ऑनलाइन आपला बँक बॅलेन्स कसा बघावा?

ऑनलाइन आपला बँक बॅलेन्स कसा बघावा?
HIGHLIGHTS

आर तुम्ही काही कारणास्तव आपल्या बँकेत जाऊन आपला बॅलेन्स बघू शकत नाही, तसेच तुमचा पासबुक पण अपडेट होत नाही, आणि तुम्हाला समजत नाही कि तुमचा बँकेत तुमचा बॅलेन्स किती आहे, असे असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत घर बसल्या तुम्ही कशाप्रकारे आपला बँक बॅलेन्स चेक करू शकता ते.

ऑनलाइन आपला बँक बॅलेन्स कसा बघावा: हे वाक्य समोर येताच आपण थोडेफार घाबरतो कि आपल्या सोबत फ्रॉड तर होणार नाही ना, ऑनलाइन आजही बँकिंग तेवढी सुरक्षित मानली जात नाही. पण हा समाज चुकीचा आहे. आजकाल ऑनलाइन बँकिंग खूप सुरक्षित झाली आहे,तरीही लोक घाबरतात. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच ऑनलाइन तुमचा बँक बॅलेन्स चेक केला नसेल, आणि तुम्ही बँकेत पण जाऊ इच्छित नसाल तर, किंवा काही कारणास्तव तुम्ही बँकेत जाऊ शकत नसाल तर तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत कि तुम्ही घर बसल्याच कोणत्याही अडचणी विना तुमचा बँक अकाउंट बॅलेन्स चेक करू शकता. 

तुम्ही तुमच्या घर पासून जवळ असलेल्या ATM वर जाऊनही बॅलेन्स बघू शकता. पण तुम्ही तिथे  पण जाऊ शकता नसाल तर तुम्ही तुमच्या मोबाईल वरच तुमचा बँक बॅलेन्स नेट बँकिंग थ्रू चेक करू शकता. ATM बॅलेन्स चेक तसे पाहता एक चांगला मार्ग आहे. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि तुम्ही कशाप्रकारे घर बसल्या तुमचा बँक बॅलेन्स चेक करू शकता. तुम्ही अनेक माध्यमांतून असे करू शकता. तुम्ही नेट बँकिंग वरून तुमचा बँक अकाउंट बॅलेन्स चेक करू शकता, तसेच तुम्ही ऑनलाइन बँकिंग वरून तुमचा बँक बॅलेन्स चेक करू शकता, तुम्ही बँक बॅलेन्स चेक करण्याच्या नंबर वर कॉल करून पण तुमचा बँक बॅलेन्स चेक करू शकता. त्याचबरोबर तुम्ही काही ऍप्स जसे कि गूगल पे इत्यादींच्या माध्यमातून पण तुमचा बँक बॅलेन्स चेक करू शकता. यावतिरिक्त तुम्ही SMS नोटिफिकेशनच्या माध्यमातून पण तुमचा अकाउंट बॅलेन्स बघू शकता. असे अजून अनेक मार्ग आहेत तुमचा अकाउंट बॅलेन्स ऑनलाइन चेक करण्याचे, ज्यांच्या बद्दल आपण माहिती घेणार आहोत. 

आज आम्ही तुम्हाला काही प्रसिद्ध बँकांचा अकाउंट बॅलेन्स कसा चेक करावा हे सांगणार आहोत.

SBI बँक मध्ये कसा चेक करावा आपला बँक बॅलेन्स?

तुम्ही यासाठी तुमच्या मोबाईल फोन मध्ये SBI बँकेचा ऍप डाउनलोड करू शकता, जो तुम्हाला कधीही तुमच्या बँक बॅलेन्सची माहिती देतो. हो पण तुम्हाला यासाठी पासवर्ड लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तसेच जर तुम्ही इतर माध्यम म्हणजे SMS किंवा मिस कॉल करून तुमचा बँक बॅलेन्स बघू इच्छित असाल तर तुम्हाला REG<स्पेस> तुमचा अकाउंट नंबर ‘09223488888’ वर पाठवावा लागेल, असे तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरूनच करू शकता. 

PNB बँकेचा बँक बॅलेन्स कसा चेक करावा?

ज्या यूजर्सनी आपला मोबाईल नंबर बँक कडे रजिस्टर केला आहे, त्यांच्यासाठी एक सुविधा उपलब्ध आहे, ज्यात तुम्ही त्यांच्या टोल फ्री नंबर वर कॉल करून तुमचा बँक बॅलेन्स चेक करू शकता. तुम्हाला यासाठी 18001802223 वर कॉल करावा लागेल, याव्यतिरिक्त तुम्ही 0120-2303090 वर कॉल करून पण तुमचा अकाउंट बॅलेन्स चेक करू शकता, तुम्ही SMS ने पण असे करू शकता. 

HDFC बँकेतील बँक बॅलेन्स कसा चेक करावा?

HDFC बँकेने वेगवेगळ्या माहितीसाठी वेगवेगळा टोल फ्री नंबर दिला आहे. तुम्ही त्यांच्यावर कॉल करून तुमच्या अकाउंट बॅलेन्स पासून अकाउंट स्टेटमेंट इत्यादींची माहिती घेऊ शकता. पण आज आम्ही तुम्हाला मात्र बॅलेन्स चेक करण्याबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला सांगू इच्छितो कि जर तुमचे अकाउंट HDFC बँकेत असेल तर तुम्ही 18002703333 वर कॉल करून तुमच्या अकाउंट बॅलेन्सची माहिती घेऊ शकता. जर तुम्ही SMS च्या माध्यमातून तुमचा अकाउंट बॅलेन्स बघू इच्छित असाल तर तुम्हाला 567612 वर SMS करावा लागेल. 

Google Pay वरून कसा चेक करावा आपला अकाउंट बॅलेन्स?

जर तुम्ही तुमच्या फोन मध्ये गूगल पे वापरात असाल तर तुमचे अकाउंट यासोबत लिंक असल्यामुळे तुम्ही अगदी सहज या ऍप वर जाऊन तुमचा पिन आणि पास कोड वापरून तुमचा अकाउंट बॅलेन्स कोणत्याही कॉल आणि SMS विना बघू शकता. 

अशाप्रकारे तुम्ही याव्यतिरिक्त इतर अनेक बँकांचे बँक बॅलेन्स सहज चेक करू शकता, तुम्ही IDBI बँक, बँक ऑफ इंडिया, एक्सिस बँक, ICICI इत्यादी बँकेतील बॅलेन्स त्या बँकांनी दिलेल्या नंबरवर किंवा ऍप वरजाऊन तुमचा अकाउंट बॅलेन्स बघू शकता. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo