जेब्रोनिक्स जेब झूक बार 2 साउंड बार लाँच. किंमत ४,९४९ रुपये

जेब्रोनिक्स जेब झूक बार 2 साउंड बार लाँच. किंमत ४,९४९ रुपये
HIGHLIGHTS

जेब्रोनिक्स जेब झूक बार 2 मध्ये वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटुथ सपोर्ट देण्यात आला आहे.

जेब्रोनिक्स ने बाजारात आपला नवीन साउंड बार जेब झूक बार 2 लाँच केला आहे. कंपनीने ह्याची किंमत ४,९४९ रुपये ठेवली आहे आणि हा वायरलेस कनेक्टिव्हिटीसह येतो. ह्याला ब्लूटुथच्या माध्यमातून दुस-या डिवायसेसशी कनेक्ट करु शकता.

हा साउंड बार 7.62cms मिड/हाय रेंज ड्रायवर आणि 12.7cms लो रेंज ड्रायवरसह येतो. ब्लूटुथशिवाय ह्या डिवाइसमध्ये USB आणि SD/MMC सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय देण्यात आले आहे. हा स्लिम प्रोफाइलसह लाँच केला गेला आहे आणि ह्याचे डिझाईन ग्लॉसी आहे. ह्यात LED डिस्प्लेसुद्धा देण्यात आली आहे.

 

हेदेखील पाहा – मोटो G4 प्लस रिव्ह्यू


ह्या डिवाइसमध्ये FM इनबिल्ट दिला गेला आहे. ह्यात mp3/WMA चा सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे. हा डिवाइस १ वर्षाच्या वॉरंटीसह येतो आणि ह्याला भारतामध्ये रिटेल स्टोर्सवरुनसुद्धा खरेदी करु शकता.
 

हेदेखील वाचा – जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘फ्रीडम 251’ २८ जूनपासून मिळणार
हेदेखील वाचा – मिजू M3S स्मार्टफोन लाँच. फिंगरप्रिंट स्कॅनरने सुसज्ज

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo