आता ४५ भाषांमध्ये ट्रान्सलेट करणार फेसबुकचे हे नवीन कंपोजर फिचर

आता ४५ भाषांमध्ये ट्रान्सलेट करणार फेसबुकचे हे नवीन कंपोजर फिचर
HIGHLIGHTS

ह्या फिचरने आपण देश-विदेशात कुठेही असलेल्या आपल्या मित्रांसोबत त्यांच्या भाषेत बोलू शकता.

सध्या सोशल मिडियामुळे आज आपले न केवळ देशात मित्र बनत आहेत, तर ही यादी चक्क विदेशापर्यंत जाऊन पोहोचली आहे. मात्र मित्र जरी बनले किंवा असले तरी आपल्याला नेहमी एक अडचण येते ती, भाषेची. अनेकदा त्यांची भाषा आपल्याला येत नसल्यामुळे आपण त्यांच्याशी मोकळेपणाने बोलायला घाबरतो. ह्या भीतीला दूर करण्यासाठी फेसबुक एक नवीन मल्टिलिंग्युअल कंपोजर फीचर बनवले आहे. ह्याच्या माध्यमातून आपण आपल्या भाषेत पोस्ट करुन जी भाषा आपल्या मित्रासाठी योग्य आहे, अशा तब्बल ४५ भाषांमध्ये ऑटोमॅटिकली भाषांतरित करेल.

ह्या फिचरमुळे आता कोणाशीही त्यांच्या भाषेत बोलणे सोपे जाईल आणि हाच ह्या फीचरचा मुख्य उद्देश आहे. चला तर मग पाहूया, कसे वापरणार हे मल्टिलिंग्युअल कम्पोजर फीचर…

  • सर्वात आधी आपण आपल्या फेसबुक अकाउंटच्या सेटिंगमध्ये जाऊन लँग्वेज सेक्शनमध्ये जा.

  • त्यातील मल्टिलिंग्युअल पर्याय क्लिक करा

  • त्यानंतर तो पर्याय इनेबल करण्यासाठी तेथे दिलेल्या चौकोनात क्लिक करा आणि मग आपल्याला जी भाषा हवी आहे ती निवडा.

असे केल्यास आपण केव्हाही कोणाशीही बोलू शकता. हे खूपच फायद्याचे आहे. ह्याला जरुर वापरुन पाहा आणि तुमचा अनुभव आम्हाला नक्की कळवा.

हेदेखील वाचा –  लेनोवो Y700 गेमिंग लॅपटॉप भारतात लाँच, किंमत ९९,९९० रुपये
हेदेखील वाचा –  नासा: जूनो यानाने अखेर यशस्वीरित्या केला गुरुकक्षेत प्रवेश

Team Digit

Team Digit

Team Digit is made up of some of the most experienced and geekiest technology editors in India! View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo