प्रीपेड रिचार्ज प्लान्सच्या रेस मध्ये वोडाफोन पण मागे नाही…

प्रीपेड रिचार्ज प्लान्सच्या रेस मध्ये वोडाफोन पण मागे नाही…
HIGHLIGHTS

आपण मागील काही दिवसांपासून बघत आहोत किंवा असं पण म्हणता येईल कि रिलायंस जियो बाजरात आल्यापासून इतर सर्व कंपन्यांनी आपापल्या प्रीपेड रिचार्ज प्लान्सची संख्या वाढवली आहे. पण आज आम्ही फक्त वोडाफोन बद्दल बोलणार आहोत.

वोडाफोन ने आपला प्रीपेड रिचार्ज प्लानचा पोर्टफोलियो मागील काही दिवसांत खूप वाढवला आहे. वोडाफोन कडे खूप प्रीपेड रिचार्ज प्लान्स आहे. असे वाटत आहे कि येत्या काळात पण आपल्याला अनेक रिचार्ज प्लान बघायला मिळतील. आता नुकताच आपण एक सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लान कंपनी ने 84 दिवसांच्या वैधते सह फक्त Rs 279 मध्ये लॉन्च केला होता, यानंतर कंपनी एका नवीन प्लान सह एकदा पुन्हा बाजारात एक स्वस्त प्रीपेड प्लान आणला आहे. हा सर्वात स्वस्त प्रीपेड वोडाफोन रिचार्ज प्लान 56 दिवसांच्या वैधते सह सादर करण्यात आला आहे. हा प्लान अजूनतरी जास्त सर्कल्स मध्ये उपलब्ध नाही हा काही निवडक सर्कल्स मध्येच ही सादर करण्यात आला आहे. या प्लानची किंमत फक्त Rs 189 आहे. वोडाफोन च्या या नवीन रिचार्ज प्रीपेड प्लान मध्ये तुम्हाला वॉयस कॉल्स व्यतिरिक्त डेटा सुविधा पण मिळत आहे.

हा वोडाफोन प्रीपेड रिचार्ज प्लान खासकरून त्या यूजर्स साठी लॉन्च करण्यात आला आहे, जे वॉयस कॉलिंगचा जास्त वापर करतात. असे आम्ही यासाठी म्हणत आहोत कारण या प्लान मध्ये तुम्हाला फक्त 2GB डेटाच मिळत आहे. जसे आपण इतर वोडाफोन प्लान मध्ये बघितले आहे या प्लान मध्ये पण तुम्हाला वॉयस कॉलिंग 1000 मिनिटे प्रति सप्ताह मिळत आहे. विशेष म्हणजे या प्लान मध्ये तुम्हाला मिळणार 2GB डेटा, आणि फक्त 1000 मिनिटांची प्रति सप्ताह कॉलिंग यामुळे हा प्लान मागे राहतो. पण या प्लानच्या वैधतेमुळे याला एक चांगला प्लान म्हणता येईल.

वोडाफोन Rs 189 मध्ये येणार प्रीपेड रिचार्ज प्लान: वैधता आणि अन्य बेनिफिट

शेवटी एक प्रश्न उरतोच कि अखेरीस तुम्हाला वोडाफोन कडून लॉन्च केल्या गेल्येल्या अफोर्डेबल प्लान म्हणजे Rs 189 मध्ये येणाऱ्या 56 दिवसांची वैधता असलेल्या प्लान मध्ये काय मिळते. आपण कॉलिंग पासून सुरु करूया, लक्षात घ्या तुम्हाला या प्लान मध्ये 250 मिनिटे कॉलिंगची लिमिट डेली मिळत आहे, तसेच तुम्हाला यात 1000 मिनिटांची कॉलिंग प्रति सप्ताह मिळते. याव्यतिरिक्त यूजर्स फक्त 100 यूनीक नंबर्स वरच संपूर्ण वैधतेत कॉलिंग करू शकतात. या प्लान मध्ये तुम्हाला 2GB डेटा पण मिळत आहे, जो बघून वाटते कि हा प्लान पूर्णपणे कॉलिंग वर आधारित आहे. हा डेटा तुम्हाला संपूर्ण वैधतेसाठी मिळतो. तसेच वर सांगितल्याप्रमाणे वोडाफोनचा हा प्रीपेड रिचार्ज प्लान तुम्हाला 56 दिवसांच्या वैधतेसह मिळतो. एवढी वैधता या किंमतित क्वचितच इतर प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये मिळेल.

56 दिवसांच्या वैधते सह आता पर्यंतचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान

वोडाफोन ने गेल्या काही काळात अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. नुकताच Rs 300च्या आत कंपनी ने एक 84 दिवसांच्या वैधतेचा प्लान लॉन्च केला होता आणि आता कंपनी Rs 200 च्या आत एका नवीन प्लान सह आली आहे, जो 56 दिवसांची वैधता देतो. हा प्लानबघून बोलता येते कि हा आतापर्यंतचा या किंमतीती आणि या वैधते सह येणार सर्वात स्वस्त प्लान आहे. जरी जियो कडून पण असे काही प्लान सादर केले गेले आहेत, जे Rs 200 च्या आत दीर्घ वैधते सह येतात. याव्यतिरिक्त ना BSNL, ना एयरटेल, किंवा Idea कडे पण असा कोणताही प्लान नाही, पण असे म्हणता येईल कि येत्या काळात एयरटेल कडून असाच प्लान समान किंमतीती बाजरात येऊ शकतो.

जियो कडे आहे Rs 198 मध्ये येणार 28 दिवस वैधता असलेला प्लान

वर आपण वोडाफोन कसून लॉन्च झालेल्या एका सर्वात चांगल्या आणि अफोर्डेबल प्लान बद्दल बोलत होतो. आता आपण रिलायंस जियो बद्दल पण थोडे बोलूया. विशेष म्हणजे रिलायंस जियो कडे एक प्लान Rs 198 मध्ये येणार आहे, पण याची वैधता फक्त 28 दिवस आहे. या प्लान मध्ये तुम्हाला संपूर्ण वैधते साठी 56GB डेटा मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे कि तुम्हाला 2GB डेटा डेली मिळणार आहे. सोबतच प्लान तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग पण ऑफर करत आहे जी कोणत्याही FUP लिमिट विना तुम्हाला मिळत आहे. सोबत जियो च्या या प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला 100 SMS डेली पण मिळत आहेत. याचा अर्थ असा कि जियो च्या या प्लान मध्ये तुम्हाला डेटा आणि कॉलिंग जास्त मिळत आहे, पण वोडाफोन च्या या प्लान मध्ये तुम्हाला जास्त वैधता मिळत आहे.

 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo
Compare items
  • Water Purifier (0)
  • Vacuum Cleaner (0)
  • Air Purifter (0)
  • Microwave Ovens (0)
  • Chimney (0)
Compare
0