व्हाट्सॅप नवीन फीचर ‘ब्लॉक रिवोक रिक्वेस्ट’ ला लवकरच करू शकतो सादर

व्हाट्सॅप नवीन फीचर ‘ब्लॉक रिवोक रिक्वेस्ट’ ला लवकरच करू शकतो सादर
HIGHLIGHTS

नवीन फीचर बॅकग्राउंड मध्ये काम करेल आणि यूजर्स ला ‘डिलीट फॉर एवरीवन’ आॅप्शन चा दुरुपयोग करण्यापासून थांबवले.

‘डिलीट फॉर एवरीवन’ (सर्वांसाठी डिलीट) फीचर ची वेळ मर्यादा एक तास, आठ मिनिट आणि 16 सेकंड साठी वाढवल्या नंतर व्हाट्सॅप लवकरच एक "ब्लॉक रिवोक रिक्वेस्ट" (ब्लॉक रद्द करण्याची विनंती ) फीचर आणू शकतो. 
WABetaInfo च्या एका रिपोर्ट नुसार, नवीन फीचर व्हाट्सॅप च्या नव्या बीटा वर्जन च्या बॅकग्राउंड मध्ये चालेल, जो यूजर्सना पाठवल्या जाणार्‍या मेसेजेसना वेळ मर्यादा संपल्या डिलीट करण्याची परवानगी देणार नाही. 
रिपोर्ट नुसार ‘डिलीट फॉर एवरीवन’ फीचर साठी निश्चित वेळ मर्यादा आधी एंड्रॉयड साठी सुरू करण्यात आली होती पण आता iOS आणि विंडोज वर्जन साठी पण उपलब्ध आहे.
ब्लॉक रद्द करण्याच्या विनंतीची नवीन सुविधा, मेसेज डिलीट करण्याची विनंती मिळाल्यावर डाटाबेस मध्ये सेव केलेल्या मेसेज साठी ID चेकिंग च्या माध्यमातून काम करते, जर डिलीट करण्यात येणारा मेसेज मागच्या 24 तासांमध्ये पाठवला गेला असेल, तर याला डिलीट करण्यात येईल, नाही तर विनंती अस्विकारली जाईल. 
नवीन सुविधा ही निश्‍चित करेल की अॅप च्या संशोधित वर्जन चा वापर करून कोणीही 24 तासांच्या आधीचे मेसेज डिलीट करू शकू नये. व्हाट्सॅप लवकरच एक 'लॉक रिकॉर्डिंग' फीचर पण आणू शकतो, ज्यामुळे यूजर्सना माइक आइकन वर क्लिक किंवा खाली होल्ड न करता वॉयस मेसेज रिकॉर्डिंग करता येईल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo