सोनी SRS-XB3 वायरलेस स्पीकर लाँच, किंमत १२,९९० रुपये

सोनी SRS-XB3 वायरलेस स्पीकर लाँच, किंमत १२,९९० रुपये
HIGHLIGHTS

सोनीने एक्स्ट्रा बास असलेला पोर्टेबल वायरलेस स्पीकर SRS-XB3 लाँच केला आहे. हा स्पीकर जवळपास २४ तासांचा प्लेबॅक टाईम देतो.

सोनी इंडियाने आपला नवीन एक्स्ट्रा बास पोर्टेबल वायरलेस स्पीकर SRS-XB3 लाँच केला आहे. कंपनीने भारतात ह्या डिवाइसची किंमत १२,९९० रुपये ठेवली आहे. हा स्पीकर काळा, निळा आणि लाल रंगात उपलब्ध आहे. ह्याला सोनी सेंटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक स्टोरवरुन खरेदी करु शकता. कंपनीचा दावा आहे की, ह्याने क्रिस्टल क्लियर संगीत ऐकू येते आणि ते ही कोणत्या वायर तसेच तारांशिवाय.
 

कंपनीने ह्यावर अधिक स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ह्या स्पीकरमध्ये एक्स्ट्राबास डीएसपी प्रोसेसिंग तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे, जो एकदम उत्कृष्ट ऑडियो क्वालिटी देतो. ह्यात एनएफसी तथा ब्लूटुथ कनेक्टिव्हीटीची सुविधाही दिली गेली आहे, ज्याच्या मदतीने ह्याला इतर दोन स्पीकर्सनेसुद्धा कनेक्ट केले जाऊ शकते. ह्यात मोबाईल चार्ज करण्याचीही सुविधा दिली गेली आहे, ज्यासाठी ह्यात 8800mAh ची बॅटरी दिली गेली आहे, जी जवळपास २४ तासांची प्लेबॅक देण्यास सक्षम आहे. हा ब्लूटुथ, नियर फील्ड कम्युनिकेशन (एनएफसी) आणि ऑडियो इन सुविधांनी सुसज्ज आहे.

हेदेखील पाहा – लेनोवो वाइब k4 नोट ची एक झलक

सोनीने मार्चमध्येच आपले एक्स्ट्रा बास ब्लूटुथ हेडफोनला भारतीय बाजारात आणले होते. ज्याची किंमत भारतात ७,९९० रुपये आहे.
 

हेदेखील पाहा – लेनोवो लवकरच आणणार सायनोजेन OS ने सुसज्ज असलेला स्मार्टफोन
हेदेखील वाचा – कूलपॅड नोट 3 स्मार्टफोनची किंमत झाली कमी

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo