सोनी ने MWC 2018 मध्ये लॉन्च केला Xperia Ear Duo वायरलेस हेडसेट

सोनी ने MWC 2018 मध्ये लॉन्च केला Xperia Ear Duo वायरलेस हेडसेट
HIGHLIGHTS

डुअल लिस्निंग, डेली असिस्ट आणि हेड जेस्चर सपोर्ट सह येतो हा डिवाइस.

सोनी ने Xperia Ear Duo वायरलेस हेडसेट ला मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2018 मध्ये सादर केले आहे. हा डिवाइस "डुअल लिस्निंग" फीचर सह येतो, जो वापर करणार्‍यांना ऑडियो आणि एंबियंस चा आवाज एक साथ ऐकण्यास मदत करतो. 
यात डेली असिस्ट फीचर पण आहे, जो लोकेशन आणि तुमचा वापर रिकॉग्नाइज करून पूर्ण दिवसाची प्रासंगिक माहिती देण्यासाठी आहे. हा डिवाइस पुढच्या महिन्यात काही निवडक बाजारात ब्लॅक आणि गोल्ड कलर वेरियंट मध्ये उपलब्ध होईल. कंपनी ने सध्यातरी हेडसेट ची किंमत घोषित केली नाही. 
हेडसेट मध्ये असलेल्या 'स्पेसिअल अकॉउस्टिक कंडक्टर' ने डुअल लिस्निंग टेक्निक चालते. यात सोनी ची 'क्लीयर फेज' ऑडियो टेक्निक पण आहे, जी एंबियंस साउंड च्या आधारे हेडसेट चा वॉल्यूम अॅडजस्ट करते. ह्या हेडसेट मध्ये CXD5602 प्रोसेसर आणि एक मल्टी-सेंसर प्लॅटफॉर्म आहे, जो डेली असिस्ट सुविधेला सक्षम करतो. 
 
हा वायरलेस हेडसेट हेड जेस्चर ला पण सपोर्ट करतो,ज्यामुळे तुम्ही तुमचं डोक हलवून किंवा वाकवून येणारे कॉल्स रिजेक्ट करू शकता. तसेच तुमचं डोक उजावी कडे आणि डावीकडे करून म्युझिक ट्रॅक बदलू शकता. 
डिवाइस वर टॅप किंवा स्क्रॉल करून वॉल्यूम नियंत्रित केले जाऊ शकते. हा डिवाइस वॉयस कंट्रोल ऑप्शन सह येतो, ज्याने यूजर्स सिरी किंवा Google असिस्टेंट चा वापर करू शकतात आणि यात क्वॉड माइक बीम-फॉर्मिंग फीचर आहे, जो यूजर्स चा आवाज ओळखण्यासाठी बाहेरचा गोंधळ (नॉइस) फिल्टर करू शकतो. 
Xperia Ear Duo वायरलेस हेडसेट स्टेनलेस स्टील आणि सॉफ्ट रबर चा वापर करून बनवला गेला आहे. हा स्प्लॅशप्रूफ रेट केला गेला आहे आणि सिंगल चार्ज मध्ये चार तासांपर्यंत ऑडियो प्लेबॅक देऊ शकतो. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo