WhatsApp ने वॉयस आणि विडियो ग्रुप कॉलिंग फीचर रोल आउट करणे सुरू केले

WhatsApp ने वॉयस आणि विडियो ग्रुप कॉलिंग फीचर रोल आउट करणे सुरू केले
HIGHLIGHTS

WhatsApp च्या ग्रुप विडियो कॉलिंग मध्ये एक साथ चार लोक बोलू शकतात. सध्यातरी या फीचर मध्ये फक्त 4 लोक एक साथ जोडण्याची सुविधा मिळत आहे.

यावर्षी किंवा मग असा म्हणूया मागच्या महिन्यात झालेल्या F8 कांफ्रेंस मध्ये WhatsApp ने ग्रुप कॉलिंग फीचर आपल्या समोर ठेवला होता. पण त्यावेळी हा फीचर काही निवडक लोकांसाठी होता परंतु आता हा एंड्राइड आणि iOS वर जास्त यूजर्स साठी जारी करण्यात आला आहे. तसेच हे पण लक्षात असू दे की एंड्राइड वर हा फक्त व्हाट्सॅप बीटा वापरणाऱ्या यूजर्स साठी उपलब्ध झाला आहे. पण iOS मध्ये तुमचा व्हाट्सॅप अपडेट करताच तुम्हाला ही सुविधा मिळणार आहे. एंड्राइड चे जे यूजर्स व्हाट्सॅप बीटा चा वापर करत नाहीत, त्यांना या अपडेट साठी काही काळ वाट बघावी लागेल. 

सध्यातरी या ग्रुप कॉलिंग फीचर मध्ये फक्त 4 लोकांन सोबत एका वेळी बोलण्याची संधी मिळणार आहे. हा फीचर खुप सिंपल वाटत आहे आणि याचा वापर पण खुप सोप्पा आहे. तुम्हाला विडियो कॉल चा वापर करण्यासाठी सर्वात आधी विडियो कॉल इंटरफेस वर जावे लागेल, त्यानंतर तुमच्या टॉप राईट कार्नरला एक बटन दिसले, त्याच्या माध्यमातून तुम्ही या सोबत इतर लोकांना जोडू शकता. या बटन वर क्लिक केल्या नंतर तुम्ही तुमच्या कांटेक्ट लिस्ट मध्ये पोहचाल आणि तिथून तुम्ही लोकांना अगदी सहज या कॉलिंग सोबत जोडू शकता. 

जर दोन जण एकमेकांशी बोलत असतील आणि तिसर्‍याला यात अॅड केल्यास, त्याला एक नोटिफिकेशन जाईल. तसेच एका वेळी व्हाट्सॅप तुम्हाला एकच व्यक्ति जोडू देतो. याचा अर्थ असा की तुम्ही चौथ्या व्यक्तीला तेव्हाच जोडू शकाल जेव्हा तिसरा हा कॉल एक्सेप्ट करेल. सर्व लोक या कॉल सोबत जोडले गेल्या नंतर तुमच्या स्क्रीन वर चार वेगवेगळे चेहरे दिसू लागतात. विशेष म्हणजे नॉन-बीटा यूजर्स पण यात जोडले जाऊ शकतात. पण त्यांच्याकडे कोणताही ऑप्शन सध्या नसल्यामुळे ते यात कुणाला जोडू शकणार नाहीत. पण दुसर्‍या कोणी अॅड केल्यास त्यांना यात सहभागी होता येईल. 

जे यूजर्स आता याचा वापर करू शकत नाहीत, त्यांना जास्त वाट बघावी लागणार नाही. त्यांना लवकरच हा फीचर मिळण्याची शक्यता आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo