Micromax Bharat 5 Pro आणि Xiaomi Redmi 5 मध्ये तुलना, बघा कोणत्या स्मार्टफोन मध्ये आहे किती दम

Micromax Bharat 5 Pro आणि Xiaomi Redmi 5 मध्ये तुलना, बघा कोणत्या स्मार्टफोन मध्ये आहे किती दम
HIGHLIGHTS

Micromax Bharat 5 Pro आणि Xiaomi Redmi 5 स्मार्टफोन च्या बेस वेरिएंट ची किंमत Rs. 7,999 आहे.

भारतात दोन नवीन स्मार्टफोंस काही वेळेच्या अंतराने लॉन्च झाले आहेत, एक स्मार्टफोन ला चीनी स्मार्टफोंस निर्माता कंपनी Xiaomi ने आपल्या Xiaomi Redmi 5 स्मार्टफोन नावाने लॉन्च केले आहे, या कंपनी ने मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली चांगली पकड बसवली आहे. दुसरीकडे एक भारतीय कंपनी आहे, जिला आपण खुप वेळेपासून माइक्रोमॅक्स या नावाने ओळखतो. माइक्रोमॅक्स ने भारतात आपला Micromax Bharat 5 Pro स्मार्टफोन ला लॉन्च केले आहे. 

या दोन्ही स्मार्टफोंस च्या किंमती बद्दल बोलायाचे झाले तर Micromax Bharat 5 Pro आणि Xiaomi Redmi 5 स्मार्टफोन च्या बेस वेरिएंट ची किंमत Rs. 7,999 आहे. आता है प्रश्न येऊ शकतो की जर बेस वेरिएंट ची किंमत Rs. 7,999 आहे तर इतर मॉडल ची किंमत काय आहे. इथे सांगण्याची बाब म्हणजे Redmi 5 स्मार्टफोन ला भारतात 2GB रॅम आणि 4GB रॅम वाल्या वेगवेगळ्या वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आले आहे. मोठ्या वेरिएंट ची किंमत Rs. 8,999 आहे. याव्यतिरिक्त Micromax ने आपल्या Bharat 5 Pro स्मार्टफोन ला फक्त एका रॅम वेरिएंट म्हणजे 3GB रॅम सह लॉन्च केले आहे.  

आज आम्ही या दोन्ही स्मार्टफोंस मधील मोठा फरक शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि शोधणार आहोत की कोणत्या स्मार्टफोन मध्ये किती दम आहे, आणि कोणता स्मार्टफोन घेणे तुमच्या साठी योग्य ठरेल. चला बघुया या दोन्ही स्मार्टफोंस मधील फरक…

डिस्प्ले
डिस्प्ले पाहता Redmi 5 स्मार्टफोन मध्ये एक 5.7-इंचाचा एक HD डिस्प्ले मिळत आहे, हा डिस्प्ले 18:9 आस्पेक्ट रेशियो सह येतो. तर Micromax Bharat 5 Pro स्मार्टफोन मध्ये एक 5.2-इंचाचा डिस्प्ले मिळत आहे, हा एक HD IPS पॅनल आहे. 

सॉफ्टवेर आणि हार्डवेयर 
तुम्हा सर्वांना माहिती आहे की Xiaomi Redmi 5 स्मार्टफोन ला दोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वैरिएंट सह वेगवेगळ्या किंमतीत लॉन्च केले आहे. या स्मार्टफोन ला 2GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज सह 4GB रॅम आणि 32 तसेच 64GB स्टोरेज सह लॉन्च करण्यात आले आहे, तसेच या स्मार्टफोंस ची किंमत क्रमश: Rs. 7,999, Rs. 8,999 आणि Rs. 10,999 आहे. तर Micromax Bharat 5 Pro स्मार्टफोन पाहता हा स्मार्टफोन 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे, या स्मार्टफोन ची किंमत Rs. 7,999 आहे. 

पुढे जाऊन यांच्या प्रोसेसर इत्यादि बद्दल बोलायाचे झाले तर Redmi 5 स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर मिळत आहे. तर मिल Bharat 5 Pro स्मार्टफोन मध्ये एक 1.3GHz का क्वाड-कोर प्रोसेसर आहे. पण स्मार्टफोन ची खासियत याचा फेस अनलॉक फीचर आहे, जो कुठे ना कुठे तरी Redmi 5 स्मार्टफोन ला मोठी टक्कर देणार आहे. 
कॅमेरा आणि बॅटरी  
आता कॅमेरा आणि बॅटरी बद्दल बोलुया. आधी Redmi 5 स्मार्टफोन पाहता या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 12-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा LED फ्लॅश सह आणि एक 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा सॉफ्ट-लाइट मोड्यूल सह येतो. तसेच या स्मार्टफोन मध्ये एक 3300mAh क्षमता असलेली बॅटरी पण देण्यात आली आहे. 

आता Micromax Bharat 5 Pro स्मार्टफोन बद्दल बोलायाचे झाले तर यात तुम्हाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा LED फ्लॅश सह आणि 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण LED फ्लॅश सह देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या स्मार्टफोन च्या फेस अनलॉक फीचर सह एक अन्य विशेषता ही आहे की यात एक रिवर्स चार्जिंग सपोर्ट असणारी 5000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. जी कंपनी च्या मते जवळपास 21 दिवसांचा स्टँड बाय टाइम आणि जवळपास 2 दिवसांचा बॅकअप देण्यास सक्षम आहे. 
किंमत 
Xiaomi Redmi 5 स्मार्टफोन ला दोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वेरिएंट सह वेगवेगळ्या किंमतीत लॉन्च केले आहे. या स्मार्टफोन ला 2GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज सह 4GB रॅम आणि 32 तसेच 64GB स्टोरेज सह लॉन्च करण्यात आले आहे, तसेच या स्मार्टफोंस ची किंमत क्रमश: Rs. 7,999, Rs. 8,999 आणि Rs. 10,999 आहे. तर Micromax Bharat 5 Pro स्मार्टफोन पाहता हा स्मार्टफोन 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे, या स्मार्टफोन ची किंमत Rs. 7,999 आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo