर आकर्षक सूटसुद्धा दिली आहे. ह्या सेलच्या अंतर्गत आपल्याला सिटी बँकच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या द्वारे खरेदी केल्यावर आपल्याला अॅमेझॉन अॅपवर 15% आणि अॅमेझॉन वेबसाइटवर 10% चा अतिरिक्त कॅश बॅक मिळेल.

ह्या सेलची सर्वात खास गोष्ट म्हणजे, Amazon.in ची ही ऑफर ह्याच्या अॅप आणि वेबसाइट ह्या दोन्हींवर उपलब्ध आहे. तथापि, टॉप ऑफर्स ह्या अॅपवर १५ मिनिट आधी उपलब्ध होतील. थोडक्यात सांगायचे झाले तर, ह्या ऑफरचा जास्त फायदा आपल्याला अॅपद्वाराच घेता येईल.

ह्या सेलमध्ये गोप्रो कॅमेरा आणि Mi इलेक्ट्रॉनिक्सची मर्यादित वेळेसाठी असलेल्या डिल्सशिवाय खेळणी बनविणारी अमेरिकन कंपनीही आकर्षक ऑफर देत आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय होम अँड किचन ब्रँड्सवरसुद्धा ग्राहकांना चांगला डिस्काउंट मिळेल.

अॅमेझॉनने मागील वर्षीही ‘ग्रेट इंडियन दिवाळी सेल’चे आयोजन केले होते. अॅमेझॉनच्या ह्या सेलला  भारतात भरघोस प्रतिसाद मिळाला होता. २०१५ मध्ये कंपनीचा व्यवसाय ४ पटीने वाढला आहे. तर कंपनीच्या ग्राहकांची संख्या २३० टक्क्यांनी वाढली आहे.

Kulveer Sharma
Digit.in
Logo
Digit.in
Logo