‘GRE Words Puzzle Game’ मुळे आता शब्दसंग्रह शिकणे होणारे सोपे

‘GRE Words Puzzle Game’ मुळे आता शब्दसंग्रह शिकणे होणारे सोपे
HIGHLIGHTS

यशस्वीरित्या स्मार्टफोनवर जगातील पहिला मराठी वर्ड पझल(कोडे) गेम लाँच केल्यानंतर आज Zabuza Labs ने GRE Words Puzzle गेम गुगल प्ले स्टोअरवरही लाँच केला आहे.

GRE परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आपली शब्दसंग्रह करण्याची क्षमता म्हणावी तितकी वाढलेली नसून ती मर्यादितच आहे. ही गरज लक्षात घेऊन, जगभरातील अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी GRE Words Puzzle गेम आणला आहे.

 

Zabuza Labs ने ह्याआधी बलूून्स, बो अँड अॅरो, बलून स्मॅशर आणि ATV Race 3D सारखे अनेक गेम्स यशस्वीरित्या आपल्यासमोर आणले आहे. काही मनोरंजनाच्या गेम्सबरोबरच ते काही शिक्षणाविषयीचे अॅप्स आणि गेम्सवरही काम करतात. सध्याच्या मराठी क्रॉसवर्ड गेमला मिळालेले यश पाहून त्याची पुढची पायरी म्हणून तसेच त्यात थोडा मनोरंजनाचा अनुभव देता येईल ह्या उद्देशाने हा GRE Words Puzzle Game आणला आहे.

हा गेम समजण्यासाठी खूप सोपा आहे. तुम्ही पहिल्या पायरीपासून शब्द शिकण्यास सुरुवात कराल. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर लेटर्सचा सेट मिळेल. तुम्हाला तो ड्रॅग करुन म्हणजे खेचून त्यातील अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. तुम्हाला हिंट म्हणून त्या शब्दाचा समानार्थी/पर्यायी शब्द सूचवले जातील. ह्यात पुढे पुढे जाणारी यंत्रणा हा गेम खेळणे खूप सोपे बनवते.

तुम्ही पार केलेल्या प्रत्येक स्तरावर तुम्हाला एक आभासी कॉइन मिळेल. तुम्ही २५ कॉइनची देवाणघेवाण करुन तुम्ही तुमची हिंट अनलॉक करु शकता. ही कॉइन्सची पद्धत तुमचा शिकण्याचा अनुभव खूप फायद्याचा ठरतो. त्याचा एकूण १०० आव्हानात्मक स्तरावर तुम्ही १०० नवीन शब्द शिकू शकता आणि हे तुम्हाला तुमच्या GRE exams मध्ये गुण वाढविण्यासाठी खूपच फायद्याचे ठरु शकते.

Zabuza Labs चे मुख्य कार्यकारी अधिकारी मानस गजारे यांनी सांगितले की, “GRE Words Puzzle गेम हा खास GRE च्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करुन बनविण्यात आला आहे. आम्हाला आशा आहे की, ह्या गेमच्या माध्यमातून आम्ही शब्द शिकणे अजून सोपे आणि मनोरंजक करु. ”

ह्यात अजून बरेच काही शिकण्यासारखे आहे. हा गेम सोशल गेम आहे. त्यामुळे तुम्ही कँडी क्रश गेमप्रमाणे तुमचा मित्र/मैत्रिण कोणती लेवल खेळत आहे, हेही पाहू शकाल.

सविस्तर माहितीसाठी-

 

आणि आपल्या स्मार्टफोनवर डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.zabuzalabs.gre_words_puzzle

 

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo