संग्रहित केलेले हे टॉप ५ अॅप्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये असणे आहे गरजेचे

ने Arnab Mukherjee | वर प्रकाशित 17 Mar 2016
संग्रहित केलेले हे टॉप ५ अॅप्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये असणे आहे गरजेचे
HIGHLIGHTS

तुमच्या रोजच्या जीवनात उपयोगी पडतील, असे असंख्य अॅप्स तुमच्या समोर असल्यामुळे तुमचा नेहमीच गोंधळ उडतो. पण त्यावर तोडगा म्हणून आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत असे ५ महत्त्वाचे अॅप्स ज्यांनी तुमची ही समस्या दूर होईल.

ई-कॉमर्स सुरु झाल्यामुळे सर्वप्रथम त्यांचे आभारच मानले पाहिजे, कारण त्यामुळे आपल्याला भारतासारख्या मोठ्या देशात कोणत्याही सेवेचा लाभ घेणे अगदी सोपे झाले. ही ई-कॉमर्सने घडवलेली एक क्रांतीच म्हणावी लागेल. पण त्यामुळे एक समस्या निर्माणे झाले ती म्हणजे कोणत्याही सेवेसाठी असंख्य अशा ई-कॉमर्स सेवा सुरु झाल्या, ज्यामुळे नेमकी कोणती सेवा घ्यावी हा मोठा प्रश्नच आपल्यासमोर निर्माण झाला.

तुमची ही संभ्रमावस्था दूर करण्यासाठी आम्ही आज तुम्हाला असे ५ संग्रहित अॅप्स सांगणार आहोत ते तुमच्या स्मार्टफोनमध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे. हे ५ अॅप्स रोजच्या जीवनात आवश्यक असलेले अॅप्सपैकीच एक आहेत.

कॅब सर्विसेस- आपल्या सर्वांना माहितच असेल, की कॅब बुक करणे कधी कधी किती त्रासदायक काम होऊन जाते. त्यातच इन्ट्रा-कार बुकिंग आणि कार रेंटल ह्यांची सुद्धा तुलना करणे अवघड होऊन जाते. अशा वेळी Ixigo Cabs हा ऑनलाइन ट्रॅवल अॅप खूपच फायदेशीर ठरतो. Ixigo अॅप तुम्हाला न केवळ कॅबची माहिती देतो तर तुमचा कॅबची ठराविक ठिकाणी येण्याची वेळ, भाडे आणि आणि ऑफलाइन कॅबची तुमच्या लोकेशन असलेली उपलब्धता ह्याविषयी माहिती देतो. ह्यात लॉगइन केल्यास त्वरित तुम्हाला कॅब बुक करता येते. Ixigo तुम्हाला भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये कार बुक करण्याचीही सेवा देतो. त्यामुळ जास्तीत जास्त कॅबचा वापर करणा-या भारतीयांकडे हा अॅप असणे महत्त्वाचे आहे.

फॅशन: सर्व ई-कॉमर्स वेबसाइट्सची मूळ सुरुवात फॅशननेच झाली. त्यामुळे आता असे अनेक आणि आकर्षक असे ऑनलाइन स्टोअर्स आले आहेत, ज्याविषयी तुम्ही ह्या आधी ऐकलेही नसेल. तुमच्याकडून एखादा चांगला पर्याय पाहायचा राहून गेला असेल किंवा त्या ठराविक कपडे आणि दागिन्यांसाठी अजून एक पर्याय तुम्हाला पुढच्या वेळी मिळेल का ह्याची माहिती मिळवायची असले तर कशी मिळवाल? त्यासाठी डाऊनलोड करा Wooplr अॅप. जो तुम्हाला ह्या फॅशन जगतात घेऊन जाईल आणि दरदिवशी बदलणा-या फॅशन स्टाइल्सबद्दल तुम्हाला वेळोवेळी माहिती देईल. त्यात तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडली तर ती तुम्ही खरेदीही करु शकता. हा तुम्हाला थीम आणि कलेक्शनवर आधारित असलेल्या फॅशनचीही माहिती देतो.

 

न्यूज: सर्वात जास्त वापरली जाणारी आणि महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे स्मार्टफोनवर वर्तमानपत्र वाचणे किंवा बातम्या पाहणे. दरदिवशी ह्या बातम्यांचा कंटेंटसुद्धा बदलत असतो. अशा वेळी हे दोन प्रमुख घटक लक्षात घेता, Inshorts अॅप हा अत्यंत उपयोगी असा अॅप आहे. ह्यात तुम्हाला प्रत्येक बातमीतील प्रमुख गोष्टी ६० शब्दांत थोडक्यात सांगितलेली असते. तसेच जर तुम्हाला ती बातमी सविस्तर वाचायची असेल, तर तुम्हाला एक लिंक सुद्धा दिलेली असते, ज्याच्या मदतीने तुम्ही त्या लिंकवर क्लिक करुन ती बातमी सविस्तर वाचू शकता. सध्या तर ह्या अॅप आणखी बदल केले असून आता तुम्ही एखादी बातमी किंवा त्याची लिंक तुमच्या नेटवर्कमधील लोकांशी शेअर करु शकता. ज्याला ‘Toss’ असे नाव दिले आहे. ह्यात तुम्हाला आवडलेले एखादा लेख तुम्ही हायलाइट करु शकता आणि इतरांना शेअरही करु शकता.

 

फ्लाइट्स: जरी तुम्ही अजूनही ट्रॅवल एजंटकडून तुमचे फ्लाइट तिकिट बुक करत असाल, तरी त्या एजंटने दिलेल्या ढिगभर पर्यायामुळे तुमचा नेहमी गोंधळ उडतो. त्यात अनेक स्वस्त आणि महागड्या फ्लाइट्सही नमूद केलेल्या असतात. अशावेळ Ixigo Flights and Hotels हा एक खूप फायदेशीर ठरणारा अॅप आहे.  हा तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाइटवरील फ्लाइट तिकिटांची किंमत सांगतो. तसेच येथे तुम्ही तुमच्या संपुर्ण प्रवासाचे नियोजन करु शकता. कारण येथे तुम्हाल हॉटेल बुकिंग्स, बस बुकिंग्स, ट्रॅबल इटिनरीज आणि पॅकेजेस इ. ची माहिती दिलेली असते.

प्राइज कम्पॅरिजन(किंमतीची तुलना)-  वर दिलेल्या सर्व संग्रहित अॅप्स मध्ये सर्वांमध्ये सारखी आणि महत्त्वाची अशी एक गोष्ट दिसून आली ती म्हणजे किंमतीची तुलना. तुम्हाला मिळालेल्या विविध पर्यायांमध्ये योग्य त्या पर्यायाची निवड करण्यासाठी तुम्हाला Voodoo हा अत्यंत फायदेशीर ठरणार अॅप आहे. Voodoo सध्या २६ पेक्षा जास्त ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला शॉपिंग दरम्यान चांगल्यातली चांगली किंमत सांगून शॉपिंगचा एक उत्कृष्ट अनुभव देतो.

 


ह्या ५ संग्रहित अॅप्समुळे तुमचा रोजच्या जीवनात होणारा गोंधळ थोडा कमी होईल. तसेच तुम्हाला तुमच्या फोनवर वेगवेगळे पर्याय तपासण्यासाठी लागणारा खर्चिक वेळही वाचेल.

 

हेदेखील वाचा - काय आहे हा ‘Smartly.Me’ अॅप?

हेदेखील पाहा- फोटो एडिटिंग करणारे ५ उत्कृष्ट अॅप्स

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status