Oppo F7 स्मार्टफोन चे टॉप 5 फीचर्स, चला जाणून घेऊया या स्मार्टफोन मधील सर्वात खास फीचर

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 29 Mar 2018
Oppo F7 स्मार्टफोन चे टॉप 5 फीचर्स, चला जाणून घेऊया या स्मार्टफोन मधील सर्वात खास फीचर
HIGHLIGHTS
  • Oppo F7 स्मार्टफोन पहिल्यांदा सेल साठी 2 एप्रिलला उपलब्ध होईल.

आपल्याला माहीतच आहे की Oppo F7 स्मार्टफोन भारतात दोन-तिन दिवसांपूर्वीच लॉन्च करण्यात आले आहे. हा असा एक स्मार्टफोन आहे ज्याने ती शंका दुर केली आहे की एक मिड-रेंज स्मार्टफोन बेजल-लेस डिस्प्ले सह लॉन्च करणे कठीण आहे. हा स्मार्टफोन Rs 21,990 च्या सुरुवाती किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे, ही किंमत याच्या 64GB स्टोरेज वेरिएंट ची आहे, याव्यतिरिक्त याचा 128GB स्टोरेज वेरिएंट Rs 26,990 च्या किंमतीत विकत घेतला जाऊ शकतो. 

आता हा स्मार्टफोन भारतात लॉन्च तर करण्यात आला आहे, पण या स्मार्टफोन मध्ये म्हणजेच Oppo F7 मध्ये असे काय विशेष आहे जे लोकांना आकर्षित करेल. आज आम्ही तुम्हाला त्या बद्दलच सांगणार आहोत की नक्की या स्मार्टफोन मध्ये असे काय खास आहे. Oppo F7 स्मार्टफोन च्या टॉप 5 फीचर्स बद्दल आपण आज बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. 

Oppo F7 स्मार्टफोन चे टॉप 5 फीचर्स 

•   बेजल-लेस डिस्प्ले: तुम्हाला Oppo F7 स्मार्टफोन मध्ये एक बेजल-लेस डिस्प्ले मिळत आहे. याचा अर्थ असा आहे की या डिस्प्ले ने स्मार्टफोन च्या फ्रंट बाजूला पुर्णपणे घेरले आहे. ज्यामुळे स्मार्टफोनला एक अट्रॅक्टिव लुक मिळतो. याव्यतिरिक्त स्मार्टफोन मध्ये iPhone X प्रमाणे एक Notch पण देण्यात आला आहे. भरपुर लोकांना जरी हा आवडला नसला तरी डिजाईन च्या दृष्टीने हा एक मोठा बदल आहे, जो स्मार्टफोन ला अजूनच सुंदर बनवण्यास मदत करतो. 
•    ग्लॉसी लुक: स्मार्टफोन एका ग्लॉसी पेंट फिनिश सह लॉन्च करण्यात आला आहे, जो याला भारतातील स्मार्टफोंस च्या गर्दीत याला वेगळे स्थान देतो, या मुळेच खुप सार्‍या स्मार्टफोंस मध्ये पण हा सहज ओळखला जाऊ शकतो. या किंमतीत असे कमीच स्मार्टफोंस आहेत जे अशा लुक सह बाजारात आले आहेत. Oppo F7 स्मार्टफोंस त्या काही स्मार्टफोंस पैकी एक आहे.
•    दमदार फ्रंट कॅमेरा: Oppo F7 ला एक अजून बाब खास बनवते आणि ती आहे की हा स्मार्टफोन एका 25-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेरा सह लॉन्च करण्यात आले आहे. अशाच कॅमेराला फ्रंट साठी उत्तम कॅमेरा म्हणु शकतो. पण या कॅमेरा बद्दल अंतिम मत स्मार्टफोन रिव्यु नंतरच बोलू शकतो की हा कसा आहे. फक्त जास्त रेजोल्यूशन वाला कॅमेरा या स्मार्टफोन ची एकमात्र खासियत नाही. तर यात AI क्षमता पण आहे ज्या मुळे हा अजूनच खास बनतो. 
•   लेटेस्ट एंड्राइड OS सह लॉन्च होणे: एकीकडे अजूनही अनेक स्मार्टफोंसना अपडेट नंतर एंड्राइड Oreo मिळणे सुरू नाही झाले तर दुसरीकडे Oppo F7 स्मार्टफोन एंड्राइड च्या या लेटेस्ट OS सह लॉन्च झाल्यामुळे याचे वेगळेपण दिसून येते. याव्यतिरिक्त अजून काही स्मार्टफोंस असे आहेत, जे या OS वर लॉन्च करण्यात आले आहेत. Xiaomi ने पण आपल्या स्मार्टफोंसना या OS वर लॉन्च करणे सुरू केले आहे.  
•    6GB रॅम सह लॉन्च होणारा अफोर्डेबल डिवाइस: Oppo F7 स्मार्टफोन एक असा डिवाइस आहे जो अफोर्डेबल किंमतीत 6GB रॅम सह लॉन्च करण्यात आला आहे. पण जास्त रॅम असण्याने आजकल फोनच्या परफॉरमेंस वर जास्त फरक पडत नाही पण जर तुम्ही एक जास्त रॅम वाला स्मार्टफोन घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी Oppo F7 एक उत्तम निवड ठरू शकते. 

Oppo F7 स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स 

स्मार्टफोन च्या काही स्पेक्स पाहता यात 16MP चा रियर कॅमेरा आहे जो f/1.8 सह येतो जो नव्या कॅमेरा अॅल्गोरिथम सह पेयर्ड आहे आणि वेगवेगळे सीन्स ओळखतो आणि त्यानुसार सेटिंग्स बदलू पण शकतो. कॅमेरा 16 वेगवेगळे सीन्स ओळखतो जसे की फूड, पोर्ट्रेट, पेट्स इत्यादि. 
 
डिवाइस मध्ये 6.23 इंचाचा डिस्प्ले आहे जो फुल HD+ IPS LCD डिस्प्ले आहे आणि याचा अॅस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे. डिवाइस च्या टॉप वर एक notch आहे आणि याच्या बॅक वर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. सोबतच मागच्या वेळे प्रमाणे यावेळेस पण डिवाइस ला ग्लॉसी बॅक देण्यात आली आहे. 

डिवाइस एंड्राइड 8.1 पर आधारित कंपनी च्या ColorOS 5.0 UI वर चालतो आणि यात मीडियाटेक हेलिओ P60 प्रोसेसर आहे. कंपनी चा दावा आहे की Oppo F7 Oppo F5 च्या तुलनेने 20% फास्ट आहे. याव्यतिरिक्त स्मार्टफोन मध्ये 3400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी नुसार ही बॅटरी 8.3 तासांचा गेमिंग आणि 13.4 तासांचा वीडियो प्लेबॅक ऑफर करते. 

Oppo F7 स्मार्टफोन ची किंमत आणि सेल डिटेल्स

OPPO F7 साठी फ्लॅश सेल 2 एप्रिल पासून सुरू होईल, जिथे तुमच्याकडे हा फोन विकत घेण्याची संधी असेल. अणि हो हे लक्षात असू दे की हा फ्लॅश सेल फक्त 24 तासांसाठी चालेल. या फ्लॅश सेल मध्ये फक्त 10,000 OPPO F7 ची विक्री होईल. हा स्मार्टफोन 9 एप्रिल पासून ओपन सेल साठी उपलब्ध होईल.

फ्लॅश सेल खास बनवण्यासाठी कंपनी ने OPPO F7 च्या ग्राहकांसाठी काही डील्स आणि ऑफर्स ची पण घोषणा केली आहे. कंपनी एक वर्षाच्या आत फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर करत आहे, जी कंपनी च्या ऑथराइज्ड सर्विस सेंटर मधून केली जाईल. तसेच ओप्पो ने ICICI डेबिट, क्रेडिट कार्ड यूजर्स साठी 5% ची सूट घोषित केली आहे. त्यासोबत रिलायंस जियो यूजर्स साठी 120GB फ्री डेटा आणि 1200 रुपये कॅशबॅक ची ऑफर
आहे. तसेच तुम्ही OPPO F7 ला 0% EMI प्लान वर पण विकत घेऊ शकता. 
logo
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

email

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

Redmi 9 Prime (Matte Black, 4GB RAM, 128GB Storage) - Full HD+ Display & AI Quad Camera
Redmi 9 Prime (Matte Black, 4GB RAM, 128GB Storage) - Full HD+ Display & AI Quad Camera
₹ 10999 | $hotDeals->merchant_name
Samsung Galaxy M31 (Ocean Blue, 8GB RAM, 128GB Storage)
Samsung Galaxy M31 (Ocean Blue, 8GB RAM, 128GB Storage)
₹ 16999 | $hotDeals->merchant_name
Redmi Note 9 Pro Max (Interstellar Black, 6GB RAM, 64GB Storage) - 64MP Quad Camera & Alexa Hands-Free Capable
Redmi Note 9 Pro Max (Interstellar Black, 6GB RAM, 64GB Storage) - 64MP Quad Camera & Alexa Hands-Free Capable
₹ 15499 | $hotDeals->merchant_name
Redmi 9A (Sea Blue 3GB RAM 32GB Storage)| 2GHz Octa-core Helio G25 Processor | 5000 mAh Battery
Redmi 9A (Sea Blue 3GB RAM 32GB Storage)| 2GHz Octa-core Helio G25 Processor | 5000 mAh Battery
₹ 7499 | $hotDeals->merchant_name
DMCA.com Protection Status