कसा करावा Paytm अकाउंट पासून आपला आधार डीलिंक; जाणून घ्या सोप्पी पद्धत

कसा करावा Paytm अकाउंट पासून आपला आधार डीलिंक; जाणून घ्या सोप्पी पद्धत
HIGHLIGHTS

जर तुम्ही तुमच्या आधार पासून आपले Paytm अकाउंट डीलिंक करू इच्छित असला तर चला जाणून घेऊया काही सोप्या स्टेप्सच्या ज्यांच्या माध्यामातून तुम्ही ही समस्या सोडवू शकता.

जे लोक आपल्या आधार डेटाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंतित होते त्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हितकारक ठरणार आहे. निकाल असा होता की तुमचा आधार तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट, मोबाईल नंबर आणि शाळेतील प्रवेशासाठी आवश्यक नाही. यामुळे त्या लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे ज्या लोकांना आपल्या आधारचा गैरवापर होईल याची भीती होती. 

तसेच त्यांच्यासाठी पण ज्यांना एक नवीन मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी आधारची आवश्यकता होती. त्याचबरोबर ते लोक पण निश्चिंत झाले ज्यांना आपला आधार पुरावा म्हणून द्यायचा नव्हता पण त्यामुळे त्यांचे काम अडले होते. तसेच आता तुम्हाला तुमच्या Paytm अकाउंट सोबत पण आधार लिंक करण्याची काहीच गरज नाही. याचा अर्थ असा की आता तुम्हाला KYC ची पण गरज पडणार नाही. आता जर तुम्हाला तुमच्या Paytm अकाउंट पासून तुमचा आधार डीलिंक करायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक सोप्पी आणि उपयुक्त अशी पद्धत सांगणार आहोत ज्याने तुमचे काम अगदी सहज होईल. 

असे करा तुमच्या आधार ला Paytm अकाउंट पासून डीलिंक
एकीकडे अजूनतरी तुमच्या बँक आकाउंट आणि नवीन मोबाईल कनेक्शन पासून आधार कसे डीलिंक करायचे याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तुम्ही तुमच्या नजीकच्या ब्रांच किंवा दुकानात जाऊन याची माहिती घेऊ शकता. पण Paytm चे तसे नाही आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही ब्रांच किंवा दुकानात जाण्याची गरज नाही अगदी घरबसल्या तुम्ही तुमचा आधार तुमच्या Paytm आकाउंट पासून डीलिंक करू शकता. त्यासाठी आम्ही खाली काही सोप्या स्टेप्स दिल्या आहेत त्या फॉलो करा. 

1. सर्वात आधी Paytm कस्टमर केयर वर कॉल करा, हा नंबर तुम्हाला सहज इंटरनेट वर मिळेल. 

2. तिथे तुम्ही तुमचा आधार Paytm अकाउंट पासून डीलिंक करण्याची रिक्वेस्ट टाकू शकता. 

3. त्यानंतर तुम्हाला Paytm कडून एक ईमेल येईल, ज्यात तुम्हाला तुमच्या आधारचा एक क्लियर फोटो अटॅच करण्यास सांगण्यात येईल. तो फोटो तुम्हाला त्यांना तिथे पाठवावा लागेल. 

4. त्यानंतर तुमची रिक्वेस्ट नोंदवल्याचा अजून एक मेल तुम्हाला Paytm कडून येईल आणि 72 घंटे तासांच्या आत तुमचा आधार तुमच्या Paytm अकाउंट पासून डीलिंक करण्यात येईल.  

5. आधार डीलिंक झाले आहे की नाही हे तुम्ही 72 तासांनी तपासून बघू शकता. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo