Whatsapp या दोन खास फीचर्स ची करत आहे टेस्टिंग, लवकरच येतील समोर

HIGHLIGHTS

Whatsapp मध्ये लवकरच तुम्हाला Mark as Read आणि कोणतीही चॅट म्यूट करण्याचा ऑप्शन मिळणार आहे.

Whatsapp या दोन खास फीचर्स ची करत आहे टेस्टिंग, लवकरच येतील समोर

Whatsapp ने एक नवीन बीटा अपडेट जाहीर केला आहे, हा अपडेट एंड्राइड यूजर्स साठी जाहीर करण्यात आला आहे, याचा वर्जन नंबर 2.18.214 आहे. एंड्राइड साठी असलेल्या व्हाट्सॅप बीटा 2.18.214 मधून माहिती मिळाली आहे की, या मेसेजिंग प्लेटफार्म मध्ये दोन नवीन फीचर्स वर काम केले जात आहे. हीच माहिती WABetalInfo वरून पण समोर येत आहे. यातील पहिल्या फीचर बद्दल बोलायचे तर हा कोणताही चॅट नोटिफिकेशन मधूनच वाचण्या संबधी आहे, तर दुसरा फीचर असा आहे की एंड्राइड वर नोटिफिकेशन सेंटर मधूनच कोणताही चॅट म्यूट केला जाऊ शकतो. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे दोन्ही फीचर्स सध्यातरी टेस्टिंग फेज मध्ये ठेवण्यात आले आहेत, तुम्हाला हे फीचर मिळण्यासाठी काही वेळ लागू शकतो. अजून तरी या बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा पण समोर आली नाही की Whatsapp चे हे दोन्ही फीचर्स तुमच्या पर्यंत कधी येतील. 
वर सांगितल्याप्रमाणे एका रिपोर्ट मध्ये असे सांगण्यात आले आहे की या पब्लिकेशन ने हे फीचर बीटा टेस्टिंग फेज मध्ये बघितले आहेत. इथे तुम्ही या फोटो मध्ये बघू शकता की Whatsapp आता आपल्या यूजर्सना आता नोटिफिकेशन मधूनच ‘Mark As Read’ करण्याचे स्वातंत्र्य देत आहे. हे फीचर त्या लोकांसाठी योग्य आहे, जे काही काळासाठी व्हाट्सॅप वापरत नाहीत. 

उदाहरणार्थ, समजा जर तुम्हाला कोणी व्हाट्सॅप मेसेज पाठवला आणि तो मेसेज नोटिफिकेशन सेंटर मध्ये आला, तर आता तुमच्या कडे एक ऑप्शन असेल की तुम्ही हा नोटिफिकेशन मध्ये ठेवु शकता किंवा त्याला मार्क अॅज रीड करून नोटिफिकेशन मधून हटावू शकता. 

याव्यतिरिक्त Whatsapp च्या दुसर्‍या फीचर बद्दल बोलायचे तर कंपनी या फीचर वर पण काम करत आहे, या मुळे तुम्ही कोणताही चॅट म्यूट करू शकता. आता काय होत की जर तुम्हाला कोणता मेसेज आला, कोणत्याही एका चॅट मधून तर व्हाट्सॅप तुम्हाला एक नोटिफिकेशन पाठवते. आगामी काळात तुम्ही हे चॅट एका पर्टिकुलर काळासाठी म्यूट करू शकता. याचा अर्थ असा की जर तुम्हाला कोणी जास्त त्रास देत असेल तर तुम्ही त्याला म्यूट करू शकता. 

पण सध्यातरी हे दोन्ही फीचर टेस्टिंग फेज मध्ये आहेत, अजूनतरी यूजर्स साठी हे दोन्ही फीचर उपलब्ध नाहीत. पण या फीचर्स ची घोषणा होताच आम्ही तुम्हाला याबद्दल सांगू. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo