LeEco Le 2 रिव्ह्यू

Souvik Das | वर प्रकाशित 10 Jun 2016
LeEco Le 2 रिव्ह्यू
HIGHLIGHTS
  • LeEco चा Le 2 स्मार्टफोन आपल्याला उत्कृष्ट कामगिरी, चांगला ऑडियो, चांगला डिस्प्लेसह फोनची चांगली बिल्डसुद्धा देते. ह्याचा बॅटरी बॅकअप आणि कॅमेरा म्हणावा तितका चांगला नाही. मात्र तरीही हा फोन शाओमी रेडमी नोट 3 ला कडक टक्कर देऊन आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट बजेट स्मार्टफोन ठरु शकतो.

डिजिट रेटिंग :  87 / 100

फायदे-
आकर्षक कामगिरी
उत्कृष्ट डिस्प्ले
उत्कृष्ट ऑडियो
चांगली बिल्ट क्वालिटी आण दिसायला चांगला
किंमतीला अनुरुप

तोटे
बॅटरी लाइफ चांगली नाही

कॅमेरा रेंडरचा खूप आवाज येतो.

आमचा निर्णय
LeEco Le 2 एक उत्कृष्ट स्मार्टफोन आहे. ह्याची कामगिरी खूपच उत्कृष्ट आहे. ह्यासाठी ह्याचे स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर आणि 3GB रॅम कारणीभूत आहेत असेच म्हणावे लागेल. एक चांगला डिस्प्ले, सामान्य रचना हीच ह्या स्मार्टफोनची खरी यूएसपी आहे. CDLA टेक्नोलॉजी स्मार्टफोन ऑडियोला आणखीनच चांगली बनवते. मात्र १५,००० च्या किंमतीत शाओमी रेडमी नोट ३ ची बॅटरी ह्यापेक्षा चांगली आहे तर कॅमे-याच्या बाबतीत मोटो G4 प्लस चांगला आहे. LeEco Le 2 सर्व फोन्समध्ये उत्कृष्ट आहे. कारण LeEco Le 2 स्मार्टफोन ११,९९९ रुपयातील सर्वात उत्कृष्ट बजेट स्मार्टफोन आहे. त्यामुळे जर तु्म्ही चांगला स्मार्टफोन घ्यायच्या विचारात असाल, तर आम्ही तुम्हाला हा स्मार्टफोन घ्यायचे सुचवू.

सविस्तर माहिती
जेव्हा LeEco ने Le 1S ला भारतात लाँच केला होता, तेव्हा तो भारतीय बाजारात खूप पसंत केला गेला होता. ह्या स्मार्टफोनला एक स्टँडर्ड डिझाईन दिले गेले होते आणि ह्याची रचना सुद्धा खूप चांगली होती.तिथेच जर LeEco Le 2 विषयी बोलायचे झाले तर ह्यात 5.5 इंचाची IPS LCD डिस्प्ले 1080x1920 पिक्सेल रिझोल्युशनसह दिली आहे. जर ह्याच्या प्रोसेसरविषयी बोलायचे झाले तर LeEco Le 2 ला 2.3GHz डेका-कोर मिडियाटेक हेलियो X20 प्रोसेसरसह दिला गेला आहे. फोनमध्ये 3GB ची रॅम देण्यात आली आहे. त्याशिवाय ह्यात 32GB चे नॉन-एक्सपांडेबल स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे. LeEco Le 2 स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे, ज्यात OV16880 PureCel सेंसर दिले गेले आहे. हा कॅमेरा ड्यूल-टोन LED फ्लॅशने सुसज्ज आहे. ह्यात फेस डिटेक्शन ऑटोफोकस आणि डिजिटल इमेजला स्थिर करु शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा OmniVision OV8865 चा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे, जो f/2.2, वाइड अँगल्स लेन्ससह दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड मार्शमॅलो v6.0.1 वर चालतो. Le 2 ने नवीन डिजिटल ऑडियो दिला गेला आहे. रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये USB टाइप-C पोर्टसुद्धा दिला आहे.

