काय आहे हा ‘Smartly.Me’ अॅप?

ने Abhijit Dey | वर प्रकाशित 10 Mar 2016
काय आहे हा ‘Smartly.Me’ अॅप?
HIGHLIGHTS

चांगली वैशिष्ट्ये असलेला स्मार्टफोन घेणे हे जितके तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, तसेच तो ठराविक फोन कुठे मिळेल किंवा त्याचे सर्विस सेंटर्स कुठे आहेत ही माहिती देण्याचे काम Smartly.Me अॅप करतो.

सध्या बाजारात स्मार्टफोन्स असा सुळसुळाट झालाय की, दर दिवशी कित्येक नवीनवीन अॅप्स आपल्याला पाहायला मिळतात. बाजारात असलेले स्मार्टफोन्स आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले नवीन स्मार्टफोन्स ह्यामुळे कोणता स्मार्टफोन घ्यावा ह्याबाबत आपण नेहमी गोंधळलेलो असतो. आणि जर त्यात एखाद्याला तंत्रज्ञानाची जास्त आवड नसेल किंवा माहित नसेल अशांना तर उचित स्मार्टफोन निवडणे खूपच अवघड होऊन बसते. अशा आणि इतर सर्व लोकांसाठी Smartly.Me हा एक उत्तम पर्याय आणि ह्या समस्येवर तोडगा असलेला अॅप आहे.

 

ह्या अॅपचे प्रमुख काम म्हणजे तुम्हाला तुमच्या मागण्यांनुसार तुम्हाला अनुरुप असा स्मार्टफोन निवडण्यास मदत करणे. इतकेच नव्हे तर, हा अॅप तुम्हाला कोणते अॅप्स किंवा गेम्स डाऊनलोड करावे हे देखील सांगतो. ह्या अॅपच्या मुख्य पेजवर वरती ४ टॅब्स दिले आहेत, ज्यात ‘For Me’ नावाचा  विभाग दिला आहे.  ह्यात तुम्हाला त्या स्मार्टफोनला त्यांनी ठराविक रेटिंग दिली असेल. तसेच त्यात तुम्हाला उत्कृष्ट अॅप्स, फोन्स आणि गेम्स सांगितले असतील. त्यानंतर मुख्य टॅबमधील दुसरा विभाग ‘Discover’ म्हणजे ह्या अॅपचे सर्वात खास आणि हाताळण्यास अगदी सोपा विभाग आहे. ज्यात तुम्हाला तुम्हाला जी जी वैशिष्ट्ये तुम्हाला हवी आहेत अगदी किंमतीपासून, कॅमेरा, रॅम, प्रोसेसरपर्यंत सर्व वैशिष्ट्ये निवडल्यास तुम्हाला योग्य असा स्मार्टफोन्स सांगितला जातो. त्यातही दोन पर्याय दिले आहेत, स्टँडर्ड मोड आणि अॅडव्हान्सड मोड. त्यातील स्टँडर्ड मोडमध्ये फोटोग्राफी, स्टाइल, ट्रॅव्हल इ.पर्याय दिले आहेत तर अॅडव्हान्सड मोडमध्ये तांत्रिक जसे की प्रोसेसर, कामगिरी, बॅटरी, कनेक्टिव्हिटी यांसारखे पर्याय दिले आहे.

हेदेखील पाहा - लेनोवो वाइब k4 नोट ची एक झलक Video

तसेच मुख्य पृष्टाचा तिसरा टॅब Friends मध्ये तुमचा मित्र/मैत्रिण कोणता फोन वापरतात हे कळते, ते चौथ्या टॅबमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अॅप्सविषयी माहिती मिळते. थोडक्यात सांगायचे झाले तर, हा अॅप तुम्हाला सर्वोत्कृष्ट आणि तुम्हाला अनुरुप अशा मोबाइल्स मुद्देसूद माहिती देतो. तसेच ह्यात तुम्हाला दिलेल्या स्मार्टफोनच्या ठळक वैशिष्ट्यांमुळे मोबाइल खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला ह्या फोनची इतर स्मार्टफोनशी तुलना करणे सोपे जाते. आणि योग्य तो फोन खरेदी करण्यास मदत होते. तसेच हा अॅप तुम्हाला नवीन येणा-या स्मार्टफोन्सचीही वेळोवेळी माहिती देतो आणि ती अपडेटही करतो.तसेच जर तुम्ही फोनची सविस्तर माहिती उघडली आणि त्यावर टॅप केल्यास तुम्हाला त्या ठराविक फोनचे सर्विस सेंटर्स आणि तुमच्याजवळील मॅन्युफॅक्चरर सुद्धा मिळतो. तसेच एखादा स्मार्टफोन तुम्ही टिक म्हणजेच बुकमार्क करुन ठेवल्यास तो रिलीज झाल्यानंतर तुम्हाला त्याची अप टू डेट माहिती मिळते, ज्यामुळे तुम्हाला इतर फोनशी ह्याची तुलना करणे सोपे जाते. अॅप्स आणि गेम्स बाबत ह्याची कामगिरी म्हणावी तेवढी खास नाही, पण स्मार्टफोन्सबाबतीत हा एक उत्कृष्ट अॅप आहे.

हा अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

हेदेखील वाचा - हे आहेत भारतात मिळणारे सर्वोत्कृष्ट वॉटरप्रुफ स्मार्टफोन्स

हेदेखील वाचा - हे आहेत २० हजाराच्या किंमतीत येणारे दोन उत्कृष्ट टॅबलेट्स आणि त्यांची तुलना

logo
Abhijit Dey

A Star Wars fan and sci-fi enthusiast. When I'm not playing games on my PC, I usually lurk around the Internet, mostly on Reddit.

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status