काळोखात मोबाईल बघण्याने येऊ शकते अंधत्व -रिपोर्ट

ने Adamya Sharma | वर प्रकाशित 30 Jun 2016
काळोखात मोबाईल बघण्याने येऊ शकते अंधत्व -रिपोर्ट
HIGHLIGHTS

अमेरिकेत स्मार्टफोनमुळे तात्पुरते अंधत्व आलेल्या दोन केसेस समोर आल्या आहेत. स्ट्रोकची भीती आणि १५ मिनिटांसाठी दृष्टी जाण्याची लक्षणे ह्यात दाखवली गेली आहे.

तुम्हाला रात्रीच्या काळोखात मोबाईल पाहण्यासाठी सवय आहे की? जर असेल तर तुम्ही लवकरच एका खूप मोठ्या आजाराला सामोरे जाणार आहेत. कारण रात्रीच्या अंधारात मोबाईल पाहिल्यामुळे अमेरिकेतील २ महिलांना काही वेळासाठी अंधत्व आल्याची घटना समोर आली आहे.

खरे पाहता. ह्या परीक्षणात दोन महिलांमध्ये “ट्रान्सिएन्ट स्मार्टफोन ब्लाइंडनेस” लक्षण मिळाले आहेत. ह्यात एका महिलेचे वय आहे २२ वर्ष आणि दुस-या महिलेचे वय आहे ४० वर्ष. महिलांनी अशी तक्रार केली होती, की सारखे सारखे त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार येतोय. त्यानंतर त्यांची MRI स्कॅन केले गेले. हार्ट टेस्ट सुद्धा केली गेली. मात्र काहीच समजले नाही. त्यानंतर त्या नेत्ररोग तज्ज्ञाकडे गेले.

हेदेखील वाचा - उत्कृष्ट मेटल बॉडीसह येणारे हे आकर्षक स्मार्टफोन्स आता भारतातही झाले उपलब्ध…

त्या महिलेने सांगितले, ते रात्री बिछान्यात एका डोळ्याने फोन पाहायचा आणि त्यावेळी दुसरा डोळा हा उशीवर असायचा. आणि त्यांनी जेव्हा तो फोन बाजूला ठेवला तेव्हा ते ज्या डोळ्याने फोन पाहात होत्या त्या डोळ्यासमोर पटकन अंधारी आली काहीच दिसेनासे झाले. त्यामुळे दोन्ही डोळ्यांचा समतोल राखण्यासाठी त्यांचा खूप वेळ गेला.

त्यामुळे नेत्र तज्ज्ञांनी अशा सर्व लोकांना सूचना आणि सल्ला दिला आहे जे लोक रात्री झोपताना मोबाईलमध्ये गडलेले असतात. अशांना काही वेळासाठी अंधत्व येऊ शकते, म्हणूनच रात्रीचा मोबाईलचा वापर करु नये हा सल्ला त्यांनी सर्वांना दिला आहे.

हेदेखील वाचा - आता लकी ड्रॉ ठरविणार कोणाला मिळणार फ्रीडम 251 स्मार्टफोन
हेदेखील वाचा - HP ने लाँच केला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त लॅपटॉप क्रोमबुक 11G5

logo
Adamya Sharma

Managing editor, Digit.in - News Junkie, Movie Buff, Tech Whizz!

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status