डिझाईन आणि रचना

LeEco Le 2 रचना त्याच्या आधीच्या डिवाइससारखीच आहे. रोझ गोल्ड वेरियंट स्मार्टफोन मेटल बॉडीने बनला आहे. हा फोन फ्रंट 74.6 टक्के कव्हर केलेला आहे. ह्याची डिस्प्ले 5.5 इंचाची असून सुद्धा हा फोन शाओमी रेडमी नोट 3 सारखा मोठा वाटणार नाही. ह्या फोनच्या कडेला अशा पद्धतीने डिझाईन केले आहे की, फोनला हातात पकडल्यावरसुद्धा कोणतीही समस्या येत नाही.

 


LeEco ने 3.5mm अॅनलॉग ऑडियो पोर्टच्या जागेवर Le 2 मध्ये केवळ I/O पोर्ट, USB-C  ला स्मार्टफोनच्या खालच्या बाजूस दिला गेला आहे. स्मार्टफोनच्या उजव्या बाजूला पॉवर/अनलॉक बटन दिले गेले आहे. रियर पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर योग्य आहे मात्र हा तुमच्या फिंगरप्रिंटला ओळखण्यासाठी ०.४ सेकंद लावतो, ज्याला आपण कमी करु शकत नाही.
 

डिस्प्ले आणि युआय

LeEco Le 2 ला 5.5 इंचाची पुर्ण HD, IPS LCD डिस्प्ले पॅनलसह दिला गेला आहे. ह्याची 5.5 इंचाची डिस्प्ले 1080x1920 पिक्सेल रिझोल्युशनला सपोर्ट करते. ह्याच्या डिस्प्लेमध्ये खास गोष्ट ही आहे की, हा बाहेरील तापमानाप्रमाणे आपले कलर अॅडजस्ट करतो. एकूणच ह्याचा डिस्प्ले खूप चांगला आहे. ह्यात स्क्रीन प्रोटेक्टसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 4 दिली आहे. ह्याच टच रिस्पॉन्ससुद्धा चांगला आहे.

त्याशिवाय Le 2 चा डिस्प्ले आपल्याला शार्प Contrast Ration, व्हिडियो डिस्प्लेसुद्धा देतो. जेव्हा तुम्ही घरात असाल तेव्हा ह्याचा डिस्प्ले रंग खूपच जास्त असतो. आणि ह्या स्मार्टफोनमध्ये काही अॅप्लिकेशन इन्स्टॉल केले आहेत, ज्याचे नाव LeView, Live आणि LeVidi आहे. हे तिन्ही अॅप फोनमध्ये वेगवेगळ्या फिचरला अॅडजस्ट करण्यास मदत करतात.

कामगिरी
ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर आणि 3GB रॅम, एड्रेनो 510 GPU X8 LTE मॉडेम, हेक्सागॉन 680DSP आणि 32GB स्टोरेजसह येतो. ह्याच्या कामगिरीची तुलना विवो V3 मॅक्सशी केली जाऊ शकते. हेक्सागॉन 680 DSP स्मार्टफोनच्या बॅकग्राउंड अॅप्लिकेशनला सुरक्षित ठेवतो.

LE 2 च्या युआयची खास गोष्ट ही आहे की, ह्यात हेवी गेम्स आणि फोटो घेताना हे अगदी सहजपणे काम करते. हा ह्या किंमतीत मिळणारा सर्वात खास आणि आकर्षक स्मार्टफोन असू शकतो.


कॅमेरा
ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात OmniVision चा 2015 इमेज सेंसर, OV16880, 1mi पिक्सेल आकाराचा प्रयोग केला आहे. LeEco Le 2 स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. ज्यात OV16880 PureCel सेंसर दिला गेला आहे. हा कॅमेरा ड्यूल-टोन LED फ्लॅशने सुसज्ज आहे. ह्यात फेस डिटेक्शन ऑटोफोकस आणि डिजिटल इमेजला स्थिर करु शकता.

View post on imgur.com

 

Continual Digital Lossless Audio (CDLA)
LeEco ने आपल्या नवीन स्मार्टफोनमध्ये दोषरहित डिजिटल ऑडियो जोडला आहे, ज्याला आपण USB-C पोर्टच्या माध्यमातून हेडफोनने ऐकू शकतात. ह्यांना एक इन-इयर हेडफोनला लाँच केले आहे, जो CDLA ला सपोर्ट करतो. ज्याची किंमत १,९९० रुपये आहे. CDLA ची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात आपल्याला लॉसलेस ट्रन्समिशन मिळतो.

बॅटरी लाइफ
आमच्या बेंचमार्कमध्ये LeEco Le 2 स्मार्टफोनमध्ये ९ तास २१ मिनिट आणि १० सेकंदापर्यंत चालेल. गीकबेंच 3 मध्य़े ह्याला 5125 स्कोरिंग मिळाली. ह्याची बॅटरी लाइफ चांगली बोलू शकतो मात्र उत्कृष्ट बोलू शकत नाही. ह्यात त्यावेळी २०-२५ ईमेल्स, 150 व्हॉट्सअॅप आणि मेसेंजर चॅट्स, २० मिनिटांपर्यंत यूट्युब, हेव्ही गेम्स वापरले गेले. ह्यात 68 टक्क्यांपासून ११ टक्क्यांपर्यंत चार्ज राहून हा फोन ४ तास ४५ मिनिटांपर्यंत चालतो.निष्कर्ष
LeEco Le 2 एक उत्कृष्ट स्मार्टफोन आहे. ह्याची कामगिरी खूपच उत्कृष्ट आहे. ह्यासाठी ह्याचे स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर आणि 3GB रॅम कारणीभूत आहेत असेच म्हणावे लागेल. एक चांगला डिस्प्ले, सामान्य रचना हीच ह्या स्मार्टफोनची खरी यूएसपी आहे. CDLA टेक्नोलॉजी स्मार्टफोन ऑडियोला आणखीनच चांगली बनवते. मात्र १५,००० च्या किंमतीत शाओमी रेडमी नोट ३ ची बॅटरी ह्यापेक्षा चांगली आहे तर कॅमे-याच्या बाबतीत मोटो G4 प्लस चांगला आहे. LeEco Le 2 सर्व फोन्समध्ये उत्कृष्ट आहे. कारण LeEco Le 2 स्मार्टफोन ११,९९९ रुपयातील सर्वात उत्कृष्ट बजेट स्मार्टफोन आहे. त्यामुळे जर तु्म्ही चांगला स्मार्टफोन घ्यायच्या विचारात असाल, तर आम्ही तुम्हाला हा स्मार्टफोन घ्यायचे सुचवू.

हेदेखील वाचा - LeMall ह्या शॉपिंग पोर्टलवर केवळ १ रुपयात मिळतोय LeEco Le 2 स्मार्टफोन
हेदेखील वाचा - २०१७ च्या सुरुवातीला सॅमसंग लाँच करु शकतो आपला बेंडेबल स्क्रीन असलेले स्मार्टफोन्स:ब्लूमबर्ग

Souvik Das
Souvik Das

Email Email Souvik Das

Follow Us Facebook Logo Facebook Logo

About Me: The one that switches between BMWs and Harbour Line Second Class. Read More

Tags:
LeEco LeEco Le 2 LeEco Le 2 review LeEco Le 2 performance review LeEco Le 2 vs Xiaomi Redmi Note 3
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
₹ 71900 | $hotDeals->merchant_name
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
₹ 61999 | $hotDeals->merchant_name
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
₹ 11999 | $hotDeals->merchant_name
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
₹ 11499 | $hotDeals->merchant_name
iQOO 7 5G (Solid Ice Blue, 8GB RAM, 128GB Storage) | 3GB Extended RAM | Upto 12 Months No Cost EMI | 6 Months Free Screen Replacement
iQOO 7 5G (Solid Ice Blue, 8GB RAM, 128GB Storage) | 3GB Extended RAM | Upto 12 Months No Cost EMI | 6 Months Free Screen Replacement
₹ 29990 | $hotDeals->merchant_name